पाकिस्तान-८

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in जनातलं, मनातलं
15 Mar 2024 - 8:48 pm

“आम्ही काश्मीरसाठी हजार वर्षे लढू. आम्हाला गवत खावे लागले तरी चालेल. आम्ही अणुबॉम्ब बनवू.”

- झुल्फिकार अली भुट्टो.

युध्द सैन्याला नाही तर राजकारणाला हवं असतं. अयुबखान येताच युद्धाची शक्यता दिसू लागली. अखेर पाकिस्तानात लष्करी राजवट आली होती. पण जवळपास दशकभर मोठे युद्ध झाले नाही. संधी होत्या, तरीही झाले नाही. असू शकतं की अयुब खान अमेरिकेकडून पुरेश्या शस्त्रांचा जुगाड करत असेल त्यामुळे झाले नाही किंवा अमेरिकेने त्यांना रोखल्यामुळे झाले नाही. पण एका सैनिकाला दहा वर्षे काश्मीर जिंकावेसे वाटले नसेल का? युद्ध लढावेसे वाटले नसेल का? सैन्य हात बांधून कसे बसेल?  
    झुल्फिकार अली भुट्टो नसते तर कदाचित पुढेसुध्दा युद्ध झाले नसते. त्यांना पाकिस्तानातील लोकशाहीचा मसिहा म्हटले जाते तरी भारतासोबतच्या चिरंतन लढ्यातील त्यांची बुध्दी नाकारता येणार नाही. तेल-खनिज खात्यानंतर अयुब खानांच्या सरकारात परराष्ट्रमंत्री होताच त्यांनी पद्धतशीरपणे या दिशेने साम दाम दंड भेद लावून प्रयत्न सुरू केले. ते नसते तर कदाचित पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते, तसेच काश्मीर युद्धाच्या निमित्ताने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा बळी गेला नसता. आज जगात त्यांची प्रतिमा जागतिक नेत्यासारखी असूनही, कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला याबाबत विचारले असता, तो त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतो. तरीही ते कायद-ए-आझमप्रमाणेच कायद-ए-आवाम म्हणवले जातातच. तेही मोहम्मद अली जिनांसारखेच शिया मुस्लिम होते आणि एके काळी त्यांचाही तसाच रूबाब होता. तेही सैनिक नव्हते, राजकीय व्यक्ति होते.
जर हा सिध्दांत बरोबर असेल की लष्कराला युद्ध नको असते राजकारणाला हवे असते तर राजकारण्यांनीच भारतावर नेहमीच राज्य केलेय. इथे तर सतत युद्धाचीच योजना चालू असायला हवी. मी भारताला या आरोपातून मुक्त करणार नाही. भारतानेही नियोजनबद्ध पद्धतीने युद्धाच्या हालचाली केल्या. तिकडे एक भुट्टो असेल तर इथेही अनेक भुट्टो होते. पाकिस्तानी ऊघडपणे सांगतात की भारताच्या “चालबाज” राजकारणानेच फाळणीत पाकिस्तानला न्याय्य वाटा दिला नाही, काश्मीरही बळकावले आणि पूर्व पाकिस्तानही तोडला.

कच्छच्या रणमधील भारतीय छावणीतील लोकांचे सांगतात की पाकिस्तान आपल्या सीमेहून पुढे सरकत होता. तर पाकिस्तानचे म्हणणे आहे की हा त्यांचाच भाग होता. जगातील सर्वात मोठ्या खारट वाळवंटांपैकी एक, हा परिसर ओसाड आणि निर्जन होता. फाळणी झाली तेव्हा या सीमेबाबत स्पष्टता नव्हती आणि कोणाला गरजही वाटली नाही. ती जमीन आहे की समुद्राचा भाग आहे हेही स्पष्ट नव्हते. संपूर्ण जगात अशा दलदलीचे विभाजन करणे कठीण असते जिथे भौतिक सीमारेषा काढणे शक्य नसते. दुर्दैवाने भारताच्या एका बाजूला सुंदरबन होते आणि दुसऱ्या बाजूला कच्छची दलदल आणि दोन्ही बाजूला होता पाकिस्तान.
.
पण भारत खरंच आपली चाल एक पाऊल पुढे ठेऊन चालत होता. 1956 मध्येच भारतीय सैन्याने उत्तरेकडील रण ताब्यात घेतले होते. फाळणीनंतर कराची बंदर पाकिस्तानात जाताच भारताने गुजरातमध्ये कांडला बंदर बांधले. तोपर्यंत पाकिस्तान या दलदलीला फारसे महत्त्व देत नव्हता. झुल्फिकार अली भुट्टो तेल आणि खनिज मंत्री असताना त्यांना कळले की कच्छच्या दलदलीत तेल आणि खनिजे आहेत. पण, तोपर्यंत ते भारताच्या हाती जाऊ लागले होते.   
.
सगळ्यात मोठी गोष्ट पाकिस्तानच्या लक्षात थोडी उशिरा आली. हे एकमेव ठिकाण होते जिथून नौदल, लष्कर आणि हवाई दल एकाच वेळी हल्ला करू शकत होते आणि कराचीला उर्वरित पाकिस्तानपासून एका झटक्यात तोडू शकत होते. ही गोष्ट तेव्हा स्पष्ट दिसली जेव्हा मार्च 1965 मध्ये आयएनएस विक्रांत कच्छमध्ये गेली आणि भारतीय लष्कराचे गुप्त ऑपरेशन 'ॲरो-हेड' सुरू झाले.
.
.
या संपूर्ण ऑपरेशनबद्दल लाल बहादूर शास्त्री हैदराबादमध्ये म्हणाले, "पाकिस्तान फक्त काही एकर जमिनीसाठी भांडण ऊकरून काढतोय… जर त्यांचे सैन्य पुढे सरकले, तर मग आपल्याला लढावेच लागेल.”
.
या वक्तव्यानंतर भांडण कोण ऊकरून काढतंय असा प्रश्न पाकिस्तानला पडला होता. हा सारा गोंधळ भारतानेच निर्माण केला आहे नी भारतीयच पुढे सरकले नी सिंधमध्ये घुसले असे त्यांचे म्हणणे होते.

अमेरिकन राजदूताकडून विधान आले, “ही लढाई अशी सुरू झालीय जशी एखाद्या शाळकरी मुलाने खेळताना दुसऱ्याला ढकलल्यावर सुरू होते.”
ब्रिटीश राजदूत म्हणाले, “हा मुद्दा गंभीर असला तरी कोणालाही एकाला दोष देता येणार नाही. पण, पूर्णपणे नसले तरी, सत्याचे प्रमाण भारताकडे झुकलेले दिसते. “

या संपूर्ण प्रकरणाचे मूल्यमापन अभारतीय दृष्टिकोनातून निरपेक्षपणे व वस्तुनिष्ठपणे केले, तर भारतीय मुत्सद्देगिरी ‘टाॅप क्लास’ मध्ये होती. कच्छ हे एक असे युद्ध होते ज्यात पाकिस्तानला ते जिंकले असे वाटते. पण युद्धबंदीनंतर संपूर्ण रणातील फक्त दहा टक्के पाकिस्तानात गेले, नव्वद टक्के भारतात आले.     
कदाचित भुट्टो यांची शंका बरोबर असावी. हे दलदल खरोखर तेलाचा खजिना असू शकते. बरं, त्या वेळी पाकिस्तानला वाटलं असेल की ही दलदली गेली तर गेली पण काश्मीर जिंकलं पाहिजे. झुल्फिकार अली भुट्टो यांनी एक नवीन हालचाल केली - ऑपरेशन जिब्राल्टर.
(क्रमशः)
मूळ लेखक - प्रविण झा.
पुस्तक - दास्तान- ए- पाकिस्तान.
प्रकाशक- ई संपदा प्रकाशन.
https://esamaadprakashan.com/books/dastan-e-pakistan/

इतिहास

प्रतिक्रिया

Sweet poison tablet...

काही धर्मांध माणसे, ही साखरपेरणी करतात...

जाऊ द्या...

बाय द वे,

तूम्ही इतके वाचत आहात तर एक एक छान पुस्तक जरूर वाचा...

नाव... हिंदु-मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा

लेखक - अरुण सारथी

प्रकाशक - दिलीपराज प्रकाशन

....

उद्या अजून एक पुस्तक वाचावे अशी शिफारस करतो.

---

आपलाच,

जेमतेम दहावी पास शेतकरी...

मुक्त विहारि's picture

16 Mar 2024 - 4:59 pm | मुक्त विहारि

I.S.I. बद्दल संपूर्ण माहिती देणारे, खालील पुस्तक जरुर वाचा...

इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स... आय. एस. आय.

लेखक... जयंत रानडे

प्रकाशक... स्वरूपदीप प्रकाशन

------

आपलाच,

जेमतेम दहावी पास, शेतकरी

चित्रगुप्त's picture

16 Mar 2024 - 5:46 pm | चित्रगुप्त

हिंदु-मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा

अमेझॉन वर या पुस्तकाचा परिचय खालील प्रमाणे दिलेला आहे:
१९२०खिलाफत आंदोलन ही हिंदू- मुस्लिम, समस्येची गंगोत्री. १९३७ ते १९४७ मधील काँग्रेस लीग राजकारण हा त्याचा उत्कट बिंदू, स्वराज्य म्हणजे काँग्रेसचे राज्य ही गांधींची निष्ठा, स्वराज्य म्हणजे हिंदू मुसलमानांची सतत भागिदारी या समांतर संकल्पनांना मीलनबिंदू नाही हे १९३७ साली संयुक्त प्रांतात कॉंग्रेस - लीग संमिश्र मंत्रीमंडळ बनवण्याचा जीनांचा प्रस्ताव काँग्रेसने ठोकरला तेव्हाच सिद्ध झाले. यानंतर जीनांच्या दृष्टीने स्वतंत्र सार्वभौम मुस्लिम राष्ट्राला पर्याय नव्हता व ते त्यांनी हिंसाचार करून मिळविले. आजही हिंसाचार हीच हिंदू- मुस्लिम समस्या आहे. मुसलमानांच्या हिंसाचाराला सुरूवात केव्हा झाली ? पहिल्या महायुद्धात खिलाफत आंदोलनाचे प्रणेते मौ. महमद अली यांना स्थानबद्ध करण्यात आले पण इंग्रजांची जरब एवढी की मुसलमानांनी दंगल जाऊ दे. साधा निषेधमोर्चा देखील काढला नाही. मुसलमानांच्या हिंसाचाराला सुरुवात झाली गांधींच्या खिलाफत आंदोलनात. गांधींनी मुसलमानांव हिज्र, जिहाद आणि रक्तमय क्रांती या कुराणाज्ञा आहेत हे बिंबविले आणि काफीर शहादत या संकल्पनांना मान्यता दिली. १९२० साली मुसलमानांना हिंसाचाराची चटक लागली ती आजतागायत सुटलेली नाही. आणि हीच खरी हिंदू- मुस्लिम समस्या आहे. गांधींनी मुसलमानांच्या हिंसाचाराचा पाया घातला आणि त्यावर जीनांनी कळस चढविला. त्याची ही कहाणी आहे.

कारण,

ह्या पुस्तकाच्या विषयाच्या अनुसंगाने, इतरही बरीच पुस्तके वाचावी लागतील.

विशेषतः सावरकर आणि सरदेसाई यांची ....

काही विषय असे असतात की, सर्वांगीण वाचन, मनन आणि चिंतन केल्याशिवाय, त्या विषयांवर बोलू किंवा लिहू नये.

शिवाय असे विषय कधीच एका चौकटीत बंदिस्त करता येत नाहीत.

आमचे, बाबा महाराज डोंबोलीकर अशा विषयांना, अमिबा म्हणतात...

टर्मीनेटर's picture

16 Mar 2024 - 9:08 pm | टर्मीनेटर

ह्या पुस्तकाच्या विषयाच्या अनुसंगाने, इतरही बरीच पुस्तके वाचावी लागतील.

+१
खाली चित्रगुप्त काकांना दिलेल्या प्रतिसादात उल्लेख केलेले 'Pakistan or Partition of India' हे पुस्तक (आधी वाचले नसल्यास) जरुर वाचा असे सुचवतो!
त्यात एका खऱ्या 'महामानवाने' पुढे 'महात्मा' म्हणुन आपल्या माथी मारल्या गेलेल्या एका भंपक राजकारण्याची चांगलीच पिसे काढली आहेत 😀

आझाद हिंद सेनेचे जे सैनिक पाकिस्तान सेनेत भरती झाले त्यांना सर्व प्रकारचे स्थैर्य मिळाले.

पण, आझाद हिंद सेनेचे जे सैनिक भारतात राहिले, त्यांना भारतीय सेनेत समाविष्ट केले नाही.

या पुस्तकात मागल्या शेकडो वर्षांतील आक्रमणकर्त्यांबद्दल, कत्लेआम, देवळे भग्न करणे, स्त्रियांची विटंबना वगैरेबद्दल काहीच नाही का ? वैमनस्य १९२० पासून सुरु झाले ? कैच्याकै.

टर्मीनेटर's picture

16 Mar 2024 - 8:56 pm | टर्मीनेटर

मी हे पुस्तक वाचले नसल्याने "या पुस्तकात मागल्या शेकडो वर्षांतील आक्रमणकर्त्यांबद्दल, कत्लेआम, देवळे भग्न करणे, स्त्रियांची विटंबना वगैरेबद्दल काहीच नाही का ?" ह्याविषयी अनभिज्ञ आहे. परंतु आपण आधिच्या प्रतिसादात अमेझॉन वरील ह्या पुस्तकाचा जो परिचय दिला आहे त्यातील खाली दिलेले वाक्य मात्र खटकले.

पहिल्या महायुद्धात खिलाफत आंदोलनाचे प्रणेते मौ. महमद अली यांना स्थानबद्ध करण्यात आले पण इंग्रजांची जरब एवढी की मुसलमानांनी दंगल जाऊ दे. साधा निषेधमोर्चा देखील काढला नाही.

डॉ. बाबासहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या 'Pakistan or Partition of India' हे पुस्तक वाचले आहे. त्यात बाबासाहेबांनी 'खिलाफत चळवळ' आणि त्यातुन पुढे घडलेले 'मोपला हत्याकांड' ह्यावर प्रकाश टाकताना मो.क. गांधींवर सडकुन टीका केली आहे. त्यात लिहिले आहे, २० ऑगस्ट (१९२०) रोजी पिरुननगडी येथे मोपला आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या घनघोर लढाइ/चकमकीचेही वर्णन आहे. माझ्याकडे त्या पुस्तकाची PDF प्रत असल्याने त्यातली वाक्ये कॉपी पेस्ट करता येत नसल्याने खाली ते वर्णन असलेल्या पृष्ठ क्र. १५३ ची इमेज देत आहे.
.
mopal

टर्मीनेटर's picture

16 Mar 2024 - 10:26 pm | टर्मीनेटर

छोटीशी दुरुस्ती.
मी गुगल इनपुट टूल्स वर टंकून इथे पेस्ट करतो.त्या कॉपी-पेस्टच्या खटाटोपात वरिल प्रतिसादात एक वाक्य पेस्टवायचे राहिले असल्याचे पुन्हा वाचतान लक्षात आले 😀

पहिल्या महायुद्धात खिलाफत आंदोलनाचे प्रणेते मौ. महमद अली यांना स्थानबद्ध करण्यात आले पण इंग्रजांची जरब एवढी की मुसलमानांनी दंगल जाऊ दे. साधा निषेधमोर्चा देखील काढला नाही.

ह्या वाक्यानंतर खालचे वाक्य वाचावे...
१९२० पूर्वीही ब्रिटिश राजवटीत १८८२, १९१७, १९१८ साली हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या आहेत. परंतु त्यातला नरसंहार आणि अत्याचारांचे प्रमाण इतके भीषण नव्हते जितके १९२० पासून पुढे वाढत गेले.

टर्मीनेटर's picture

16 Mar 2024 - 9:12 pm | टर्मीनेटर

हा भागही छान...
आता 'ऑपरेशन जिब्राल्टर.' च्या प्रतिक्षेत...

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Mar 2024 - 9:50 pm | अमरेंद्र बाहुबली

सर्वांचे आभार.