नवसंजीवनी
वसंजीवनी
बंकिमचंद्र शरतचंद्र विमलरा^य यांचा बंगाल| साँदेश‚ रसगुल्ला‚ कालाजामून यांचा मिठास्वाद म्हणजे बंगाल| नझरूल इस्लामांच्या कवितेतला दुर्गेचा अवतार धारण करणारा बंगाल| रक्तपदमा आणि जमुना यांचा लपंडाव म्हणजे बंगाल| मां^च्या कोमल छायेतील बंगाल| कधी सख्यांच्या एका कौतुकाच्या धापेचा बंगाल| तर कधी भाभींच्या गोड थट्टेचा बंगाल……
परंतु… रंगूनच्या एका हाकेसरशी )दयावर दगड ठेवून आदित्यला हाच ‘बंगाल’ सोडावा लागला| “मा^ की होलोÆ” “तू जा आदित्य| रंगून तुला साद घालतय|यशप्राप्त भव”| ती असं जरी म्हणत असली तरी वर्षा तिच्या डोLयात साठली होती| फेसाLत्या लाटांवर स्वार होवून बोट रंगूनच्या दिशेने जात होती|
मिसळपाव
फक्त पैशांसाठी मी या प्रयोगात सहभागी झालो होतो.
माझ्या बधिर कवटीला छिद्र पाडतांना डॉक्टरांनी मला जागंच ठेवलं. त्यांनी डोक्याच्या वेगवेगळ्या भागांना केबल्स जोडले. मेंदूच्या शुभ्र करड्या रंगात केसांएवढ्या बारीक केबल्सचा लाल रंग मिसळून गेला. त्या असंख्य केबल्सचं दुसरं टोक जोडलं गेलं सुपरकॉम्प्युटर्सना.
“ऑपरेशन सक्सेसफुल” त्यांनी जाहीर केलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा महापूर उसळला होता. आता फक्त फायनल टेस्टिंग बाकी होतं.
इशारा झाला अन सगळे संगणक जिवंत झाले.
दिग्या अन जग्या मुडदे चोरायचे… स्मशानात पुरलेले. संशयाला जागाच सुटणार नाही असं परफेक्ट त्यांचं काम.
दिशाचे आईवडील पार्टीला गेले अन तिने लगेचच पुजाला घरी बोलावलं. पुजा सगळी तयारी करून आली होती. आल्याआल्या तिने दरवाजा खिडक्या बंद केल्या, खिडक्यांवरचे पडदे ओढून घेतले. नंतर टेबलावर बॅग ठेवून त्यातलं सामान बाहेर काढायला सुरुवात केली. सगळ्यात आधी काचेचा चकचकीत गोळा बाहेर आला. खोलीतल्या अंधारातही तो मंदगूढ उजेड फेकत होता.
“काय आहे हे?”
“याच्या मदतीने आपण भूतांना बोलावू शकतो.”
“काहीपण काय फेकतेस गं.”
“अगं खरंच. बाबांच्या जॉबमुळे आम्ही आफ्रिकेत होतो न तिथे मी तंत्रमंत्र शिकले होते.