मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कला

बालगंधर्व.... भाग - २ शेवटचा...

जयंत कुलकर्णी ·
लेखनप्रकार
खालील लेख वाचताना एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला हवी "त्या काळात एखाद्या कारकुनाचा पगार महिना ८ रुपये असायचा तर चांगल्या मास्तरांचा ३०-३५.'' बालगंधर्व.... भाग - १ पहिला... बालगंधर्व....

तर्राट

खटासि खट ·
लेखनप्रकार
नमस्कार आम्ही एक सिनेमा बनवत आहोत ज्याचे नाव आहे तर्राट. हा एका सामाजिक विषयाला ब ब .. वाचा फोडणारा सिनेमा असेल. सिनेमा बनवण्यासाठी जुळवाजुळव सुरू आहे. आपल्या मिपावर अनेक गुणी, होतकरू, सहृदय, ज्ञानी लोक आहेत. यातूनच तर्राटची टीम बनवावी असा निर्णय घेण्यात आलेला आहे. खालील डिपार्टमेंट मधे भरती करणे आहे. आपापला कौशल्याधारित बायोडेटा व्यनीतून पाठवावा. आणि आपणास काय येते याची झलक म्हणून प्रतिसादातून गुण उधळावेत ही नम्र विनंती १. कथा - गरजू लेखकांनी तर्राट या विषयाला न्याय देईल अशी संवेदनशील कथा लिहावी. अनेकांनी मिळून लिहीली तर प्रत्येकाला संधी मिळेल (मानधनाचे नंतर पाहू). २.

समरस व्हावे ऐसे

चांदणे संदीप ·
थांबल्या पळी या प्रेमाच्या क्षण एक तू डोळ्यांत पहा कृत्रीमतेचा उतरवून साज रेशमी मिठीत सजून पहा दे शब्दांना आधार तुझ्या गंधीत मौनाच्या साथीचा दे स्पर्श पुन्हा हळुवारपणे थरथरत्या हळव्या अधरांचा शीतल छाया, मी घनदाट तरू तू वळणारी खळखळ सरिता मी एक डोलता प्राण अचल तुज पाहून, अविचल वाहता मी धागा अतूट प्रितीचा तू फूल एक नाजूकसे गुंफता प्रित, गुंतता हृदय प्रेममाला सुरेख शोभतसे परिणीती, धुंद श्वासांची लयदार काव्यात व्हावी सूर जुळता ही तमवसने कोमल स्वरात न्हावी मी स्वत:स विसरून जावे तू असे मला निरखावे डोळ्यांनी तन्मयतेने मग युगल गीत गावे संकोच मनी, भारल्या क्षणी ना स्पर्शे उभय चित्तांशी तू अवघी तुल

सैराट : एक दाहक वास्तव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सैराट चित्रपटाबद्दल खुप लिहिल्या गेलं, बोलल्या गेलं, वाट्सपवर हमरीतुमरीवर येईपर्यंत चर्चा झाल्या. मिपावरही चर्चा रंगली आहेच, ही माझी अजून एक भर. नागराज पोपटरव मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपट प्रदर्शीत झाला आणि प्रदर्शनापूर्वीच सैराट या मराठी चित्रपटाची चर्चा खुप झाली. आणि चित्रपट प्रदर्शनानंतरही सैराट या चित्रपटाची विविध माध्यमातून अधिक उणेची चर्चा अजूनही विविध पैलूंसह सुरुच आहे, असे दिसते. नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या चित्रपटाची चर्चा खुप झाली, एक वेगळा चित्रपट म्हणुन अनेक प्रसार माध्यमांनी दखल घेतलेली होती .

मरण!

DEADPOOL ·
"अरे का तापलायेस माझ्यावर? या निष्ठुर जगातल्या लोकांनी दिलेले चटके कमी आहेत का! तु तरी घे एकदाचा जीव माझा!" म्हातारा आकाशकडे पाहुन बडबडत होता.

