मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गेम (शतशब्दकथा)

चांदणे संदीप · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
दुपारपासंनच शंकऱ्या आणि बाप्या पवळंमागच्या रूईटीच्या आडोशाने त्याच्या पाळतीवर होते. त्याला उचलताना कोणीही आजूबाजूला नसेल याचीही खबरदारी त्यांना घ्यायची होती. तो एवढासा जीव बागडत होता. चारला अब्दुल्या काम थांबवून बाजेवर निजला. घरातूनही हालचाल जाणवेना. शंकऱ्याने बाप्याला खुणावले. बाप्या कापऱ्या आवाजात कुजबूजला, "अब्दुल्या उठला तर ठिवायचा न्हाय!" पोत्याने कितीही धडपड केली तरी दोघांचे सुसाट पाय थांबणार नव्हते. गावाला वळसा घालून ते दुसऱ्या टोकाला रियाजच्या खोपटावर आले. पुरावे नष्ट करण्यासाठीची सर्व तयारी त्याने केलेलीच. दिवस बुडाला आणि खोपटात रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. रात्री दारूच्या घोटांनी तिघांना कमालीचा थरार दिला. शंकऱ्या हसत ओरडलाच, "पाचशेला दिला न्हाय अब्दुल्यानी! गेलाच शेवट पोटात रूस्तूम्या! ह्याला म्हणत्यात गेम!" - संदीप चांदणे

वाचने 4107 वाचनखूण प्रतिक्रिया 15

नाखु 09/11/2016 - 15:45
एक बळी घेतलास कथेत, असहिष्णु कुठला !!! (खास मिपा विचारवंत प्रतिसाद) अता मूळ प्रतिसाद, भारी जमलीय कथा

विजुभाऊ 10/11/2016 - 15:14
रुस्तुम्या = भुजबळ बाप्या = बारामतीचे काकांचा पुतण्या शंक-या = तटकरे तिसरा= बारामतीचे काका अबदुल्या= उठ्धव

चांदणे संदीप 10/11/2016 - 16:51
सर्व वाचक व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार! Sandy