बाया (मयगुढकथा)
* संपूर्णपणे काल्पनिक
** कमकुवत मनाच्या लोकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.
*** आमची प्रेर्ना
रविवारच्या दुपारी मस्त मटण चापून, वाँकिंगडेड मँरेथॉन पाहता पाहता साधारणपणे मला अर्ध्याएक तासाने सोफ्यावरच अमळसा डोळा लागला तोच, कोणितरी मला धरल्यासारखे जाणवू लागले. मला माझे डोळे बंद असताना पण सर्व दिसत होते. पण तरीही अंगात उठण्याची ताकद नव्हती, हालचाल करू शकत नव्हतो ...ओरडावस वाटलं पण तोंडातुन शब्दच फुटत नव्हते. कोणितरी माझा गळा आवळल्या सारखे वाटत होते.
मिसळपाव