मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाषा

मराठी,...... पण इन्ग्रजाळलेले

रमण ·
नमस्कार. आजच्या म.टा. मधील एका दहावी इयत्तेतील विद्यार्थ्याने लिहिलेला मराठी भाषेविषयीचा लेख जरुर वाचा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4446591.cms#write (राधारमण कीर्तने)

माझी ओडिया

आळश्यांचा राजा ·
भाषावार प्रांतरचनेमुळे मला वाटत होते की ओडिया ही बऱ्यापैकी एकसंध भाषा असून संपूर्ण ओरिसा राज्यात थोड्याफार फरकाने एक प्रमाण भाषा म्हणून प्रचलीत असेल. पण हे तितकेसे खरे नाही. अर्थात विविधता ही सर्वच भाषांमध्ये असते. माझा एक मित्र यवतमाळहून पुण्याला शिकायला आला होता तेंव्हा त्याचे मित्र त्याला म्हणाले होते, सांभाळ बे, तिकडचे लोक छापल्यासारखे बोलतात! भाषा दहा कोसांवर बदलते म्हणतात. पण ओडियामध्ये असे बदल लक्षणीय आहेत. संबलपूर भागातील ओडिया ही कटक – पुरी भागातील ओडियापेक्षा इतकी निराळी आहे की आपल्याला आपल्या कोंकणी, अहिराणीची आठवण व्हावी.

मनाच्या कुपितले - बराक ओबामा

विनायक पाचलग ·
मनाच्या कुपीतले या सदरातला हा अकरावा लेख या सदरातील सर्व लेख तुम्ही येथे पाहु शकता.
बराक ओबामा - पासवर्ड फुटलाय.
बराक ओबामा, गेले वर्षभर अख्या जगभर ज्याची आणि फक्त ज्याचीच चर्चा चालू होती, ते हे व्यक्तिमत्व या काळात प्रत्येकाला या व्यक्तीबद्दल किती लिहू आणि किती नको असे झाले होते. पण, या व्यक्तीची संपूर्ण माहिती कुठेच मिळत नव्हती. त्यांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद केले गेले. पण, थोडक्यात योग्य माहिती मिळेल असं कोणतच साधन नव्हतं.

आनंदाची बातमी..! :)

विसोबा खेचर ·
एक निवेदन... कळवण्यास अत्यंत आनंद होतो आहे की मिपावर शुद्धलेखन विषयक लेखांवरील, चर्चांवरील बंदी आता उठवण्यात आली असून मिपावर एक शुद्धीचिकित्सक विभाग सुरू करण्यात आला आहे.. :) माननीय मिपाकर सतिशराव हे या विभागाचे प्रमूख असतील व तात्या त्यांच्या हाताखाली त्या विभागातील एक दुय्यम क्लार्क म्हणून काम पाहील! :) सतिशरावांनी प्राणिपात कोटि कोट आणि मोकलाया दाहि दिश्या या दोन कविता मिपावर लिहून तात्याच्या कानफटात मारली आहे आणि शुद्धलेखन विषयक झणझणीत अंजन समस्त मिपाकरांच्या डोळ्यात घातले आहे.

कोल्हे-कुई

पुष्कर ·
(पंतांच्या पगडीच्या प्रवासातल्या, पुष्करच्या प्रेमप्रकरणातल्या प-पच्या पोपटपंचीला पुष्कळ प्रसिद्धी पावल्यानंतर पुष्करने पूर्व-प्रसिद्ध कोल्हापूरच्या काका-काकूंची कथा किंचित कष्ट करून कंप्लीट केलीये.) केशवाचे कपट, काकांची कमाल पुनःसंपादन आणि विस्तारास्तव तूर्तास कथा काढून टाकत आहे. क्षमस्व.

“बोली भाषेतील शब्द”? असे काही असते का?

मराठी शब्द ·
मला एक प्रसंग रंगवायचा आहे. त्यात मला एकाच वस्तूचा वापर करुन त्यातील पात्र त्या वस्तूचा कसा वापर करत आहे हे दाखवायचे आहे. काय योग्य आहे आणि काय नाही हे वाचकांनी ठरवावे. १. नर्मदाबाईने बुट्टी घेतली व त्यात गोवर भरुन घेतली. २. सख्याने टोकरी सायबाला दाखवली आणि साहेब काय समजायचे ते समजला. ३. माधवीने २ सफरचंद, ३ संत्री आणि ३ हापूस त्या वेताच्या नाजूक घडणीच्या सुंदरशा टोपलीत ठेवली ४. रीटाला तीची ती चायनीज बाउलची खरेदी फारच महागात गेली.

मनाच्या कुपीतले -क्षण

विनायक पाचलग ·
मनाच्या कुपीतले या सदरातला हा चवथा लेख .........
क्षण
कोणी एक नवा जीव जेंव्हा भूतलावर अवतरतो. तो क्षण त्याचा......... बऱ्याच प्रयत्नानंतर जेंव्हा एक कोवळा जीव टाहो फोडतो. तो क्षण त्याचा. .................. 8-9 महिन्यानंतर चिमुकल्याचे चालणे, ते पहिले पाऊल पडण्याचा क्षण त्याचा. ............. 3 ऱ्या वर्षी जेंव्हा ते बाळ शाळेच्या पहिल्या पायरीवर पाऊल टाकतं. तो क्षण त्याचा. ............. तोच बाळ जेंव्हा । अशी ग ची पहिली रेप ओढतो..... तो क्षण त्याचा............. जेंव्हा एखादा मुलगा पहिले बक्षीस घ्यायला दुडूदुडू धावत जातो.

एक लेख

गोगोल ·
दूसर्यान्च्या ब्लॉग मधील लेख प्रसिद्ध करण्याबाबतीत काय नियम आहेत हे माहित नाही, पण हा लेख मला खुपच आवड़ला म्हणून खाली दुवा देत आहे. नियम भंग होत असाल्यास कृपया कळवावे, मी हा धागा उड्वुन टाकिन. http://shabd-pat.blogspot.com/2008/12/blog-post_3917.html

शतदा प्रेम करावे

विनायक पाचलग ·
मित्रानो माझ्या शुद्ध लेखनाबद्दल येथे बरीच चर्चा झाली. त्यामुळे मी हा माझा पहिला लेख जो मी ३ महिन्यापुर्वी लिहिला होता तो टाइप केलेला होत तो येथे जसाच्या तसा येथे देत आहे. (मी एवढ्यात देणर न्हवतो पण देत आहे.आता शान्त्पणे वाचा आणि प्रतिक्

काम

निमीत्त मात्र ·
काम करणं अथवा न करणं हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असतो. अर्थात काम करणारे आणि काम न करणारे असे समाजात ढोबळ मानाने दोन गट असतात. परंतु एवढ्या ढोबळ वर्गीकरणातून हा विषय पूर्ण होऊ शकतो असं मला वाटत नाही. काम करणाऱ्या गटात अनेक उपगट असतात. आवडीनं काम करणारे, मनाविरुद्ध काम करणारे, काम एन्जॉय करणारे, मन मारून काम करणारे, सदा हसतमुख काम करणारे, रडत रडत काम करणारे, वेगानं काम करणारे, हळूहळू काम करणारे, आपणहून भरपूर काम करून नंतर त्याचीच तक्रार करणारे, केलेल्या कामाचा मोठा गाजावाजा करणारे, गुपचूप कामाचा डोंगर उपसूनही हूं की चूं न करणारे, आपलं काम करून इतरांचंही काम करणारे, आपल्यापुरतं काम करणारे....