'अज्ञात पानिपत'
मर्वेन टेकनोलॉजीज् यांच्याद्वारे प्रकाशित 'अज्ञात पानिपत' या माझ्या आगामी मराठी पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरु झाली आहे. या पुस्तकाविषयी अनेकांना उत्सुकता आहे. या पुस्तकाचे स्वरूप काय, ते कोणाला उपयुक्त ठरेल याविषयी थोडक्यात पुस्तक-परिचय इथे करून देतो आहे.
मराठे आणि गिलचे यांमधील पानिपतच्या तिसऱ्या युद्धाबद्दलची नवीन आणि आजवर अज्ञात अशी माहिती देणे हा पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. पुस्तकाची पहिली ३५० पाने केवळ या उद्दिष्टाला वाहिलेली आहेत.
मिसळपाव
मुंबईला पुण्याशी जोडणारा लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊन आता 160 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या मार्गामुळे या शहरांदरम्यानचा प्रवास अवघ्या काही तासांवर आला. वेडीवाकडी वळणे घेत, दऱ्या-खोऱ्यांतून, बोगद्यांमधून होणारा हा प्रवास सर्वांना कायमच रोमांचित करत आला आहे.
इंदोरमध्ये 8 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान पार पडत असलेल्या 17व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या #pravasibharatiyadivas संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
यावेळी प्रत्यक्ष खंडाळ्याच्या घाटामध्ये वेळ काढायचा असं ठरवलं होतं. अचानक निघालो आणि पटकन शिवाजीनगर गाठलं. खंडाळ्यापर्यंत जायचं असल्यामुळं सकाळच्या शेवटच्या लोकलशिवाय पर्याय नव्हता. सध्या लवकर अंधार होत असल्यामुळं दुपारची लोकल पकडून खंडाळ्याला पोहोचणं सोयीचं वाटत नव्हतं.