Skip to main content

kathaa

चान्स मिळाला रे मिळाला की अ‍ॅक्टिंग!

लेखक स्वीट टॉकर यांनी बुधवार, 17/04/2019 या दिवशी प्रकाशित केले.
होतकरू अभिनेता झाल्यावर मी आपोआपच होतकरू अभिनेत्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये दाखल झालो. यात फक्त अभिनेते अन् अभिनेत्रीच नव्हे, तर दिग्दर्शक, शूटिंगचं सामान भाड्यानी देणारे, साउंड रेकॉर्डिस्ट, अभिनयाचे आणि तत्सम इतर क्लासेस चालवणारे वगैरे सगळेच सामावलेले असतात. त्या विषयाशी संलग्न सर्व प्रकारच्या बातम्या इथे समजतात. एक हिंदी आणि एक मराठी चित्रपटासाठी अमुक रविवारी अमुक कंपनीच्या ऑफिसमध्ये ऑडिशन होणार असल्याची बातमी आली. त्या रविवारी मी कॉलेजच्या कामासाठी पुण्याच्या बाहेर असणार असल्यामुळे मी त्यांना फोन करून माझी ऑडिशन आधी घेण्याची विनंती केली.

तिसरी इनिंग

लेखक स्वीट टॉकर यांनी शुक्रवार, 22/02/2019 या दिवशी प्रकाशित केले.
मी ज्याच्याबद्दल सांगणार आहे त्याला 'तिसरी इनिंग' म्हणणं धाडसाचं होईल पण तरी म्हणतोच. माझी पहिली इनिंग झाली बोटीवर. त्याबद्दल तुम्ही सविस्तर वाचलं आहेच. दुसरी चालू आहे ती प्रोफेसरीची, ज्याबद्दल थोडंफार वाचलं आहेत. त्यातून एखादेवेळेस तिसरी निर्माण होण्याची शक्यता आहे. ती होईल किंवा नाही, मात्र आत्ताच त्यात मला मजेदार अनुभव आले ते शेअर करणं जरूर आहे. आमच्या रिसर्च विभागाच्या प्रमुखाची हॉबी आहे डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवणे.

चंद्रिका

लेखक किल्ली यांनी बुधवार, 06/02/2019 या दिवशी प्रकाशित केले.
राधिका भाजी आणण्यासाठी घरातून निघाली होती. गल्लीच्या बाहेर मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर ती वळली. रस्ता ओलांडत असताना एक कार तिच्या बाजूला येऊन थांबली. त्या आलिशान कार मधून अति उच्चभ्रू महिला खाली उतरली. उंची कपडे, गॉगल अशा पेहरावात ती एखाद्या राणीसारखी शोभत होती. राधिकाला पाहून तिने ओळखीचे स्मित केले आणि हलकेच तिच्या पाठीवर थाप मारली. राधिकाने वळून पाहिले. ती तिची शाळेतली मैत्रीण नीता होती. "कित्ती बदलली ही, श्रीमंतीची झाक तेव्हाही तिच्या वावरण्यात दिसायची. किंचित गर्वही होता तिला.

मराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 30/01/2019 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, दिनांक २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा मराठी भाषा दिन आपण मिपावर शतशब्दकथा स्पर्धेच्या रुपात साजरा करणार आहोत. विषयाला कोणतेही बंधन नाहीये, पण स्पर्धा म्हटली की नियम आणि अटी आलेच. तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत. १. स्पर्धा १ फेब्रुवारी २०१९ रोजी ००.०० भाप्रवे सुरू होईल आणि २० फेब्रुवारी २०१९ रोजी २३.५९ भाप्रवे संपेल. २.

वाढदिवस

लेखक निओ यांनी मंगळवार, 04/12/2018 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा आज वाढदिवस. सकाळी अंथरुणात उठून बसला. काल रात्री बारा पर्यंत जागाच होता. पण शुभेच्छा द्यायला तो सोडून कोणीच जागे नव्हते. whats app वरचे काही फुटकळ मेसेज तपासून हा पण शहाण्या सारखा गपचूप झोपी गेला. तर सकाळी उठून बसला. कोणाची काही चर्चा नाही, भेटवस्तू काय हवी विचारणा नाही, बाहेर कोठे जायचे काही तयारी नाही. आपला वाढदिवस विसरले कि काय हे लोक, असंच त्याला वाटून गेलं. इतक्यात आलीच ...लगबगीने हसत हसतच बायको आली. येऊन सरळ मांडीवरच बसली. आयला हे काय... ! म्हणजे एकीकडे बरे वाटले.

