Skip to main content

पाव मार्काचा धडा !

लेखक भोचक यांनी शनिवार, 09/01/2010 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
एरवी उत्साहाने फसफसत शाळेतून परतणारी माझी लेक त्या दिवशी तिला घेऊन येणार्‍या वाहनामधून उतरली तेव्हाच तिच्या डोळ्यात आभाळ दाटलं होतं. ते ओळखूनच तिच्या आईने तिला उचलून जवळ घेतलं नि तोपर्यंत तिच्या डोळ्यातलं आभाळ वाहू लागलं. साथीला छातीचा भाताही वाजू लागला. तिच्या आईने थोपटतच तिला आधी शांत केलं, पण तरीही ते रोखता येणं तिच्यासाठी अशक्य बनलं होतं. हमसून हमसून रडता रडता ती म्हणाली, 'टीचर'ने कमी मार्क दिले. कशाबद्दल? आईचा प्रश्न. 'औ' चुकीचा लिहिला म्हणून- लेक उत्तरली. मग ठीक आहे. त्यात काय एवढं? एवढं बोलेपर्यंत मायलेकी घरात पोहोचल्या होत्या. लेकीने रडत रडतच तिच्या दप्तरातून तिची 'बुक' काढली.

श्रवण कौशल्य

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 09/01/2010 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
एखादा आपल्या जीवनातला घडलेला प्रसंग घ्या. आपल्याला कोणीतरी काहीतरी काम सांगते व आपण ते काम जसे सांगितले अगदी त्याबरहुकूम करतोच असे नाही. असेच आपण एखाद्याला सांगितलेल्या कामाच्याबाबतीतही घडते. विद्यार्थीदशेत असल्याप्रसंगी शिक्षकाने शिकविलेले आपल्या जसेच्या तसेच लक्षात राहत नसण्याची शक्यता फारच असण्याची शक्यता असते. आपण टिव्ही, रेडिओ, चित्रपटात अनेक संवाद ऐकतो. हे संवाद आपल्याला जसेच्या तसेच लक्षात काही राहत नाहीत. अर्थात, ते लक्षात ठेवणे एवढे गरजेचेही नसते म्हणा. तरीही, एखादी गोष्ट आपण जशीच्या तशी, वाक्यन वाक्य लक्षात ठेवू शकत नाही.

तुमच्या गावाचे नाव काय?

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/12/2009 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही खेडेगावात राहत असाल, शहरी असाल. तुम्ही राहता त्या गावाचे नाव घ्या, किंवा तुम्हाला माहित असलेल्या कोणत्याही गावाचे (किंवा गावांची नावे) नाव घ्या. त्या गावांची नावे कशी पडली असतील असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय? तुम्ही त्यावर विचार करून ते नाव का ठेवलेय असा कधी विचार केलाय? नक्कीच केला असणार. मी तर बुवा गावाचे नाव कसे पडले असेल त्याचा विचार करतो. उदाहरणच द्यायचे झाले तर: पिंपळगाव. गावात (पुर्वी) पिंपळाची झाडे जास्त. वडगाव : गावात (पुर्वी) वडाची झाडे जास्त होती. (आता कसली झाडे जास्त?) हे झाले आपले सरळसोट नावे असलेली गावे. पण काही गावांची नावे इरसाल असतात.

गूगलचे लिप्यंतर (Google Transliteration)

लेखक राहूल यांनी रविवार, 06/12/2009 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक फ्रेंच मित्र आहे - जिरोम म्हणून. त्याच्या कॉम्प्युटरला मी शक्यतो हात लावत नाही. कारण त्याच्या laptop मध्ये अथपासून इतिपर्यंत सर्वकाही फ्रेंच भाषेत आहे; आणि अस्मादिकांना फ्रेंच मधल्या bonjour व merci च्या पलीकडे ओ कि ठो कळत नाही. जिरोमची हि तऱ्हा; तर चिनी मित्राच्या कॉम्प्युटरकडे बघायला सुद्धा नको. फ्रेंच भाषा कळली नाही तरी निदान लिपी इंग्रजीसारखी आहे. चिनी भाषेची अगम्य गिचमिड पाहून आपण निरक्षर असल्याचा भास मला होतो.

