“आम्ही काश्मीरसाठी हजार वर्षे लढू. आम्हाला गवत खावे लागले तरी चालेल. आम्ही अणुबॉम्ब बनवू.”
- झुल्फिकार अली भुट्टो.
युध्द सैन्याला नाही तर राजकारणाला हवं असतं. अयुबखान येताच युद्धाची शक्यता दिसू लागली. अखेर पाकिस्तानात लष्करी राजवट आली होती. पण जवळपास दशकभर मोठे युद्ध झाले नाही. संधी होत्या, तरीही झाले नाही. असू शकतं की अयुब खान अमेरिकेकडून पुरेश्या शस्त्रांचा जुगाड करत असेल त्यामुळे झाले नाही किंवा अमेरिकेने त्यांना रोखल्यामुळे झाले नाही. पण एका सैनिकाला दहा वर्षे काश्मीर जिंकावेसे वाटले नसेल का? युद्ध लढावेसे वाटले नसेल का?
वा ! उत्तम