अपेक्षाभंग करणारा TE3N
TE३N पाहिला. बरा आहे. थोडा confusing आहे. अजून छान होऊ शकला असता. दिग्दर्शकाने जर नवीन प्रयोग म्हणून Thriller चा वेग कमी ठेवला असेल तर तो प्रयोग कधीकधी पडतो. मुख्य problem हा आहे की लोक involve होत नाहीत. कथा involve होण्यासारखी असूनही.
एक सत्तरीच्या घरातला माणूस, त्याची व्हीलचेअरला खिळलेली पत्नी. गेली ८ वर्षे तो दररोज पोलिस स्टेशनला भेट देतोय. ८ वर्षांपूर्वी त्याच्या नातीचं अपहरण झालंय आणि तिचा मृत्यूही झालाय. तिला न्याय मिळवून देणं आणि या अपहरणकर्त्याला लोकांसमोर आणणं हा या माणसाच्या जगण्याचा एकमेव हेतू आहे. कुठेतरी तो आपल्या नातीच्या मृत्यूसाठी स्वतःला जबाबदार धरतोय.
मिसळपाव
...