नाटक - कुछ मिठा हो जाये

वेल ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तसं बर्‍याच दिवसांनी नाटक पाहायला गेले होते. खरं तर मी नाटक सिनेमा कितीही पाहिले तरी त्याबद्दल फारसं लिहित नाही, पण ह्या नाटकाबद्दल जरा खासच वाटतय म्हणून म्हटलं तुम्हालाही सांगावं. "कुछ मिठा हो जाये" ह्या नाटकाने सुरुवात एका अभिनव जाहिरातीने केली. नाटकांच्या आणि सिनेमांच्या जाहिरातीत नेहमी अभिनेत्यांचे फोटो असतात पण ह्या नाटकाच्या पहिल्या काही जाहिरातींमध्ये त्यांनी नाटकाच्या लेखकांचे फोटो छापले. आणि ह्या संकल्पनेचं श्रेय निर्मात्याचं. निर्माता संतोष घाणेकर आणि सहनिर्माती मोनिका धारणकर ह्यांचे समस्त लेखक मंडळींकडून आभार. त्यांनी लेखकांचा चेहरा पुढे आणला.

मी अश्व!!

चांदणे संदीप ·
'शक्तिमान'ला ही माझी काव्यांजली समर्पित! वेग अफाट शक्ती अचाट अंगी डौल मोल अमोल निष्ठा घोर इतिहास थोर करारी बाणा सखा महाराणा बनता दळ सैन्या बळ आजीचे कथन पऱ्यांचे वाहन नीज गहाण वया परिमाण लौकिकी मती प्राणी जगती अडीच पावली चौसष्ठ आलयी पौरुष नामांकन दिव्य आभूषण मिळता सात तिमिरा मात ऋणी विश्व मी अश्व!! - संदीप चांदणे

देव गाभाऱ्याबाहेर निघाला!

DEADPOOL ·
शून्य मनाने बसलो होतो गाभाऱ्यात आली ती पलीकडुन! सांगितले कानात येताहेत भेटायला तुला! किती आनंदलो मी! बहुता दिसा भेट होणार का जन्मासी आलो मी! जगण्याला अर्थ येणार आली ती देवळात निघाली माझ्याकडे येण्यासाठी! आता रिते झाले मन नवे वर्म भरून घेण्यासाठी! थांब कुलटा घणाघात झाला! परंपरा तोडशिल? मुलाला भेटायला! परंपरा आड आली भरल्या डोळ्याने परत निघाली! मुलाला भेटावयाची इच्छा इच्छा अधुरीच राहिली! माता गेली माघारी मुलाचा कोप झाला! आणि परंपरा तोडून देव गाभाऱ्याबाहेर निघाला!

शब्दांच्या, रानातल्या गप्पा!

चांदणे संदीप ·
"दादा, तुमची ही कविता जरा समजून सांगाल का. म्हणजे, हे निसर्गचित्रण आहे का यात काही रूपकात्मक शृंगार दडला आहे जो मला नेमका दिसत नाहीये." आणि मग त्यांनी पुढे जे काही त्या कवितेतल्या चित्रणाबद्दल सांगीतले ते ऐकून/समजून माझ्या लक्षात आले की, आपण अजून कविता बुद्रूकलाही जाऊन पोचलो नाहिये, कविता खुर्द हे गाव तर लांबच! कविता होती, "जाळीवरती वाळत लुगडे, उभा हसे जरतारी काठ...." आणि कवि अर्थातच, महाराष्ट्राचे 'शेतकवी', कवि ना. धो. महानोर! रविवार दि. १०/४/२०१६ रोजी त्यांच्या राहत्या घरी म्हणजे अजिंठ्याच्या जवळ पळसखेड्याला त्यांना भेटायचा सुवर्णयोग आला होता. भेटतील का नाही? भेटतील तर कुठे? कसे?

वास्तुरचना

वैशाली अर्चिक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्या टिव्हीवर एक मालिका चालू आहे. त्यातील एका प्रमुख पत्राच्या तोंडी सतत एक वाक्य दिले आहे “ परंपरेशी तडजोड नाही”. ह्या सीरिअलमध्ये आपल्या पूर्वजांनी किती विचारपूर्वक काही नियम,चालीरिती आखून दिल्या आहेत आणि त्या पाळणे किती गरजेचे आहे वगैरे गोष्टी सांगितल्या आहेत. गंमत म्हणून ती सीरिअल पाहताना जाणवले की, खरच आपल्या पूर्वजांनी प्रत्येक गोष्टीचा किती सखोल विचार केला होता. पण दुर्दैवानी त्या मागील शास्त्र आपण समजून न घेता परंपरेच्या नावाखाली आंधळेपणाने त्याला नको तो अर्थ देत आहोत. कॉलेजमध्ये असताना आम्हाला climatology किंवा ऋतुचक्र / हवामानाबद्दल लेक्चर्स असायची.