मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

kathaa

चोरून बघणे - आधुनिक पद्धत (शतशब्दकथा)

चांदणे संदीप ·
परवा सहज तिच्या प्रोफाईलवर क्लिक केलेलं. नवा 'डीपी' आणि 'स्टेटस्' बघायला. "Online" ह्या शब्दांतून जणू ती माझ्याकडे पाहतेय असंच वाटलं.... माझ्या हातापायातली शक्तीच गेली! वाटलं, तिने पाहिल असेन का? मी तिचं प्रोफाईल बघताना. तिला मी "Typing..." असा दिसलो असेन का? बापरे! आता कस भेटणार तिला कॉलेजात? आरारा, ओशाळून कसनुसं हसलो नि हळूच 'ब्याकचं' बटण दाबलं! पुन्हा वाटलं, ती म्हणेल, "Typing..." तर दिसलेलं, मग काहीच कस नाही लिहीलं. मग पुन्हा हिंमत करून तिच्या प्रोफाईलात गेलो आणि लिहिल... "आज पहिल्यांदाच तुझा डिपी आणि स्टेटस बघितलय ग....

तू .....

अपरिचित मी ·
तू ..... काल yahoo चा mail box उघडला आणि मन भरभर दहा वर्षापूर्वी जाऊन उभं राहिलं... इंजिनीरिंग कॉलेज.... होस्टेल लाईफ... अगदी मंतरलेले दिवस..... आणि तू सोबत... तुला सांगू, स्वर्ग गवसल्याची अनुभूती होते ना तशी मला प्रेमात पडल्यावर झाली होती.. Online Chatting ने आपली झालेली ओळख.. बऱ्याचदा एकाच cyber कॅफेत बसून तू मला केलेले mails ... अर्थात तेंव्हा तू मला माहिती नव्हतास ... नंतर माझा तुला भेटण्याचा आग्रह... आणि शेवटी बऱ्याच प्रयत्नां नंतर तू तयार... आपली पहिली भेट... तू तुझ्या email id प्रमाणे blue jeans red shirt घालून आलेलास... मी मैत्रिणी सोबत... मी केलेल्या हजार चौकश्या ..

राजाराम सीताराम एक .................. आस्थेचे बंध...................भाग १६

रणजित चितळे ·
ह्या आधीचे.......... राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश. राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस. राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १. राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २. राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस. राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट. राजाराम सीताराम....... भाग ७… ड्रिलस्क्वेअर. राजाराम सीताराम....... भाग ८....शिक्षा. राजाराम सीताराम....... भाग ९....एक गोली एक दुश्मन।.... भाग १. राजाराम सीताराम....... भाग १०. एक गोली एक दुश्मन।.... भाग २. राजाराम सीताराम....... भाग ११.

ओळखले का?

राजू ·
"ए शुक शुक" "ए अरे थांब" अचानक मागून आवाज येतो पण स्वतःला "ए" ह्या नावाने कोणी हाक मारेल असे जरासे विस्मरणात गेले असल्याने हो...हो..थांबा जरा सविस्तर सांगतो तर आपण सगळे नोकरी-व्यवसायानिमित्त एका विशिष्ठ पदावर काम करत असतो आणि ते पद म्हणजेच आपली ओळख होते. म्हणजे कोणी दुकान,हार्डवेअर स्टोअर,हॉटेल या व्यवसायात असेल तर "शेठ' या विशेषणाने तर कोणी बँक मॅनेजर,बिजीनेसमन,डॉक्टर,वकिल ,सरकारी अधिकारी या पदावर असेल तर "सर" "साहेब" अशा विशेषणानेओळखले जातो. आणि विशेष म्हणजे समाजात सुद्धा आता एक वेगळीच छाप असल्याने "आबा" "आप्पा" "दादा" "भाऊ" अशी काहीशी ओळख निर्माण झालेली असते. तर "ए" अशा एकेरी नावाने आ

सोशल नेटवर्क?

राजू ·
'डॉक्टर,आजकाल झोप व्यवस्थित होत नाही.जेवण जात नाही दिवसभर नुसते डोके दुखत राहते.' 'बरं पोट निट साफ होते का?' 'नाही ना डॉक्टर.' 'मी काही टेस्ट लिहून देतो त्या करून घ्या पण त्या अगोदर १५ दिवस रोज सकाळी उठल्यावर प्रातर्विधी अगोदर आणि नाष्टा झाल्यावर दैनंदिन कामाला सुरुवात करे पर्यंत दोन्ही हातांची अंगठा आणि त्याच्याशेजारची दोन बोटे अशी तीनही बोटे एकत्र गुंफून बसायचे दिवसभरात असा निवांत वेळ मिळाला कि १५ दिवस हा प्रकार करायचाच आहे हे लक्षात ठेवा.' ' डॉक्टर याने काय होईल?' 'मी ते १५ दिवसानंतर सांगतो ओके. आणि महत्वाची सूचना देतो यात अजिबात कंटाळा करायचा नाही कारण यानंतरच आपल्याला सर्व टेस्ट करा

अतृप्त.

