हे ठिकाण
अमेरिकन रस्ते -२ इंटरचेंज
अमेरिकेतील रस्ते विविध प्रकारचे आहेत. काही रस्ते हे जास्त अंतर कापण्यासाठी असतात आणि तिथे सिग्नल्स अजीबात असत नाहीत. सिग्नल्स नाहीत तर मग क्रॉस ट्रॅफिक कसे असेल ? नवीन गाड्या त्या रस्त्यावर कश्या येतील किंवा ज्यांना त्या रस्त्यावरून बाहेर जायचे असेल ती मंडळी रास्ता कसा सोडतील ?
तुम्हाला मुख्य रस्त्यावरून बाहेर जायचे असेल तर त्याला "एक्सिट" असे म्हणतात. एक्सिट अनेक प्रकारची असतात आणि प्रत्येकाचे आपले असे वैशिष्ट्य असते. हा संपूर्ण विषय ट्रॅफिक इंजिनीरिंग ह्या विषयांत येतो आणि हा विषय सिविल इंजिनीरिंग चा एक भाग आहे.
यकु
मिपावर मनस्वी लिहायचे त्यापैकी एक होता
होता म्हणवायचे धजत नाही
जे वाट्टेल, ते लिहायचा !
भेटणे न भेटणे वेगळे , पण स्पर्श करून गेला
यकु कुठे गेला ?
परिक्रमा असो , हलके फुलके लेख असोत , कन्फेशन असो नाही तर आणी काही
जे वाट्टेल, ते लिहायचा
यकु कुठे गेला
ट्रिब्युट
- उन्मेष
(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)
प्रेर्ना - मातीचे पाय
पयन स्प्र्शुन अले
ते हत मलले होते
लक्क उमग्ले तेवहा
ते पय मतिचे होते
मि केवल पहत होतो
पयन्च्य खल्चि धुल
ति ललतस लववि
हे एकच मथि खुल
मि इथ्वर पहुन अलो
पौल्खुना विर्नर्या
अधि कुन्वत, मगुन
कप्ति विकत हस्नर्या
अत पुन्ह चलवे पुधे,
कि परत फिर्वे?
सोस न-लयक पयन्चे
पुसुन अव्घे तकवे?
प्रेमल श्ब्दन्चि ओल
मनत र्झिपत नहि
व्हवे नत्मस्त्क
पयहि दिसत नहि
ते सरेच निगुन गेले
जे पय दरवे सुच्ले
मतिचे पत मत्कट
मगे मज्यसह उर्ले
टंकनीक चमनगोटा दाढिमिशि
श्निवार ०८/०७/२०२३
काव्यरस
पाऊस
पाऊस
----------------------------------
आई गं
सरसर पाऊस आला गं
जाऊ दे भिजायला गं
क्षणात ऊन कुठे लपलं
जोरदार वारं हे सुटलं
वास भारी मातीला गं
जाऊ दे भिजायला गं
शेजारची पोरं अंगणात
फेर धरुनी रिंगणात
जाऊ दे फेर धरायला गं
जाऊ दे भिजायला गं
पाण्याच्या झाल्या नद्या
सोडू गं त्यात होड्या
दे ना कागद करायला गं
जाऊ दे भिजायला गं
बरं ऐकतो मी तुझं
जातो छत्री घेऊन
पण बाहेर नेऊन
मी बंदच ती करेन
नाहीतर तूच चल भिजायला गं
मस्त मस्त धारा झेलायला गं
--------------------------------------------------
काव्यरस
एका नोटेची छोटी गोष्ट…
एका नोटेची छोटी गोष्ट…..
एक पाचशेची नोट बरेच दिवस पाकिटातहोती. कुठून आली माहित नाही. अजिबात फाटली नव्हती पण बहुतेक धुतली गेल्यामुळे पुसट झाली होती बऱ्याच ठिकाणी चालवायचा प्रयत्न केला पण कोणी घेतच नव्हता बँकेच्या डिपॉझिट मशीन मध्ये देखील भरायचा प्रयत्न केला पण तीथेही रिजेक्ट झाली..
मग शेवटी ज्या राष्ट्रीयकृत बँकेत माझे खाते आहे तीथे गेलो. आधी शीस्तीत रांगेतून जाऊन कशिअर कडे नोट बदलून मागीतली…त्याने नकार दिला. मग त्याला म्हंटले माझ्या खात्यात जमा कर…तर ही नोट चालणार नाही….घाटकोपर ला जाऊन बदला असा सल्ला मीळाला.
मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर, यांना श्रध्दांजली - पुण्यतिथी ४
तात्या १५ मे २०१९ रोजी वारले. साधारणतः २००७ मध्ये मिपाची स्थापना केली. आपल्या सारख्या अनोळखी लोकांना मन मोकळे करण्याचा आणि उत्तमोत्तम लेखनाचा आस्वाद घेण्याचा मार्गे उपलब्ध करुन दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.
त्यांच्या विषयी इतरांनी भरभरुन लिहिले आहे.
(मराठी भाषा गौरव दिन २०२३ - विडंबन विशेष!)
पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी बेहत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही ! - चालचलाऊ गीता, जयकृष्ण केशव उपाध्येविडंबन.. मराठी वाङमयामधील एक विशेष प्रकार. एखाद्या लोकप्रिय रचनेचे (बहुतेकदा विनोदी अथवा उपहासात्मक) अनुकरण, अशी विडंबनाची साधारण व्याख्या करता येईल. मराठी लेखनात दर्जेदार विडंबनाची दीर्घ परंपरा आहे.
धाडसी धोंडू
धाडसी धोंडू
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
एखाद्या लहान मुलाचा कोणी पोवाडा म्हणतं का ? पण गोष्टच तशी घडली असेल तर ? त्याचं झालं होतं असं ...
ही गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातली .
श्रावणाचे दिवस . दुपार संपायला आलेली . सोनेरी ऊन पसरलेलं. हिरव्या गवतावर नुकत्याच पडलेल्या सरीचे थेंब . सारा माळ हिरवागार झालेला . आकाशात मधूनच जाणारा एखादा पोपटांचा थवा. त्या माळावर छोटा धोंडू उभा होता . सावळासा , काटकुळा . तो धनगर होता . वेषही तसाच . गुढघ्यापर्यंत पांढरं धोतर , तसाच सदरा , डोकीवर लाल मुंडासं .
मिपा 'अचानक' कट्टा - भाजे लेणी - २२ जानेवारी २०२३
p {text-align:justify;}
मिसळपाव