Skip to main content

कला

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 09/04/2016 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

मराठीतल्या चांगल्या डॉक्यूमेंटरीज सुचवा

लेखक अत्रे यांनी शनिवार, 09/04/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाला मराठीतल्या चांगल्या डॉक्यूमेंटरीज माहीत आहेत का? कोणत्याही विषयावरच्या चालतील. धन्यवाद!

चोरून बघणे - आधुनिक पद्धत - २ (शतशब्दकथा)

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 07/04/2016 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
काल मयश्या, दाद्या आणि सम्या आलेले. जबड्याला, पाठीला, कढलेली आंबेहळद लावलेली बघून बेक्कार हसले! :( हरामखोर, शितलीचा भाऊ पंधराएक बाईक, डस्टर घेऊन आलेला, तेव्हा त्याच्या ग्रूपमध्ये थांबलेले! शितलीच्या भावाने मारलेलं चालल असत राव. बापाला कुणी सांगितलं? :( बापाने मार्च एंडिंगवानी हिशोब संपवला! मागचं 'घोडा' प्रकरणही काढल. मुळात चिडण्यासारखं काय होत कळेना! म्हणजे, त्या दिवशी आतेभावाच लग्न ठरल्याचं कळाल. तर आता 'घोडा' लागणार अस म्हटलेलो! आता, वरातीला घोडा नको? बापाने परवा मारताना सारख, घोडा, घोडा म्हणतच मारल! :( ते खडूतून धूर काढल्याचा राग, आता हे शितलीच प्रकरण!

चोरून बघणे - आधुनिक पद्धत (शतशब्दकथा)

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 06/04/2016 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
परवा सहज तिच्या प्रोफाईलवर क्लिक केलेलं. नवा 'डीपी' आणि 'स्टेटस्' बघायला. "Online" ह्या शब्दांतून जणू ती माझ्याकडे पाहतेय असंच वाटलं.... माझ्या हातापायातली शक्तीच गेली! वाटलं, तिने पाहिल असेन का? मी तिचं प्रोफाईल बघताना. तिला मी "Typing..." असा दिसलो असेन का? बापरे! आता कस भेटणार तिला कॉलेजात? आरारा, ओशाळून कसनुसं हसलो नि हळूच 'ब्याकचं' बटण दाबलं! पुन्हा वाटलं, ती म्हणेल, "Typing..." तर दिसलेलं, मग काहीच कस नाही लिहीलं. मग पुन्हा हिंमत करून तिच्या प्रोफाईलात गेलो आणि लिहिल... "आज पहिल्यांदाच तुझा डिपी आणि स्टेटस बघितलय ग....

साईनफेल्ड/seinfeld (1989-1998)

लेखक येडाफुफाटा यांनी बुधवार, 06/04/2016 06:51 या दिवशी प्रकाशित केले.
साईनफेल्ड(1989-1998) काल एव्हरीबडी लव्हज रेमंड च्या लेखनानंतर दुसऱ्या काही sitcoms आठवल्या ज्यांना टाळून अनेक अमेरिचनां चे तरुणपण अपुरेच राहील. भारतात देखील प्रचंड लोकप्रिय असणारी सीटकॉम म्हणजे फ्रेन्डस्/FRIENDS. आजही फ्रेंड्स या मालिकेची पारायणे/ बिंज वाचिंग करणारे भरपूर लोक्स आहेत. खास करून 20 ते 45 वयातला गट. पण फ्रेन्डस् उत्तम आहे यात तिळमात्र शंका नाही. अस्मादिकांनीसुद्धा त्याचे 22 एपिसोड्स × 10 सीझन्स अशी 10 एक वेळेस तरी रिव्हिजन मारली आहे. इतकी कि त्यातील एपिसोड्स मधील कोणते पात्र कोणते वाक्य बोलते हे ठामपणे सांगु शकतो.

