मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

kathaa

ठहरने को बोला है

स्वीट टॉकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
साधारण पंचाऐंशी सालच्या आसपासची गोष्ट. सुट्टी संपवून मी बोटीवर निघालो होतो. बोट हॉन्गकॉन्गला होती. मुंबई विमानतळावर मी चेक-इन करताना माझ्या सामानाचं स्कॅनिंग झाल्यावर मला बाजूला बोलावून घेण्यात आलं. मला हे असं बोलावणं अजिबात नवीन नव्हतं. माझ्या पाठीला ऐंशी साली दुखापत झाली होती तेव्हांपासून मी रोज काही विशिष्ट व्यायाम करायचो ज्याच्यासाठी दोन्ही घोट्यांभोवती वजनाच्या पिशव्या व्हेल्क्रोच्या पट्ट्यांनी लावायचो. या पिशव्यांमध्ये पोलादाच्या अगदी छोट्या छोट्या शेकडो चकत्या होत्या. दोन तीन मि.मि. व्यासाच्या. या चकत्यांचं सिक्यूरिटीला नेहमीच कुतूहल असायचं.

राँग नंबर (पार्ट -२)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भेंडी,आजची रात्र पण अशीच जाणार. सालं, मागच्या वर्षी पर्यंत ठीक होते पण, आता ह्यापुढे दरवर्षी हा दिवस त्रासदायकच ठरणार.इतर लोक आपापले वाढदिवस साजरे करत असतांना, आपण मात्र दरवर्षी ह्या दिवशी असेच कुढत बसणार. मागच्या वर्षी ह्याच रात्री, ती बिंधास्त पणे आपल्या बॉइज होस्टेल वर आली होती.येतांना पण एकटी नाही, फूल्ल तिच्या गँग समवेत.तिचा बाप तसा आमच्याकडे शेत मजूरच आणि गावच्या प्रथे प्रमाणे त्यांचे घर पण गावा बाहेरच. जन्मापासुनच ती आणि मी एकत्रच.अगदी बालवाडी ते शाळे पर्यंत.सुरुवाती पासूनच ती एकदम बिंधास्त अगदी आमच्या जातीत शोभेल अशी.धमाल करता-करता, मी पटकन तिला प्रपोज केले. आई शप्पथ कसली लाजली ती.

बोट - व्यसनं

स्वीट टॉकर ·
लेखनप्रकार
फार पूर्वी, जेव्हां बोटी फक्त शिडाच्या होत्या तेव्हांचा काळ. इंग्लंडच्या बोटी (Her Majesty’s Ships) जगभर फिरायच्या खर्‍या, पण त्यांच्यावर काम करायला खलाशी सहजासहजी मिळत नव्हते. खलाशांचं आयुष्य फारच खडतर असे. गोडं पाणी अतिशय मर्यादित. शीतकरण नसल्यामुळे आहारात थोडेच पदार्थ. रोज रोज तेच तेच. वार्‍यावर अवलंबून असल्यामुळे पुढच्या बंदराला पोहोचायला किती काळ लागेल काही सांगता येत नसे. काम अंगमेहनतीचं आणि जोखमीचं. वादळांचा धोका कायमच डोक्यावर. बोटी बुडण्याचं आणि खडकांवर आपटून फुटण्याचं प्रमाण बर्यापैकी. वर कित्येक सफरींमध्ये तर सत्तर टक्के खलाशी स्कर्वी (scurvy) ने मेल्याची नोंद आहे.

एक लग्नसमारंभ . . . . . जो खरं तर झालाच नाही

स्वीट टॉकर ·
लेखनविषय:
तीन वर्षापूर्वी आमच्या मुलीचं (कॅप्टन पुनव गोडबोलेचं) लग्न झालं. तेव्हां समारंभ करण्याऐवजी आम्ही ती सगळी रक्कम एका फौंडेशनला दिली जे गेली तीस वर्ष अनाथ मुली आणि निराधार वृद्धांना निवारा आणि शिक्षण देताहेत. साधारण वर्षभरानंतर फौंडेशनचा कुठलासा कार्यक्रम होता जिकडे बरेच महत्वाचे आणि धनाड्य लोक येणार होते. तिथे मी त्यांना काही motivational सांगावं असं फौंडेशनच्या संचालकांनी सुचवलं. बौद्धिक घेणारी भाषणं रटाळ आणि कंटाळवाणी होतात असं माझं मत पण इलाज नव्हता. माझी बोलायची वेळ आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सगळ्यांना भुका लागल्या होत्या, चिडचिड झाली होती, स्वर चढले होते.