राजू ·
ती उजव्या हाताला वळाली आणि थोडे पुढे येताच जसजसा मेन रोडवरील लाईटचा प्रकाश अंधुक होऊ लागला तसे गडद होत जाणाऱ्या अंधाराने आणि थंडीने तिला आज अमावस्या असल्याची जाणीव झाली आणि तिची पावले आता झपझप पडू लागली. काळ्याकुट्ट अंधारातून कुडकुडत चालताना आपल्या मागून कोणीतरी येत आहे असा तिला भास झाला पण मागे वळून पहायचे तिने टाळले.आपले दोन्ही हात आपल्याच शरीराशी घट्ट पकडत ती थंडीची तिव्रता कमी करायचा प्रयत्न करू लागली तिला जिथे जायचे होते त्या ठिकाणाचे अंतर जसजसे कमी होऊ लागले तसे तिला आपल्या मागे नक्कीच कोणीतरी आहे असे वाटू लागले नव्हे आता कोणाची तरी चाहूल तिला लागली आणि आता तिचा जीव भीतीने खालीवर होऊ ल

हार नही जीत नही जहा प्यार है...

मराठी कथालेखक ·
एका सत्यकथेचा काल्पनिक उत्तरार्ध ट्रेन येण्याची वेळ झालीच होती. आळस झटकत अनिल तयारीत उभा राहिला. आजूबाजूला नजर टाकत असतानाच मोठाली बॅग संभाळत येत असलेल्या त्या स्त्रीकडे त्याची नजर गेली. तिचंही त्याच्याकडे लक्ष गेल आणि नजरभेट झाली. काही क्षण दोघे थबकले. नंतर स्वतःला सावरत त्याच्या बाजूने निघून ती पुढे गेली आणि काही अंतरावरच उभी राहिली. अनिलला क्षणभर काही सुचलं नाही , त्याने अस्वस्थ होवून पुन्हा एकदा तिच्या दिशेनं पाहिलं. शंकेला काही वाव नव्ह्ताच ..निशा.. हो, निशाच होती ती.

बोट - अग्निशमन (Fire Fighting)

स्वीट टॉकर ·
असं समजूया की नगरपालिकेचा पाणी पुरवठा विभागाचा एक कर्मचारी तुमच्या भागातलं पाणी सकाळी नऊ वाजता उघडतो आणि दुपारी दोन वाजता बंद करतो. असं समजा की त्याच्या साहेबानी त्याला सांगितलं की “आज नऊ वाजता पाणी उघडल्यावर त्याच्या जवळंच आखणी करून ठेवली आहे तिथे झाडं लावण्यासाठी एक तीन बाय तीन बाय तीन फुटांचा खड्डा कर आणि त्या रस्त्यावरचा सहावा दिवा चालत नाहिये तो बदल! तोपर्यंत दोन वाजतील. मग पाणी बंद कर आणि मगच ऑफिसला परत ये!” तर कसला स्फोट होईल!! जाऊ दे! कल्पना करण्यातंच पॉइंट नाही. भूवासियांच्या जगात विभागीकरण (compartmentalization) खूप असतं. असायला हवं देखील.

दैव जाणिले कुणी (आमच्या बोटीवर झालेल्या हल्ल्याची हकीकत)

स्वीट टॉकर ·
१२ डिसेंबर १९८८. आमची बोट ‘जग विवेक’ हजारो टन गहू घेऊन व्हॅन्कूव्हर (कॅनडा) हून सिंगापूरमार्गे भारताकडे येत होती. जगांतल्या सगळ्यात मोठ्या, पॅसिफिक महासागराच्या मधोमध होतो. अमेरिकेच्या ‘हवाई’ बेटांपासून दोनशे मैल दूर. शांत समुद्र, निरभ्र आकाश. बोट बंदरात असताना कितीही महाकाय दिसली तरी समुद्रात ती एखाद्या छोट्याश्या खेळण्यासारखीच असते. बोटीवरच्या आयुष्याची मजा काही औरच. जेव्हां वातावरण शांत असतं तेव्हां अंधार पडल्यावर डेकवर आरामखुर्ची टाकून आकाशाकडे पाहात पहुडणं म्हणजे पर्वणीच ! राजा-महाराजांच्या देखील नशिबात नाही अशी स्वच्छ हवा अन् नीरव शांतता.

दहशत - एका नव्या रूपात!

चांदणे संदीप ·
त्याने असं काय विचारल तिला की आतापावेतो गप्पांमध्ये सहभागी असणारी ऑफिसातली मंडळी अचानकपणे सुन्न झाली. आमावस्येच्या रात्री गावाबाहेरच्या जुन्या पडक्या देवळामागच्या काळोखात बुडून गेलेल्या झुडूपांमध्ये असते तशी भेदक कळा त्या झगमगत्या फॉल्स सिलींगमधल्या रोषणाईला आली होती. शांततेचा पारा तर उणे शेकड्यात जाऊन गुरफटून बसला. काहींच्या चेह-यावर अस्वस्थता इतकी दाटली की त्या ऑफिसातल प्रत्येक क्युबिकल आयसीयू वार्ड प्रमाणे भासू लागल.