नाशिक जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे

लेखनविषय:
नर्मदा ते तुंगभद्राच्या जलरेघेतील महाराष्ट्रच्या ऐतिहासिक वारसास्थळांच्या अभ्यासास एकत्रित करण्यासाठी 'मध्ययुगीन मंदिरे' या संदर्भाने स्थळांची यादी करावयास घेतली आहे. याची सुरुवात राहत्या नाशिक जिल्ह्यापासुन करत आहे. या सर्व स्थळांना येत्या पाच वर्षात प्रत्यक्ष भेट देण्याचे व्यक्तिगत उद्दिष्ट ठेवले आहे. यातील वास्तुंचा विचार करताना मुख्यत्वेकरुन मराठापुर्व कालीन धार्मिक वास्तुंचाच विचार केला आहे. आंतरजालावरील उपलब्ध माहिती, गुगल लोकेशन व मॅपिंग करुन राज्यभरातील सर्व ठिकांणाचा एकत्रित नकाशा तयार होईल जो अभ्यासु व पर्यटकांसाठी उपयुक्त राहील.

प्रतिपश्चंद्र

लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी ! ऐतिहासिक मराठी पार्श्वभूमीवर हिंदी जाल दुनियेतील मालिका बघण्याचा मनसुबा असेल तर पुढील लेख वाचून आपणास एक पर्याय मिळू शकतो. " प्रतिपश्चंद्र " हि डॉ प्रकाश कोयंडे लिखित एक ऐतिहासिक रहस्य कादंबरी आहे. या कादंबरीवर आधारित " द सिक्रेट्स ऑफ शिलेदार " हि मालिका तप्ततारा जालदुनियेवर उपलब्ध आहे. "NATIONAL TREASURE MOVIE " पठडीतील हि मालिका आहे. हि मालिका आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केली आहे. मध्यवर्ती भूमिकेत राजीव खंडेलवाल आणि सई ताम्हणकर आहेत. जोडीला दिलीप प्रभावळकर ,आशिष विद्यार्थी आणि कानन अरुणाचलम आहेत. रहस्य कथा असल्यामुळे कथाविस्तार टाळतो.

राजकुमार, बुटका आणि राक्षस: नवी कहाणी

लेखनविषय:
लेखनप्रकार
एक जुनी भारतीय नीति कथा - राजकुमाराने बुटक्याच्या मदतीने राक्षसाला ठार मारले. राजकुमारला राजकुमारी मिळाली. युद्धात बुटक्याचे हात पाय तुटले. बुटक्याच्या नशीबी भीक मागण्याची पाळी आली. आजच्या कथेत फरक एवढाच राजकुमार स्वत: युद्धात उतरला नाही. त्याने बुटक्याला युद्धासाठी अस्त्र-शस्त्र दिले. राक्षस तर मेला नाही पण बुटका युद्धात जबर जखमी झाला. एवढेच नव्हे तर राक्षसाने बुटक्याचे अर्धे राज्य ही गिळंकृत केले. आता राजकुमाराला अस्त्र-शस्त्रांच्या मोबदल्यात बुटक्याचे उरलेले अर्धे राज्य पाहिजे.

नांदेड जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे

गेल्या आठवड्यात धावता नांदेड दौरा होता. अगदी थोडा वेळ काढूनही शहरा नजीकच्या प्राचीन मार्कंडेय शिव व ऋषी मंदिराला भेट दिली. मंदिरापर्यंत पोहोचण्याचा रस्त्याचे अर्धवट काम सुरू असल्याने प्रत्येक ठेचीला सोबतींच्या शिव्या खात गोदावरी किनारच्या या मंदिरात पोहोचलो. परिसर आणि बाह्य भागाचे सुशोभिकरण सुरू असल्याने प्रथमदर्शनी निराश होत मंदिरात प्रवेश केला. शिव मंदिराची संपूर्ण वास्तूचे दगड क्रमवार उतरवून ठेवले आहेत. होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिर देखील अश्याच पद्धतीने पूर्णत नव्याने रचले आहे. सध्याच्या वास्तूत कोणतेही कलाकुसर नसलेला मुख्य मंडप व गर्भगृह अद्यापि शाबुत आहे.

