नंदनवनात सिद्धू भाग २
लेखनविषय:
- Read more about नंदनवनात सिद्धू भाग २
- १ प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
“बाबा, आपण सिद्धूच्या घरी जाउया, त्याच्या बाबांची बदली झाली आहे. उद्या तो निघून जाईल, त्याच्यासाठी गिफ्ट घेऊया. “
मला कुठेही जायची इच्छा नव्हती. पण आरुने हट्ट धरला.
बायकोला बोललो, “जायचे तर काहीतरी घेऊन जायला पाहिजे. मोकळ्या हाताने जाणे चांगले दिसणार नाही. आपल्या खिशाला परवडेल अशी काहीतरी. तुला ह्या गोष्टी बरोबर समजतात, विचार करून सांग.”
शेवटी हजार एक रुपये टाकून ड्राय फ्रुट बॉक्स घेतली.
सिद्धूचा फ्लॅट म्हणजे काहीच्या काही होता, मी असा फ्लॅट आयुष्यात प्रथमच बधत होतो. एकेक गोष्ट नजरेत सामावून नोट करत होतो. विचार केला वेळ आली तर एखाद्या कथेत टाकता येईल. माझ्या धुवाधारला मी असा फ्लॅट देईन.