एवढीशी गोष्ट

abhajoshi14 ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज शेजारच्या घरातून सकाळी सकाळी जोर जोरात भांडी वाजल्याचा आवाज आला. आमच्या शेजारी एक सुखवस्तू आणि गोड कुटुंब रहाते. सासू मुलगा सून आणि त्यांची दोन लहान मुले. एकूण च एक मेकांना धरून आणि सांभाळून असतात. म्हणून च मला जर आश्चर्य वाटले. आमची ही आणि ती सून दोघी एकाच ऑफिस मध्ये आहेत - साहजिकच मला संध्याकाळी सगळा रिपोर्ट मिळाला. सुनेची बाजू - "अहो मी अक्खे घर ह्यांच्या ताब्यात दिले आहे. एकही गोष्टी मध्ये मी लुडबुड करत नाही कि हक्क गाजवत नाही. रोजची भाजी काय करायची हे देखील त्याच ठरवतात. त्यांची मदत तर मला खूप च होते आणि मी ते प्रत्येक वेळेस सर्वांना सांगत असतेच अभिमानाने.

राजाराम सीताराम एक ----------------भाग १७ - मुंबईचा मित्र

रणजित चितळे ·
ह्या आधीचे.......... राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश. राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस. राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १. राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २. राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस. राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट. राजाराम सीताराम....... भाग ७… ड्रिलस्क्वेअर. राजाराम सीताराम....... भाग ८....शिक्षा. राजाराम सीताराम....... भाग ९....एक गोली एक दुश्मन।.... भाग १. राजाराम सीताराम....... भाग १०. एक गोली एक दुश्मन।.... भाग २. राजाराम सीताराम....... भाग ११.

पहिली फ्लाइट . . . . . . जरा हटके

स्वीट टॉकरीणबाई ·
माझी मुलगी पुनव कमर्शियल पायलटचं शिक्षण घ्यायला मेलबर्न, ऑस्ट्रेलियाला गेली होती. त्यांच्या कोर्सच्या दरम्यान कुठलीशी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांना प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी मिळते. तशी तिला मिळाली. बरोबर शिकणारे इतर विद्यार्थी एकमेकांबरोबर प्रवासी म्हणून बसायला उत्सुक असतातच. पण तिनं ठरवलं होतं की तिची पहिली पॅसेंजर बनण्याचा मान तिच्या आईला (म्हणजे मला) द्यायचा. मलाही तिच्या ह्या निर्णयाचं कौतुक वाटलं. (मुली लहानपणीच घरातनं बाहेर पडल्या की त्यांच्या बद्दल वाटणारी काळजी आणि कौतुक, दोन्ही जरा निष्कारण अतीच असतं.) तिच्या क्रिसमसच्या सुट्टीत मी तिला भेटायला जाणारच होते.

असा ही एक क्लायंट

स्वीट टॉकरीणबाई ·
लेखनविषय:
माझी मुलगी दुसर्‍या यत्तेत जाऊन शाळा सबंद वेळ सुरू झाल्यावर मी काही उद्योग करावा असं ठरवलं. बी.एस्.सी. (फिजिक्स) असल्यामुळे जनरल शिक्षण होतं पण उद्योगधंद्याला पूरक असं काही नव्हतं. बारा वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा कॉलेजला प्रवेश घेतला, D.C.A. केलं. वर्गामधली मुलं मुली मला आंटी म्हणायचे! नवीन शिक्षण संपल्यावर डी.टी.पी. आणि छपाईचा व्यवसाय सुरू केला. कोणत्याही नवीन उद्योगाप्रमाणेच हा देखील पडंत, धडपडंत, टक्केटोणपे खात, पुस्तकांपेक्षाही जास्त परिस्थितीकडून आणि गिर्‍हाइकांकडून शिकत शेवटी स्थिरावला. प्रत्येक उद्योगाची स्वतःची एक ठरलेली त्रिज्या असते.

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

DEADPOOL ·
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

शतशब्दकथा : सर्टिफिकेट

मराठी कथालेखक ·
लेखनप्रकार
अनिरुद्धने कपाटातून फाईल काढली. नकळत स्मिताच्या एकेका सर्टिफिकेटवरुन त्याची नजर फिरत होती. दहावी, बारावी, एम बी बी एस्, एम डी सगळ्या परीक्षांत अव्वल यश. परीक्षांशिवायही काही सर्टिफिकेट्स होते अंताक्षरी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि खूप काही कसल्या कसल्या परीक्षा , पेपर प्रेजेंटेशन्स. स्मिताने मेहनत करुन घवघवीत यश मिळवावं आणि घरी येवून बाबाला प्रेमळ आज्ञा करावी "बाबा..माझं सर्टिफिकेट फाईल करशील ना प्लीज"..आपल्या लाडक्या लेकीचं प्रत्येक नवीन सर्टिफिकेट फाईल करताना तो नेहमीच पुर्ण फाईल पुन्हा पुन्हा बघत रहायचा. थरथरत्या हाताने त्याने स्मिताचं शेवटचं सर्टिफिकेट फाईल केलं.