Skip to main content

कला

ग्रामीण साहित्यातील 'आनंद’ गेला.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 28/11/2016 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रामीण साहित्यातील 'आनंद’ गेला. सकाळीच डॉ.आनंद यादव गेल्याच्या बातमीने धक्काच बसला. डॉ आनंद यादव खूप वर्षापूर्वी औरंगाबादला आले तेव्हा आमच्या मराठवाडा साहित्य परिषदेत त्यांची भेट झाली होती. मिसळपाववर मी आनंद यादवांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांच्या अभिनंदनाचा धागा काढला होता. डॉ. आनंद यादव यांच्या भेटीत फ़ारशी ओळख नसतांनाही काही लेखक मंडळींच्या आणि त्यांच्या गप्पाही रंगल्या होत्या आम्हीही त्यात होतो तेव्हा 'वाचत राहा' हा सल्ला त्यात होता. त्यांच्या गप्पांच्या आठवणींनी आज आत जरा जरा गलबलून आलं होतं.

कसा फुलताना दिसू?

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 18/11/2016 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
नाही ओठावर हसू डोळा नुसतेच आसू उभा आत जळताना कसा फुलताना दिसू? रूपाची तुझ्या चांदी झळाळे उष्ण बेभान माझ्या उघड्या मनाने सांग कसे आता सोसू? तुझी साद खोलवर चिरत मला गेलेली आता नव्या पाखरांच्या गाण्यांना मी कसा फसू? तुला मिळालाय कोरा चकाकता तो आईना माझी जागा सांग कुठे सांग कुठे आता बसू? - संदीप चांदणे

कणकवली येथे होणारे श्री सुभाष पाळेकर ह्यांची नैसर्गिक शेती विषयी व्याख्यानमाला....

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 12/11/2016 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, दिनांक २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर ह्या दरम्यान श्री.सुभाष पाळेकर ह्यांची "नैसर्गिक शेती विषयी व्याख्यानमाला" कणकवली येथे होणार आहे. अधिक माहिती साठी श्री.सुनिल सावंत (९९६९५३४४३९) किंवा श्री. अमोल पाळेकर (९८८१६४६९३०) ह्यांच्याशी संपर्क साधावा. मी जाणार आहेच. आपलाच, (शेतकरी) मुवि ता.क. ====> सध्या माझ्याकडे आंतरजालाची जोडणी नसल्याने, वेळ मिळेल तसा मिपावर येत जाईन.

सलोना सा साजन है और मै हूँ

लेखक शान्तिप्रिय यांनी सोमवार, 07/11/2016 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
एका वाग्दत्त वधूचे किंवा प्रेयसीचे भावविश्व व्यक्त करणारी एक सर्वश्रेष्ठ गझल ! सलोना सा साजन है और मैं हूँ आता माझा सुंदर सजणा आणि मी हेच माझे विश्व आहे असे सांगत आपल्या भावविश्वाचे सुंदर वर्णन या गजलेत ही तरुणी करते. शबी अब्बास यांचे शब्द , गुलाम अली यांचे स्वर्गीय संगीत आणि आशा भोसले यांची अष्टपैलू गायकी यांनी सजलेली हि गजल रसिकांना भावून गेली नाही तरच नवल! व्हायोलिन चा लाजवाब प्रयोग संगीतात आहे. मिराज ए गजल या अल्बम मधील ही गजल !

रंगभूमी दिन

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 05/11/2016 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितों । विघ्‍नवर्गनग भग्‍न कराया विघ्‍नेश्वर गणपति मग तो ॥ कालिदासकविराजरचित हें गानीं शाकुंतल रचितों । जाणुनियां अवसान नसोनि हें महत्कृत्यभर शिरीं घेतों ॥ ईशवराचा लेश मिळे तरि मूढयत्‍न शेवटिं जातो । या न्यायें बलवत्कवि निजवाक्पुष्पीं रसिकार्चन करितो ॥ या नांदी बरोबर तिसरी घंटा झाल्यावर रंगमंचावर नटाचा परकाया प्रवेश होतो. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, केशवराव भोसले, अण्णासाहेब किर्लोस्कर, बालगंधर्व, राम गणेश गडकरी यांसारख्या दिग्गजांनी रुजवलेलं हे रोपटं विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, सतीश आळेकर यांनी याला जोपासून त्याचं वटवृक्षात रूपांतर केलं.

