खिडकी पलीकडचं जग
भाग १
गौरी नावासारखिच गोड, मोहक आणि बड़बडया स्वभावाची मुलगी होती. लाघवी आणि मित्र-मैत्रिणींचा मोठा परिवार असलेली. कायम पहिला नंबर वगैरे नाही... पण तशी हुशार म्हणण्या सारखी. आई-बाबांची एकुलती आणि लाडकी लेक. गौरी उत्तम चित्र काढायची. त्यामुळे शाळेतून तिला वेगवेगळ्या स्पर्धाना देखील पाठवाल जायचं. अनेकदा तिने शाळेला बक्षीस मिळवून दिल होत.
त्या दिवशी गौरीची 10वी च्या परीक्षेचा शेवटचा पेपर होता. त्यामुळे गौरी आणि तिच्या मैत्रिणी जाम खुशीत होत्या. सगळ्या मैत्रिणी मिळून जुहुला भटकायला जाणार होत्या. आता आपण कॉलेज मध्ये जाणार म्हणजे थोडे मोठे झालो अस सगळ्यांच्याच मनात होत.
वाचतेय..