Skip to main content

पाऊस

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी रविवार, 02/07/2023 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस ---------------------------------- आई गं सरसर पाऊस आला गं जाऊ दे भिजायला गं क्षणात ऊन कुठे लपलं जोरदार वारं हे सुटलं वास भारी मातीला गं जाऊ दे भिजायला गं शेजारची पोरं अंगणात फेर धरुनी रिंगणात जाऊ दे फेर धरायला गं जाऊ दे भिजायला गं पाण्याच्या झाल्या नद्या सोडू गं त्यात होड्या दे ना कागद करायला गं जाऊ दे भिजायला गं बरं ऐकतो मी तुझं जातो छत्री घेऊन पण बाहेर नेऊन मी बंदच ती करेन नाहीतर तूच चल भिजायला गं मस्त मस्त धारा झेलायला गं --------------------------------------------------
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1436
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

वाचक मंडळी नमस्कार . मी फारसा सक्रिय राहू शकत नाही . इतर लेखकांच्या कृतींना किंवा माझ्या लेखनावरच्या अभिप्रायांना योग्य वेळी प्रतिसाद देऊ शकत नाही . नंतर फार उशीर झालेला असतो . हा माझा दोष आहे . तरी क्षमा असावी . धन्यवाद .

सांगते भौ,मागच्या कट्ट्यानंतर आजच दिसलात. पाऊस वाजतो दारी हलकेच निथळती सुर.... पावसाचा दोष आहे. आठवतात कुणाला कागदाच्या होड्या तर कुणाला भज्यांच्या गाड्या.