शिवजयंती

लेखनविषय:
त्या पोराचे वडील तसे नामी सरदार होते बरं. आज आपण उपहासाने जो जहागीरदार शब्द वापरतो तसा त्या मुलाचा बाप खरंच खूप मोठा जहागीरदार होता. पैशापाण्याची, सेवेकऱ्यांची कमी नव्हती. त्या तरुणाने सगळी हयात मजा मारण्यात घालवली असती तरीसुद्धा तो काही चुकला असं कुणीही म्हणू शकलं नसतं. परंतु गर्व आजपर्यंत कुणाला चुकला? तुम्ही पुराणे उचकून पहा, परमेश्वरी अवतारांना सुद्धा गर्वाची बाधा झाल्याचे क्षण तुम्हाला सापडतील. असाच गर्व या विश्वाची निर्मिती करणाऱ्या आदियोगी-आदिशक्तीला झाला. आणि अनंत विश्वातल्या अनंत चुका अनंत चाचण्यांनी सुद्धा ज्याच्यात सापडणार नाहीत असा युगपुरुष निर्माण करण्याची नियतीला इच्छा झाली.

प्रभास पाटण अर्थात सोरटी सोमनाथ महत्व

लेखनविषय:
आपल्याकडे 12 ज्योर्तीलिंगांचे महत्व आहे. आसेतूहिमाचल विस्तार असलेल्या ह्या प्रचंड देशात ही बाराही ज्योतिर्लिंगे विखूरलेली आहेत. काही पोचायला सोप्या अशा ठिकाणी, काही घोर जंगलात, केदारनाथ सारखे ठिकाण तर अत्यंत दुर्गम अशा हिमालयात तर सोमनाथ हे समुद्र किनारी! त्यापैकी सोरटी सोमनाथ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या मंदिरात जाण्याचा योग नुकताच आला. धार्मिक मान्यतेनुसार ह्या मंदिराचा क्रमांक पहिला येतो. बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा इथून सुरु करण्याची पद्धत आहे. माझा असा काही मानस नव्हता. पण त्यानिमित्ताने ह्या मंदिराविषयी थोडं वाचन केलं आणि लक्षात आलं की ह्या मंदिराचा इतिहास अत्यंत रोमांचक आहे.

गीतारहस्य चिंतन-२

लेखनविषय:
गीतारहस्य चिंतन -१ #कर्मजिज्ञासा२ * अस्तेय (चोरी) एकाने यथान्याय मिळवलेली संपत्ती चोरून किंवा लुटून नेण्याची इतरांना मोकळीक मिळेल तर द्रव्यसंचय करण्याचे बंद पडून सर्वांचेच नुकसान होईल, समाजाची घडी विस्कळून सर्वत्र अनवस्था होईल हे निर्विवाद आहे.

बनेश्वर मंदिर (तळेगाव दाभाडे) भटकंती

लेखनविषय:
लेखनप्रकार
मॉल मधली थोडीफार खरेदी संपल्यानंतर बाहेर पडताना मोबाईल वाजला बघितला बघितला तर बबनचा फोन. घाईत होतो, त्यामुळे प्रश्न पडला फोन घ्यावा की नाही. पण मग घेतला फोन. उत्तरलो " मार्केट मध्ये शॉपिंगच्या गडबडीत आहे. घरी गेल्यावर फोन करतो " बबन म्हणजे माझा जुना दोस्त. गेल्या अनेक वर्षाचा सहवास. आमचं बोलणं सुरू झालं की खूप वेळ चालायचं.. म्हणजे एक तासाच्या वरच. वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चा रंगायच्या. शॉपिंग आटोपून घरी गेल्यावर त्याला फोन केला. बबन : अरे... काय, कुठे आहेस तू ? बबनचं असंच आहे.

जॉन अब्राहम (भाग ५)

लेखनविषय:
a ==> a ==> a ==> a त्यामुळं अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरीला विरोध केला. अमेरिकेत त्यांनी कृष्णवर्णीयांच्या स्वातंत्र्यासाठी आवाज उठवाला.

जॉन अब्राहम (भाग ४)

लेखनविषय:
जॉन अब्राहम (भाग १) ==> जॉन अब्राहम (भाग २) ==> जॉन अब्राहम (भाग ३) जेव्हा स्पष्टपणे गुलामगिरीविरोधी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार अब्राहम लिंकन यांनी १८६० च्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला, तेव्हा सुरूवातीला सात दक्षिणी राज्ये (दक्षिण कॅरोलिना, मिसिसिपी, फ्लॉरिडा, अ‍ॅलाबामा, जॉर्जिया, लुझियाना आणि टेक्सस) यांनी धोका पत्करला आणि संघटित होऊन अमेरिकेतून वेगळे होऊन नवीन देश निर्माण करण्याचा निर्णय घेतला .
Subscribe to इतिहास