Skip to main content

कला

कलासक्त, संगीतप्रेमी, सौंदर्यासक्त रसिकांना 'बघण्याजोगे' बरेच काही... (भाग १)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 13/03/2023 04:30 या दिवशी प्रकाशित केले.
काही काळापासून चित्रकला, संगीत, प्राचीन वास्तुरचना वगैरेंबद्दल यूट्यूबवर अनेक उत्तमोत्तम विडियो मी बघत आलेलो आहे. रसिकांकांसाठी ते हळूहळू इथे देत रहाण्यासाठी हा धागाप्रपंच करीत आहे. रसिक मिपाकरांनी त्यात आपापली भर टाकत राहून हा धागा समृद्ध करत रहावे, अशी विनंती करतो. सुरुवात पंडित मुकुल शिवपुत्र यांनी गायलेल्या 'जमुना किनारे मेरो गाव' या पारंपारिक रचनेने (ठुमरी ?) करतो. पं. कुमार गंधर्व, प्रभा अत्रे, राहुल/वसंतराव देशपांडे इ.

Kooman The Night Rider (कुमान द‌ नाईट रायडर)

लेखक अनुस्वार यांनी शनिवार, 03/12/2022 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
कटाक्ष: मल्याळम इंग्रजी उपनामांसाहित २ तास ३३ मिनिटे गुन्हा, थरार, रहस्य अमेझॉन प्राईम . ओळख- ही गोष्ट आहे गिरीशंकर या केरळ पोलीस दलातील CPO (सिविल पोलीस ऑफिसर) ची. एका विशिष्ट कारणामुळे गिरीशंकर प्रचंड स्वाभिमानी, अहंकारी आणि अत्यंत चालाख पोलीस अधिकारी असतो.

गाण्यासंदर्भात मदत हवी आहे.

लेखक शाहिर यांनी रविवार, 13/11/2022 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
खालील गाण्याचे अर्धेच शब्द उपलब्ध आहेत.. मिपाकरांना विनंती हे गाणे पूर्णपणे उपलब्ध असल्यास इथे पोस्ट करावे. धन्यवाद! मी पाया पडते पदर पसरते सवत मला हो आणू नका || घरात होती आई ची मी लाडकी गळसरी बापाच्या मोटेला दोर रेशमाचे शेंदरी गोगलगाय मी अशी नखानं येता - जाता खुडू नका मी पाया पडते ..........

पंचगंगातिरीचा दिपोत्सव

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 12/11/2022 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
पंचगंगा घाट पहाटे तीन वाजता कोल्हापुरामधला पंचगंगेचा घाट गाठला. त्यावेळी घाटावर लोकांची बरीच गर्दी दिसत होती. सगळ्यात आधी पंचगंगेवरच्या ऐतिहासिक शिवाजी पुलावरून घाट पाहिला, तर अजून लोकांनी तिथं लावलेल्या पणत्यांची संख्या तशी कमीच दिसत होती. इकडे पुलावरून लेसर शो घाटाच्या दिशेने सुरू होता.

रंगभूमीवरची पहाट

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी रविवार, 06/11/2022 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्पांमाजी मोगरी आणि परिमळांमांजी कस्तुरी असलेल्या माझ्या माय मराठीचं एक वैशिष्ट्य म्हणजे लवचिकता. लाकूड तेच - पण जात्यात घातलं की खुंटा होतो, गोठ्यात रोवलं की खुंट होतो आणि भिंतीत ठोकलं की खुंटी होते. त्याचप्रमाणे, चौथरा तोच - पण रस्त्याच्या कडेला असेल तर आम्ही त्याला कट्टा म्हणतो, झाडाखाली असेल तर पार आणि समोर नारळ फोडून धूप लावला की आमच्यासाठी तो होतो "रंगमंच"! बाकी ते तुमचे लाइट्स, मायक्रोफोन, विंगा वगैरे सगळे लाड आहेत. ते नसले म्हणून "प्रयोग" थांबत नाही. माझी मराठी लोकं पण जरा वेडीच. ह्यांना थ्री-डी अ‍ॅनिमेशनचं अप्रूप नाही की कुठल्या स्टीरिओफोनिक सराउंड साऊंडचं कौतुक नाही.

कांतारा ए लेजेंड

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 30/10/2022 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
कटाक्ष - मुळ‌ कन्नड चित्रपट नाट्य, थरारपट वेळ - २ तास ३० मिनिटे हिंदी परभाषीकरण (डबिंग) ओळख - नावातल्या 'ए लेजेंड' नुसार चित्रपटाची कथा एका आख्यायिकेवर बेतलेली आहे. कर्नाटकातील काही ग्रामीण लोकसंस्कृतींमध्ये आढळणाऱ्या 'भूता कोला' या परंपरेशी संबंधित ही आख्यायिका सांगून चित्रपटाची सुरुवात होते. चित्रपटात या परंपरेचा केवळ 'कोला' असा उल्लेख असून या कार्यक्रमाच्या उत्सव मुर्तीला 'देव' म्हणतात. हे देव गावातील कुणीही व्यक्ती असू शकते. एरवी सामान्य माणूस म्हणून जगणाऱ्या या व्यक्तीच्या शरीरात 'कोला'च्या वेळी वनदेव संचारतात अशी मान्यता असते.

अवती भवती तरंगे.

लेखक Deepak Pawar यांनी मंगळवार, 25/10/2022 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
अवती भवती तरंगे तुझ्याच श्वासाचा दरवळ अंतरी फुलते आहे तुझ्याच प्रीतीची हिरवळ. रस्त्यावर पाऊल खुणा कि होई आभास तुझा वाऱ्यावर गंध फुलांचा कि दरवळे श्वास तुझा जिकडे तिकडे दाटली तुझ्याच पदराची सळसळ. संध्याकाळ ही उधळीत रंग तुझ्या आठवांचे रात्र दाटता का आठवे मज पळ चांदण्यांचे? उठता बसता सारखा तुझाच भास मला हरपल. छेडूनी दुखास माझ्या आता हे सूर लाविले तू ते माझेच शब्द होते येथे जे गीत गायिले तू कशास करशी मना तिचीच तू आता कळकळ.

अनिरुध रविचंदर - वाढदिवसाच्या शुभेच्छा !

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 17/10/2022 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
तरुणाईला भुरळ घालणारे संगीत देणार्‍या संगीतकार अनिरुध रविचंदर उर्फ 'अनिरुध' याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. कोण हा अनिरुध? ते इथं वाचा.

कला आणि संस्कृती चाहत्यांसाठी झपुर्झा म्युझियम

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 25/09/2022 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातील शिवाजीनगर येथून 22 किमी आणि खडकवासला धरणापासून 8 किमी अंतरावर कुडजे गावात "झपुर्झा" हे कला व संस्कृती संग्रहालय वसलेले आहे. आपण इतिहास, कला व संस्कृती यांचे चाहते असाल तर हे म्युझियम बघायलाच हवे. पुण्यातील केळकर म्युझियममध्ये जर तुम्ही तासनतास घालवू शकत असाल तर इथेही तुम्ही संपूर्ण दिवस घालवू शकता. मी 24 सप्टेंबर 2022 या तारखेला ह्या म्युझियमला भेट दिली. येथे एकूण 10 कलादालने म्हणजे आर्ट गॅलरीज आहेत. तसेच एक एम्फीथिएटर आहे. तिथून आपल्याला खडकवासला धरणाच्या पाण्याचे सुंदर दृश्य दिसते. येथील प्रत्येक गॅलरी ही वेगवेगळ्या विषयाला वाहिलेली आहे.