आज हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांचा ८० वा हौतात्म्यदिवस.
हुतात्मा चंद्रशेखर आजाद हे हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल यांच्या नंतरचे हिंदुस्थन प्रजासत्ताक समाजवादी सेनेचे सरसेनापती. प्रखर देशभक्त, धाडसी योद्धा, कुशल संघटक या बरोबरच नेता कसा आसावा याचे हुतात्मा चंद्रशेखर आजाद हे उत्कृष्ठा उदाहरण आहेत.
एकदा देशकार्यात स्वत:ला झोकुन दिल्यानंतर कुठल्याही भावनांना थारा नाही हे त्यांनी वेळोवेळी आपल्या सहकार्यांना समजावलं. एकदा सहज हुतात्मा भगतसिंह त्यांना म्हणाले होते की त्यांनी त्यांच्या घरचा ठावटिकाणा द्यावा म्हणजे जर दुर्दैवाने वेळ आलीच तर इतर सहकारी त्यांच्या घरच्यांची वास्तपुस्त घेऊ शकतील.