ठहरने को बोला है
साधारण पंचाऐंशी सालच्या आसपासची गोष्ट. सुट्टी संपवून मी बोटीवर निघालो होतो. बोट हॉन्गकॉन्गला होती. मुंबई विमानतळावर मी चेक-इन करताना माझ्या सामानाचं स्कॅनिंग झाल्यावर मला बाजूला बोलावून घेण्यात आलं. मला हे असं बोलावणं अजिबात नवीन नव्हतं.
माझ्या पाठीला ऐंशी साली दुखापत झाली होती तेव्हांपासून मी रोज काही विशिष्ट व्यायाम करायचो ज्याच्यासाठी दोन्ही घोट्यांभोवती वजनाच्या पिशव्या व्हेल्क्रोच्या पट्ट्यांनी लावायचो. या पिशव्यांमध्ये पोलादाच्या अगदी छोट्या छोट्या शेकडो चकत्या होत्या. दोन तीन मि.मि. व्यासाच्या. या चकत्यांचं सिक्यूरिटीला नेहमीच कुतूहल असायचं.
मिसळपाव