मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हे ठिकाण

पेय निघून गेले (विडंबन)

कांदा लिंबू ·
प्रेरणा: ते दिवस निघून गेले टेबलावर प्याले आपटून आणखी-आणखी भरण्याचा हट्ट करून धुंद धुंद होत रिचविण्याचे ते दिवस निघून गेले. मित्रांमध्ये पिऊन-पाजवून विकांताला पार्ट्या करून तरीही बुधवारी नाइन्टी मारण्याचे ते दिवस निघून गेले. थोडीशीच वोडका पिऊनसुद्धा आपल्या घरी जाऊन बायकोचा ओरडा खाण्याचे ते दिवस निघून गेले.

जय रायरेश्वर

बिपीन सुरेश सांगळे ·
जय रायरेश्वर ------------------------------------------------------------------------------------------------------------- सकाळची प्रसन्न वेळ. रायरेश्वराचं अफाट पठार. पठारावरून ऊन हळूहळू खाली दरीत उतरत होतं. तर शिवाजीराजे किल्ल्यावर जात होते. सारीकडे पिवळं पडलेलं गवत. त्यामुळे पठार सोनेरी भासत होतं. आणि तो सोन्याचाच दिवस नव्हता काय ? आज राजे आणि त्यांचे सहकारी किल्ल्यावर चालले होते, ते रायरेश्वराच्या देवळात शपथ घ्यायला. साधीसुधी शपथ नाही, तर स्वराज्य स्थापनेची ! तो दिवस होता - २७ एप्रिल १६४५. राजांनी देवळात प्रवेश केला आणि त्यांच्या सवंगड्यांनीही.

पुस्तक प्रकाशन

बिपीन सुरेश सांगळे ·
२५ मार्च २०२० या दिवशी कोरोनामुळे लॉक डाउन करण्यात आले . त्यानंतर अनेक लोकांनी त्या काळात सेवा किंवा समाजसेवा केली , पण त्यांच्यामध्ये असेही काही लोक होते की ज्यांनी विशेष कार्य केलं . प्रेरणादायी !अगदी हटके ! अशा २७ लोकांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून विवेक स्पार्क फाउंडेशन या संस्थेनं , एक पुस्तक निर्मितीचा उपक्रम हाती घेतला आणि तो आता पूर्ण झाला देव पाहिलाय आम्ही असं त्या पुस्तकाचं नाव आहे आणि ते कार्य कथा रूपात मांडण्यात आलंय . त्याचं प्रकाशन आज संध्याकाळी होत आहे - २५ मार्च २०२४ ६.

मनी वसे ते

बिपीन सुरेश सांगळे ·
मनी वसे ते -------------------------------------------------------------------------------------------------------- २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होता. त्यादिवशी रात्री शाळेत थांबायचं ठरलं. सर असं म्हणल्यावर त्या कल्पनेने वरुणला धमाल वाटली. त्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन होता.त्याच्या तयारीसाठी मुलं काम करणार होती. मराठी भाषा गौरव दिन म्हणजे कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. त्यानिमित्ताने तो दिवस साजरा करण्यात येतो. तर, विज्ञानदिन हा सर सि.व्ही. रामन यांच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येतो.

ही बाईपण भारी देवा

बिपीन सुरेश सांगळे ·
ही बाईपण भारी देवा ------------------------------------------------------------------------------------------------------------- सन २०३३. सुनीतच्या दारावरची बेल वाजली. त्याचा फ्लॅट अत्याधुनिक होता. ई-उपकरणांनी सुसज्ज. त्याने दारावरच्या स्क्रीनवर पाहिलं. बाहेर एक तरुणी उभी होती. तो म्हणाला,“ मी काही मागवलेलं नाहीये.” दाराबाहेरच्या ध्वनीयंत्रातून तो आवाज बाहेर पोचला. त्यावर बाहेरून आवाज आला, “ ए शहाण्या,दार उघड. मी आले आहे.“ हा त्याच्या आईचा आवाज होता. ती त्या तरुणीमागे लपली होती. त्याने दार उघडलं. आई त्याला ढकलून आत आली. तिच्यामागे ती तरुणी. तो आईला म्हणाला,” हे काय गं ?

व्ही फॉर - भाग चार - अंतिम

बिपीन सुरेश सांगळे ·
व्ही फॉर - भाग चार - अंतिम -------------------------------- त्यांच्या गॅंगमध्ये एक उत्तमसिंग नावाचा पोरगा होता. मध्य प्रदेशातला. त्याच्या सहाय्याने तिकडून भारीभारी शस्त्रास्त्रं यायची . थातूरमातूर गुन्हेगारीपण आता काळाबरोबर बदलली होती . दिप्या आणि आणखी चार पोरं पळाली . आधी नाशिक , गुजरात आणि मग तिथून मध्यप्रदेशांत एके ठिकाणी . नर्मदामैय्याच्या काठावर एक छोटं गाव होतं ते. मस्त मोकळी हवा ,मुबलक खायलाप्यायला. डोक्याला शॉट नव्हता . शेतावरच्या त्या घरात सगळ्या गोष्टी उपलब्ध होत होत्या . सगळ्या ... सगळ्यांचं वजन वाढलं होतं.

