Skip to main content

कला

(शोध)

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 05/02/2022 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना :) बाटलीतुन वाहणारे ओतताना लहरणारे सोड्यातून उमलणारे बर्फाशी झुंजणारे चषकाच्या पृष्ठभागी बुडबुडे साकारणारे ढोसतो मी अल्प काही जाणिवेला छेडणारे नेणिवा थिजवणारे मेंदूस व्यापणारे तनूस डुलवणारे ओठांच्या फटीतून अशाश्वत भासणारे बोलतो मी मूढ काही
काव्यरस

दोन पैश्याचं ऊन !

लेखक चौथा कोनाडा यांनी गुरुवार, 03/02/2022 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
सीन १: मुंबईतला पावसाळी दिवस, धो धो पाऊस कोसळतोय. तो पावसात चिंब भिजून आंतर्बाह्य निथळतोय ! समोर काही सेकंद थांबलेल्या टॅक्सीचे दार उघडून तो आत घुसतो. टॅक्सीत एक तरुणी आधीच बसलीय. ती त्याला उतरायला सांगतेय. धो धो पावसामुळे तो टॅक्सीतच थांबायचे आहे. तिला वाटतेय हा आपला "ग्राहक" म्हणून बसू इच्छितो ! "मी रस्त्यात एके ठिकाणी थांबणार आहे, अर्धा तास लागेल." पुढच्या दृष्यात ती एका फ्लॅटची बेल दाबते, फ्लॅटवाला दरवाजा उघडतो. ती थेट त्याच्या बेडवर जाऊन बसते. "कॉण्डोम लाया ना? " सॅण्डल काढता-काढता तिचा प्रश्न. "मी काय पैसे देत नसतो का?" तो. त्यानं कॉण्डोम आणलेला नाहीय हे ती ओळखते.

सध्या मी काय पाहतोय ? भाग ९

लेखक मदनबाण यांनी रविवार, 23/01/2022 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्पा द राइज पार्ट 1... युट्युबवर वेगवेगळी गाणी शोधताना / पाहताना अचानक या चित्रपटातील नुकतेच अपलोड झालेले स्वामी स्वामी हे तेलगु भाषेतील गाणे पाहण्यात आले होते. त्या नंतर या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यात आला. अल्लू अर्जुन ची मुख्य भुमिका असलेला हा चित्रपट पाहण्या सारखाच असे तो ट्रेलर पाहुन वाटले.

तिसरे पानिपत युध्द स्मृतीदिन - ऑनलाईन व्याख्यान निमंत्रण

लेखक मनो यांनी गुरुवार, 13/01/2022 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
तिसरे पानिपत युध्द स्मृतीदिन ऑनलाईन व्याख्यान निमंत्रण रविवार, १६ जानेवारी २०२२ सायंकाळी ६ वाजता Please click on the link of BISM YouTube channel for this programme. https://www.youtube.com/channel/UC32NxNt3qpCe6x6HNLkUvUg image

अहिल्येश्वर मंदिर

लेखक केदार भिडे यांनी सोमवार, 10/01/2022 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेम्बर २०२१ मध्ये बहिणीसोबत मध्य प्रदेशचा दौरा झाला. इंदोर, ओंकारेश्वर, महेश्वर, मांडू या ठिकाणांना भेट दिली. त्याचा वृत्तांत लिहायचा आहे. तत्पूर्वी हा एक छोटा लेख. नर्मदेच्या उत्तर तीरावर वसलेले एक छोटे शहर म्हणजे महेश्वर. तिथे विणल्या जाणाऱ्या साड्यांसाठी ते प्रसिद्ध आहे. तसेच नर्मदेवर अतिशय सुंदर घाट तिथे आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इंदोर संस्थानची राजधानी १७७२ मध्ये महेश्वर येथे हलवली. त्यांच्याच कारकिर्दीत महेश्वर येथे राजवाडा, मंदिरे, नदीवर प्रशस्त घाट बांधले. मराठी इतिहासातील या कर्तृत्ववान राज्यकर्तीने आपला देह ठेवला तोही याच ठिकाणी.

पर्यटकांचे आकर्षण - आयफेल टॉवर

लेखक पराग१२२६३ यांनी रविवार, 02/01/2022 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
आयफेल टॉवर – फ्रांसचे बोधचिन्ह. संपूर्ण फ्रांसमध्ये व्हर्सायपासून मार्सेलिसपर्यंत कितीही भव्यदिव्य राजवाडे आणि अन्य ऐतिहासिक वास्तू उभ्या असल्या तरी फ्रांस हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर जी प्रतिमा उमटते ती असते केवळ आयफेल टॉवरचीच. पॅरिसमधून वाहणाऱ्या सेईन नदीच्या किनाऱ्यावर हा टॉवर उभा आहे. त्याच्या उभारणीला सुरुवात झाली, त्या घटनेला यावर्षीच्या सुरुवातीलाच 135 वर्षे पूर्ण होत आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पॅरिसमध्ये 1889 मध्ये मोठ्या आंतरराष्ट्रीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने एका आकर्षक रचनेची उभारणी करण्याचे ठरले होते.

नवी दिल्ली @ 110

लेखक पराग१२२६३ यांनी रविवार, 12/12/2021 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटनचे राजे जॉर्ज (पंचम) आणि राणी मेरी यांचा भारताचे सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक सोहळा 12 डिसेंबर 1911 ला दिल्लीतील निरंकारी सरोवराजवळच्या बुरारी मार्गावर पार पडला होता. त्यासाठी खास ‘दिल्ली दरबार’ भरवण्यात आला होता. ब्रिटनच्या राजा आणि राणीचा भारताचा सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक करण्यासाठी दिल्लीत भरवण्यात आलेला हा तिसरा दरबार होता. राज्याभिषेकानंतर लगेचच सम्राट जॉर्ज (पंचम) याने ब्रिटिश भारताची राजधानी कोलकत्याहून दिल्लीला स्थानांतरित केल्याचे घोषित केले.

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 05/12/2021 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक,  ३ डिसेंबर २०२१, म

कोकणी आणि मराठी कवितांचा आस्वाद

लेखक चौकस२१२ यांनी मंगळवार, 16/11/2021 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
कवी बा भा बोरकर यांचं कविता म्हणजे नैसर्गिक सौदर्य आणि स्त्री सौदर्य यांचे एक शालीन मिश्रण ...
काव्यरस

मै जागू सारी रैन, सजन तुम सो जाओ

लेखक प्रदीप यांनी मंगळवार, 09/11/2021 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
तसे हे गाणे, चित्रपट आला होता ('बहुरानी', १९६३) तेव्हाच प्रथम ऐकले होते. अर्थात, सी. रामचंद्रांचे सुंदर संगीत व लताने ते गायलेले, ह्यामुळे गाणे आवडले होते. पण ह्यांतील शब्दांकडे अनेक वर्षे, मी का कोण जाणे, फारसे लक्ष कधी दिले नाही. अगदी ते साहिरचे आहे, हे माहिती असूनही. पण अलिकडे एकदा माझे लक्ष त्या शब्दांकडे गेले आणि मी - पुन्हा एकदा- साहिरच्या प्रतिभेने थक्क झालो. तर, हा लेख केवळे साहिरच्या ह्या गीताच्या लिखाणावर आहे.