एव्हरीबडी लव्हज रेमंड आणि आपण

लेखक येडाफुफाटा यांनी मंगळवार, 05/04/2016 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
एव्हरीबडी लव्हज रेमंड नावाची एक अफलातून sitcom विनोदी मालिका आहे. सध्या चालू असलेली सुमित संभाल लेगा हि मलिक हि ह्या मालिकेची सीन to सीन नक्कल आहे. कोणी साराभाई वेर्सस साराभाई मालिका पाहिली असेल तर तीही ढोबळ पणे यावरच बेतली असल्याचे लक्षात येईल. या मालिकेत एका इटालियन परिवारातील त्यांच्या प्रत्येकाच्या स्वभावाने दररोज होणाऱ्या गमती जमती दाखवल्या आहेत.

बोबडी कविता!

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 05/04/2016 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
बाबाच्या पोटावर झोपतय एक वेडं पिल्लू तोंडामध्ये अंगठा धरून हसतंय हळू खुदूखुदू! इवल्याशा बोटांच्या इवल्या इवल्या मुठीने ढुशी देत सारख्या सारख्या करतयं बाबाला गुदूगुदू! बा - बा - का - का मध्येच हसू खळखळून बोबड्या बोलांच गाणं एक फिरतंय घरभर दुडूदुडू! - संदीप चांदणे

अजून एक बार..

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 29/03/2016 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या उन्हाळ्यातली एक दुपार. टळटळत होते. बाईक घेउन निघालं. एरवी गावात आंब्या-चिंचेखालची पोरं किंवा आईस्क्रीम-कुल्फीवाला सोडल्यास विशेष लगबग नसेल. बळीराजा रानावनात झोपलेलं. दुपारचे दोन वाजत आलेलं. रस्त्यावर चिटपाखरु नव्हते. गाव नेहमीसारखंच आळसावलेलं. संध्याकाळी अजून काही कामे होती. म्हणून या भेटीकरता दुपारच उत्तम म्हणून निवडलेलं. मॅडम एका बसस्टॉपवर बसलं होतं. मला बघताच स्माईल करत उठलं. कानातले हेडफोन काढून मोबाईल पर्समध्ये ठेवलं. 'हाय' म्हणून हस्तांदोलन केलं चक्क. (असो..!) दुपार थोडी अधिकच टळटळत होतं.

पुणे परिसरातील चित्रपट रसिकांसाठी महत्त्वाचे..!!

लेखक यशोधन वाळिंबे यांनी मंगळवार, 29/03/2016 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे परिसरातील चित्रपट रसिकांसाठी महत्त्वाचे..!! पुण्याच्या 'राष्ट्रीय फिल्म संग्रहालयातर्फे देशोदेशीचे उत्तम चित्रपट दाखवणारा फिल्म क्लब चालवला जातो. दर शनिवारी संध्याकाळी सहा वाजता संग्रहालयाच्या प्रभात रोड येथील इमारतीमधील थिएटरमधे हे चित्रपट दाखवले जातात. या फिल्म क्लबची वार्षिक वर्गणी रु. १,५००/- आहे. हा खर्च आपल्या मल्टिप्लेक्स संस्कृतीत सुमारे तीन ते चार चित्रपट पाहण्याइतका आहे. यात वर्षभरात देशोदेशीचे निवडक असे किमान ५२ चित्रपट पाहता येतात. याशिवाय जानेवारीमधे पुण्यात होणार्‍या इंटरनॅशनल फेस्टिवलच्या पासाच्या किंमतीत सवलत मिळते.

दहशत - एका नव्या रूपात!

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 21/03/2016 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
त्याने असं काय विचारल तिला की आतापावेतो गप्पांमध्ये सहभागी असणारी ऑफिसातली मंडळी अचानकपणे सुन्न झाली. आमावस्येच्या रात्री गावाबाहेरच्या जुन्या पडक्या देवळामागच्या काळोखात बुडून गेलेल्या झुडूपांमध्ये असते तशी भेदक कळा त्या झगमगत्या फॉल्स सिलींगमधल्या रोषणाईला आली होती. शांततेचा पारा तर उणे शेकड्यात जाऊन गुरफटून बसला. काहींच्या चेह-यावर अस्वस्थता इतकी दाटली की त्या ऑफिसातल प्रत्येक क्युबिकल आयसीयू वार्ड प्रमाणे भासू लागल.