व्ही फॉर - भाग तीन

बिपीन सुरेश सांगळे ·
व्ही फॉर - भाग तीन ---------------------------- रियाला किडनॅप केल्याचं तिने आई-वडिलांना सांगितलं होतं . बापरे! साधी मध्यमवर्गीय माणसं ती . घाबरलीच . पोरीला किडनॅप केलं, त्यात तो नामचीन गुंडा ! पण पुढे त्यांच्या कानावर असं आलं की त्याच्यावर हल्ला झालाय . तो वाचेल याची शक्यता फारच कमी आहे. पण त्यांनी एक केलं . त्या क्षणापासून त्यांनी रियासाठी स्थळ बघायची सुरुवात केली. पण दिप्या त्याच्यातून वाचला. तो वाचणारच होता . त्याची इच्छाशक्ती जबर होती आणि अंगातली रगही ! पण गडी पार काडी झाला होता . त्यातून बाहेर पडायला त्याला खूप दिवस लागले . पण त्यावेळी मोठा भाईने त्याला मदत केली. सगळीच मदत .

व्ही फॉर – भाग दोन

बिपीन सुरेश सांगळे ·
व्ही फॉर – भाग दोन -------------------- मयत उरकून ते परत निघाले. गाडीत खास पोरं होती ; पण सगळेच शांत होते . कारण दिप्या शांत होता. पोरांना वाटत होतं की भाई दुःखात आहे - मोठ्या भाईच्या . ते खरंही होतं; पण दिप्या या क्षणाला डबल दुःखात होता . पण तो हे कोणाला बोलला नव्हता . त्याला हे कोणाला सांगायचं नव्हतं . स्वतःचं दुःख तो गुमान गिळत , बाहेर बघत बसला होता . त्याला बाहेरचं काही दिसत नव्हतं . त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते . आणि बोलावं म्हणलं तरी कसं बोलणार ? असं त्याला वाटत होतं - आता तो मुख्य होता . त्यांच्या गँगचा डॉन ! त्याला एकदम पोक्त झाल्यासारखं वाटत होतं .

व्ही फॉर ... (भाग १)

बिपीन सुरेश सांगळे ·
व्ही फॉर ... (भाग १) ----------------- दिप्या एक गँगस्टर होता . मोठा भाईचा उजवा हात ! त्या दिवशीची सकाळ उजाडली तीच भयानक खबर घेऊन... मोठा भाई त्यांच्या गॅंगचा डॉन होता . त्याची हत्या करण्यात आली होती. भाईच्या गावचा उरूस होता . त्यासाठी तो गावाला चालला होता . पहाटेची वेळ . रस्त्याच्या बाजूला वाऱ्यावर प्रसन्न डोलणारी शेतं . फिकट निळ्या आकाशात विहरणारे पक्षी … पण त्याला काय माहिती होतं की - त्याचाही प्राणपक्षी असाच, थोड्याच वेळात, उडून जाणार आहे ते ! त्याच्याबरोबर दहा पोरं होती. तीन आलिशान गाड्या होत्या . सगळ्या प्रकारची हत्यारं होती . परदेशी बनावटीची . अगदी महागाची .

हेंडगूळ

अरिंजय ·
*हेंडगूळ* पावसाळ्यातली गोष्ट. गाडी मित्राकडे होती, ती आणायला पायीच चाललो होतो. उड्डाणपूलाच्या बाजूने सर्विस रोडवर पूर्ण चिखल झालेला. एकच माणूस जाईल, इतकीच पायवाट शिल्लक, बाकी सगळा चिखल. जवळपास अर्ध अंतर गेल्यावर एके ठिकाणी पाच सहा कुत्र्यांचा घोळका एका कुत्री साठी जोरजोरात भांडत होता. ते बघून पलीकडून येणारे दोघं तिघं आणि इकडून जाणारे आम्ही दोघं तिघं, जागेवर थांबलो. चुकून जरी भांडत आमच्या अंगावर आले, तरी आम्हाला पळायला जागासुद्धा शिल्लक नव्हती. मिनीटभराने ती कुत्री तिथून हलली आणि तिच्या मागे सगळा घोळका. मनातल्या मनात शिव्या घातल्या "भाद्रपदाला अजून दोन महिने अवकाश असताना मधेच काय?".