(२६/११/२००९)

लेखक चेतन यांनी बुधवार, 25/11/2009 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
ऋषिकेशची (२६/११/२००९) वाचुन आणि इतर काही प्रगल्भ संस्थळावरचे मराठीद्वेषी विचार वाचुन थोडिशी विडंबनाची कंड सुटली.... डिस्क्लेमिअरः ओषधोपचार सुचवु नये (स्वयंघोषित डॉ.
काव्यरस

(कोडी)

लेखक चेतन यांनी गुरुवार, 19/11/2009 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंची कविता वाचुन आम्ही काही कोडि सोडवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक याचकाला केली बहाल थाळी नाहीच जाणले की स्वकीये राहिली भुकेली साधे गरीब भय्ये नव्हतेच त्या दिशेला आधार बिहार्‍यांचा माजोरड्या भिकेला तोंडात तोबरा अन् उध्दट देहबोली एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी मुंबई-मराठीचीही वाट लावली मी नाही एकत्र मराठी, तू घे भाजुन पोळी" मौनात राहण्याने नुकसान फार केले जाणून आपल्यांनी पाठीत वार केले भाषा असुन मराठी, का हिंदी माय बोली या हिंदीप्रेमी लोकांचा स्वार्थ फक्त होता जाता जिथे, तिथे का भांडुन मार खाता ते वाढवीत गेले, नेत्यात तेढ खाली!
काव्यरस

कातरवेळ

लेखक निखिल देशपांडे यांनी सोमवार, 16/11/2009 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी सकाळी लवकर ११-१२ वाजे पर्यंत उठायचा प्लॅन होता. पण कुठले काय??? सकाळी ७ वाजता फोन वाजला... पहातो तर सिंगापुरातुन फोन..!!! नाही हो सिंगापुरच्या काकांचा नव्हता... एक जुना कलिग सकाळी सकाळी एक इश्श्यू मधे अडकला होता. त्याचा प्रॉब्लेम सोडवता सोडवता झोप चांगलीच उडाली.... आता इतक्या भल्या पहाटे(!) उठून काय करावे ते कळतच नव्हते. पेपर वाचून झाला... त्यात काही तरी सचिन च्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी मराठी वृत्तपत्रांना बोलवले नव्हते तरी दुसर्‍या दिवशीचा अंक सचिन स्पेशल काढण्यात येणार असे लिहिले होते. चालू द्या!!!!

महाराष्ट्र खरेच पुढारलेला आहे?

लेखक विकास यांनी शुक्रवार, 13/11/2009 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या चिंतनाचा विषय "विरंगुळा" सदरात मोडला आहे हे पाहूनच प्रतिसाद द्यावात ही विनंती! ;) मनसे आमदारांनी घातलेल्या "विधानसभेतील" गोंधळामुळे मला जितके वाईट वाटले त्याहूनही अधिक वाईट आपण किती मागासलेले आहोत हे खालील चित्रफिती पाहाताना जाणवून शरमेने मान खाली गेली :) तैवानमधे एक स्त्री खासदार सभागृहात सभापती स्त्रीच्या कानाखाली वाजवू शकते (हा व्हिडीओ दुव्यावर टिचकी मारूनच बघता येईल!) -------------- फक्त अठ्ठावन्न सेकंदात लोकशाही कशी वागू शकते ते कोरीयातील सभागृहातील दृश्यात खाली पहा.

काही ऐकलेल्या आठवणी

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी शुक्रवार, 23/10/2009 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, कला क्षेत्रात अनेक महान व्यक्तिमत्व झाली.मग ते गायन , लेखन , अभिनय कोणतेही क्षेत्र असो त्या त्या क्षेत्रात पराकोटीची उंची गाठलेल्या व्यक्तींविषयी आपल्याला खचितच बोलायला , ऐकायला आवडतं. मला तरी नक्की आवडतं. या धाग्यावर मला अशा आठवणी सांगायला आणि आपणाकडूनही ऐकायला आवडतील. एक आठवण कविवर्य सुरेश भट यांच्याबद्दलची आहे. एकदा भट साहेब एका महाविद्यालयाच्या वार्षिक महोत्सवाला प्रमुख पाहुणे होते. गायनाचा कार्यक्रम सुरु होता . गायिकाही मन लावून गात होती . भटसाहेबही दिलखुलास दाद देत होते.