गीतगुंजन २३: बॅड, बॅड, लिरॉय ब्राऊन

लेखक प्रास यांनी गुरुवार, 27/10/2016 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
संगीत सृष्टीमध्ये साठच्या दशकाला एक वेगळंच वलय आहे. या काळात रॉक, ब्लूज, सोल, जॅझ, कंट्री असं भावनांच्या उत्स्फूर्त कल्लोळाला कवेत घेणारं संगीत तयार झालं, आणि त्याबरोबरच तयार झाले या संगीताला शब्द देणारे गीतकार. या संगीत प्रकाराला साजेशी गीतं लिहिणं हे खरं तर तसं कसबी काम पण हा काळच असा होता की या काळाला साजेसे गीतकार तर झालेच पण कित्येक संगीतकारांनी आपल्या संगीताला साजेशी गीतरचना करण्यास सुरूवात केली. त्यापैकीच एक गीतकार संगीतकार गायक होता जीम क्रोस. जीम लहानपणापासून संगीतात रमणारा असला तरी कॉलेजात दाखल होईपर्यंत त्याने आपल्यातल्या संगीतकार-गीतकार आणि गायकाला फारसं मनावर घेतलं नव्हतं.

हेअर कलरींग - भाग - २

लेखक कविता१९७८ यांनी बुधवार, 26/10/2016 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
चला आता सुरुवात करुया मेंदी ने . १) दुकानातुन हातावर लावण्यासाठी वापरात येणारी मेंदी पावडर आणावी. २) लोखंडाच्या कढईत आपल्या केसांच्या लांबी च्या प्रमाणात मेंदी घ्यावी. ३) पाण्यामधे चहा पावडर किंवा कॉफी उकळुन (मी कॉफी वापरते) त्यात मेंदी कमीतकमी दोन तास भिजवावी.

धोनी - ऐसी न कोई होनी

लेखक विअर्ड विक्स यांनी गुरुवार, 20/10/2016 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
सतीश राजवाडेंचा प्रेमाची गोष्ट चित्रपट पहिला असेलच !!! त्यात राजवाडेंचा एक संवाद आहे चित्रपटाचे शीर्षक कसे क्लिअर पाहिजे त्यातून लोकांना कोडी घालत बसू नयेत. " एम. एस . धोनी - the untold story " हे शीर्षक चित्रपटाला साजेसेच आहे. ह्या चित्रपटात " मेरे नाम में भी महम्मद है " वा " किसीको इतना भी मत डराओ ....

अशी स्मिता होणे नाही...

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 17/10/2016 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
लौकिकार्थाने काही लोक आपल्यात नसले तरीही त्यांच्या कार्याने, कलाकृतीने ते कायम आपल्या सोबत असतात. पु.ल. , वसंतराव देशपांडे हि अशीच काही माणसं. स्मिता पाटील पण अगदी याच रांगेत सहज सामावून जाते, ते तिच्या अभिनयामुळे. आज तिचा ६१ वा वाढदिवस. मी वाढदिवस या साठी म्हणतोय कि ती कुठे गेलीच नाही, ती कायम आपल्यात वावरत असते कधी उंबरठा मधली सुलभा बनून तर कधी जैत रे जैत मधली नाग्याची चिंधी बनून. उण्यापुर्या ७५ चित्रपट आणि ३१ वर्षांच्या आयुष्यात तिने अनेकांच्या हृदयावर अमीट छाप सोडली. दूरदर्शनची निवेदिका ते एक यशस्वी अभिनेत्री हा तिचा प्रवास खरंच रोमांचक होता.