नोट
नोट
रात्र झालेली . बाहेर पावसाला उजाडलेलं .
अंधाराच्या आडोशाने रात्र मनसोक्त नहात होती. तिच्या आठवणीत तोही मनसोक्त नहात होता . माहौलच तसा होता . जीवघेणा !
हवेत पावसाचा गारवा भरून राहिलेला . घरातही . गोधडीच्या आतही . तो त्याच्या बेडवर होता . अंधारात . टक्क जागा . गोधडीत गुरफटून . कुशीमध्ये उशी घेऊन . बाहेरच्या सरी कधी हळुवार तर कधी जोरदार . मनातही तसंच .
किती आठवणी ...
त्याला कॉलेजमध्ये असताना थिएटरचं वेड लागलेलं .खरं तर तो त्याचा प्रांत नव्हता ; पण त्या वेड्या वयातलं असतं काही वेड .
तिथे त्याला ती भेटली होती .
तो तिच्याकडे ओढला गेला. त्यावेळेस तिची सुरुवात होती. त्यामुळे ती हवेत.
मिसळपाव