Skip to main content

शत शब्द कथा - भाव कि किंमत

लेखक विअर्ड विक्स यांनी शनिवार, 15/10/2016 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
सई नि साहिल चांगले मित्र होते. पदव्यूत्तर शिक्षणासाठीसुद्धा साहिलने सईसोबत प्रवेश घेतला होता. वेलीवर फुल उमलणार का ? याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. पदव्यूत्तर अंतिम परीक्षेच्यावेळी दोघे एकाच वर्गात होते.पेपर सुरु होण्यास ५ मिनिटे बाकी होती. अचानक सईचे घड्याळ बंद पडते,नि ती निरागसपणे साहिलकडे त्याचे घड्याळ मागते. साहिल एक क्षणभर विचार करत आपले घड्याळ तिला देतो.वर्गातील सर्वांचेच लक्ष त्या दोंघाकडे जाते. पण फिकीर नव्हती , साहिलला त्याच्या वेळ नियोजनाची नि सईला .... अनेक वर्षांनंतर सई नि साहिल परत भेटतात. सई साहिलसाठी भेट म्हणून घड्याळ घेऊन येते. हि भेट स्वीकारण्यास साहिल ईच्छूक नसतो परंतु सईच्या आग्रहाखातर ती स्वीकारतो. घरी परतून साहिल त्या घड्याळाकडे पाहत स्वतःशीच पुटपुटतो , " किंमत कळली पण भाव नाही कळला ! "
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1863
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया