मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहास

पाकिस्तान-५

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
लोकशाहीचा दिवा विझण्यापूर्वी एकदाच फडफडला. भारतात प्रबळ विरोधी पक्ष उदयास यायला दशके गेली, एक पक्ष कितीतरी वर्षे विनासायास जिंकत राहिला; पाकिस्तानात मात्र विरोधी पक्ष लगेच तयार झाला. पाकिस्तानची निर्मिती करणाऱ्या मुस्लिम लीगचे दोन्हीही संस्थापक मरण पावताच विघटन होऊ लागले. पाकिस्तान स्वातंत्र्यानंतर पहील्या दशकापर्यंत प्रजासत्ताक झाला नव्हता, आणि ब्रिटिश अधिराज्याचा भाग होता. तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तानची महाराणी एलिझाबेथ होती जशी ओस्ट्रेलिया नी कॅनडाची होती. पाकिस्तानात गव्हर्नर जनरल आणि पंतप्रधान होते, पण राष्ट्रपती नव्हते. त्यातही सत्तेचा विचित्र हिशोब होता.

पाकिस्तान-४

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
. पाकिस्तानला एकत्र करत होता ईस्लाम आणि त्याला तोडत होती विविधता. प्रत्येक प्रांताची संस्कृती वेगळी होती. बरं, भौगोलिक अंतरही पूर्व पाकिस्तान नी पश्चीम पाकिस्तानात बरंच होतं आणी मध्यभागी होता भारत. आता दिल्लीहून ट्रेन पकडून पाकिस्तानी मुत्सद्दी किंवा सैनिक कलकत्ता आणि ढाक्याला कसे जाऊ शकनार होते? मात्र, सामान्य नागरिक भारतीय रेल्वेनेच सीमा ओलांडून पूर्व पाकिस्तानात जात असत. एका पाकिस्तानी माणसाच्या म्हणण्यानुसार, हे खूप महाग पडायचे, नी गरजही नव्हती.व्यापारी ट्रक भारतामार्गेच पाकिस्तानात जात असत.

रेवदंड्याचं दर्शन

पराग१२२६३ ·
Korlai कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता.

शापित डबल धमाका: थोर स्वातंत्र्यसैनिक-वैज्ञानिक - पांडुरंग सदाशिव खानखोजे

सुधीर कांदळकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पांडुरंग सदाशिव खानखोजे हे नाव आपल्याला शालेय पाठ्यपुस्तकात कधी वाचायला मिळाले नसेल. ना इतिहास विषयात ना भूगोलात. राजकीय व्यक्तींना काही विशिष्ट विचारांचे वावडे असते वा काही विचारधारा त्यांना अडचणीच्या वाटतात. शालेय पाठ्यपुस्तकात काही थोर व्यक्तींना हेतुपुरस्सर वगळलेले आढळून येते तर काही व्यक्तींचे अवाजवी उदात्तीकरण केलेले दिसून येते. काही काल्पनिक पात्रे पण इतिहासात हेतूपूर्वक घुसविल्याची पण उदाहरणे आहेत. तसेच शिक्षणतज्ञांना देखील असे काही विचारधारांचे वावडे असावे. इतिहासकारांनी देखील असेच काही व्यक्तींवर अघोषित गौरव/प्रसिद्धी-बहिष्कार टाकलेला आढळून येतो.

वार्तालाप: अहल्या शिळा राघवे मुक्त केली

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अहल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागतां दिव्य होऊनी गेली. जया वर्णिता सिणली वेदवाणी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. समर्थ म्हणतात, श्रीरामांच्या चरणांचा स्पर्श होताच शिळा रुपी अहल्या मुक्त झाली. हा श्लोक वाचतना, अनेक प्रश्न मनात आले. अहल्या खरोखर शिळा झाली होती का? श्रीरामांच्या चरणाचा स्पर्श होतास ती पुन्हा मूळ स्वरूपात आली, हे कसे संभव आहे? समर्थांच्या या श्लोकाचा भावार्थ वाल्मिकी रामायणातील कथेत शोधण्याचा प्रयत्न मी आपल्या अल्प बुध्दीने केला आहे. महर्षि विश्वामित्र, राम, लक्ष्मण आणि अनेक ऋषी मुनीं सोवत मिथिलेत पोहोचले. श्रीरामांना तिथे एक ओसाड निर्जन आश्रम दिसले.

पाकिस्तान-३

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
पाकिस्तान हा ब्रिटिश भारताचा एक छोटासा भाग होता. डिस्कनेक्ट होताच गाडी पुढे सरकू लागेल, अशी स्वतःची यंत्रणा नव्हती. तिथली अर्थव्यवस्था हिंदूच्या हाती होती जे फाळणीनंतर भारतात आले होते. रावळपिंडी नक्कीच मोठी छावणी होती, पण संपूर्ण सैन्य मुस्लिम सैन्य नव्हते. प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्या घेतली तर सुमारे बाराशे अधिकाऱ्यांपैकी शंभर अधिकारी मुस्लिम होते, त्यापैकी वीस जणांनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला.

पाकिस्तान-२

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
. शालेय इतिहासात कोणती घटना घडली, केव्हा आणि कुठे घडली हे शिकवले जाते. पण, एखादी विशिष्ट घटना का घडली, कुठे चूक झाली, हे कमी शिकवलं जातं? हे विधान ॲडॉल्फ हिटलरने लिहिलेल्या 'माईनकाम्फ' मधील आहे, पण ते अर्थपूर्ण आहे. मी हिटलरला पाकिस्तानच्या इतिहासात असाच आणत नाहीये. तर त्याला मुख्य पात्रांत स्थान देतोय. शेवटी, 1947 च्या दोन दशकांपूर्वीच पाकिस्तानची मागणी का उद्भवली? वेगळा मुस्लिम देश यापूर्वीही निर्माण होऊ शकला असता.

‘‘कोन्डोसे - Marquis de Condorcet. (17 September 1743 – 29 March 1794)

जयंत कुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार! फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये अनेक थोर विचारवंत होवून गेले जे मरेपर्यंत आपल्या तत्त्वांना चिकटून राहिले. या राज्यक्रांतीने अनेक नवनवीन विचारांना जन्माला घातले. मुख्य म्हणजे राज्यघटना हा प्रकार जन्माला घातला. हे सगळे असले तरीही ही राज्यक्रांती फ्रान्ससाठी फसलीच म्हणायची... का? ती चर्चा पुस्तकात मनोगतात करण्याचा विचार आहे. राजेशाही नष्ट केली आणि कॅथोलिकांचा प्रभाव कमी केला. फ्रेंच राज्यक्रांतीत जी काही प्रमूख मंडळी होती त्यात एक होता ‘‘कोन्डोसे - Marquis de Condorcet. (17 September 1743 – 29 March 1794) त्याने नुसता राजकारणात भाग घेतला नाही तर तो एक अत्यंत बुद्धिमान गणिती होता.

पाकिस्तान - १

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
दरबार-ए-वतन में जब इक दिन सब जाने वाले जाएँगे कुछ अपनी सज़ा को पहुँचेंगे, कुछ अपनी जज़ा ले जाएँगे -फ़ैज अहमद फ़ैज 16 ऑक्टोबर 1951. कंपनी बाग, रावळपिंडी. त्या दिवशी, लियाकात अली खान एक लाखाच्या जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी मंचावर जात असताना आपल्या समोर संपूर्ण देश जमलेला पाहत होते. जे स्वप्न त्यांनी, मोहम्मद अली जिना, सुहरावर्दी, अल्लामा इक्बाल आणि इतर अनेकांनी एकत्र पाहिले होते. ब्रिटिश भारतातील मुस्लिमांसाठी एक पाकिस्तान. पण पाकिस्तान हा शब्द कसा अस्तित्वात आला? हजारो वर्षांपासून मुस्लिम भारतात राहत होते, पण त्यांच्या जिभेवर हा शब्द कधी आला नव्हता.

रुपकुंड : शेकडो प्राचीन सांगाड्याने भरलेला विलक्षण तलाव

chittmanthan.OOO ·
लेखनविषय:
भव्य हिमालयातील उंच, बर्फाच्छादित शिखरे आणि चित्तथरारक खोऱ्यांमध्ये वसलेले, एक थंडगार रहस्य असलेले सरोवर आहे: रूपकुंड, ज्याला स्केलेटन लेक देखील म्हटले जाते. 16,500 फूट उंचीवर असलेल्या या पाण्याच्या शरीरात एक भयंकर रहस्य आहे - त्याचे किनारे शेकडो प्राचीन सांगाड्यांनी भरलेले आहेत, त्यांचे मूळ एका वेधक गूढतेने झाकलेले आहे ज्याने इतिहासकार आणि शास्त्रज्ञांना अनेक दशकांपासून चकित केले आहे. सांगाड्याचा शोध हा भीषण शोध 1942 मध्ये हरि किशन मधवाल नावाच्या वन रेंजरने लावला होता.