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ६

लेखक कलम यांनी शुक्रवार, 02/11/2018 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी शांभवीच्या घरातून निघून गेल्यावर मात्र एकदाही अमितनं तिला फोन केला नाही. शांभवीच्या कानात त्यानं सांगितलेला प्रत्येक शब्द घुमत होता. आयुष्यात कधी कधी जास्त विश्लेषण करत बसलं तर हातात असलेला क्षण पण आपण घालवून बसतो. शांभवीच थोडंफार तसंच झालं होतं. अथर्वनं एका रात्री जेवताना विषय काढलाच. "काय झालंय तुला शांभवी? पूर्वीसारखी बोलत नाहीस, जेवणावर लक्ष नसतं , परवा सान्वी किती रडत होती आणि तू मात्र कुठंतरी विचारात हरवलेली आणि हे काय? एकही पैंटिंग काढलेलं नाहीयेस इतक्या दिवसात. इज एव्हरीथिंग ओके?" "अह... हो. सगळं ठीक आहे अथर्व.

मी अतिरेकी...

लेखक कलम यांनी गुरुवार, 01/11/2018 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग पहिला: वय वर्षे ८: मी तिसरी चौथीत असेन त्यावेळी. पाचव्या दिवशी घरच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर अनंतचतुर्दशीपर्यंतच्या कुठल्यातरी एका रविवारी आई बाबा मला आणि माझ्या भावाला सांगलीला फिरायला आणि देखावे बघायला घेऊन जात. सांगलीत पोहोचल्यावर दुपारी चार वाजता बाबा आम्हाला मसाला डोसा खायला घालत आणि त्यानंतर गणपती मंदिरात जाऊन नंतर सगळीकडचे देखावे बघायला सुरुवात होई. त्या वर्षी पण देखावे बघायला सुरु केल्यावर थोड्या वेळांनंतर मला भूक लागली म्हणून बाबांनी एक किलो पापडी मला आणि भावाला खाण्यासाठी घेऊन दिली. एक किलोचा पूडा हातात आल्यावर आम्हा दोघांची अविरत चरंती सुरु झाली.

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ५

लेखक कलम यांनी सोमवार, 29/10/2018 या दिवशी प्रकाशित केले.
रेड लाईट मध्ये रात्री उभ्या असलेल्या बायका जी गोष्ट पैश्यासाठी करतात, लग्न होऊन नवऱ्याबरोबर सुखी असलेल्या बायका जे प्रेमापायी करतात तर सुखी नसलेल्या जबाबदारी म्हणून करतात, लग्न न झालेली एक नवथर तरुणी जी गोष्ट प्रेमात आकंठ बुडाली असल्याने किंवा कमीत कमी प्रेमाचा आभास निर्माण झाल्यानं एखाद्या अनाहूत क्षणी करते; ती गोष्ट आपण काय म्हणून केली असावी?

सेक्रेड गेम्स: ठो-कळे

लेखक वनफॉरटॅन यांनी सोमवार, 03/09/2018 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय woke लोकांसाठी कंटेंटचं इतकं दुर्भिक्ष्य आहे, की अक्षरश: कोणतीही नवीन कलाकृती मस्त खपून जाते. त्या कलाकृतीला खरोखर चांगलं निर्मितीमूल्य, दर्जेदार लेखन/दिग्दर्शन मिळालं की ती प्रेक्षकांच्या मनात अढळपद मिळवते. ह्यामुळे इतर म्हणाव्या तर बारीक, म्हणाव्या तर गंभीर चुकांकडे सरसकट दुर्लक्ष होतं. (पुढील लेखात पांढऱ्या ठशांत 'रसभंग' आहेत.) नेटफ्लिक्सची सेक्रेड गेम्स ही आजकाल अतिशय चर्चेत असलेली भारतीय मालिका. मालिका त्रैभाषिक आहे. मुख्य पात्रांतले संवाद हिंदी/इंग्रजीत असले तरीही कथा मुंबई पोलिसांभोवती फिरणारी असल्यामुळे मराठीचा वापर इंग्रजीपेक्षा जास्त आहे.

दी टायगर्स असोसिएशन - रहस्यकथा भाग ४

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 15/08/2018 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग 2 भाग 3 सावंतांनी एकदाचा निर्णय घेतला. बाबांना ते म्हणाले , " देशमुख साहेब यावेळी मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. ही सगळी कागदे इथे राहू देत. मला सगळ्या गोष्टीचा विचार करायला वेळ लागेल. तोपर्यंत तुम्ही हे शहर सोडून जाऊ शकत नाही. काही वेगळी बातमी कळाली तर मला कळवत रहा. पुढे काय करावे हे समजतच नव्हते.