Skip to main content

सद्भावना

आला थंडीचा महिना

लेखक टारझन यांनी बुधवार, 08/12/2010 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , पार नोव्हेंबर उजाडला तरी ह्या वाह्यात पावसाने नुसता उच्छाद मांडला होता. दसर्‍याला पाउस ? हाईट म्हणजे दिवाळीतही पाऊस झाला. त्यामुळे बर्‍याच लोकांचे फटाके वाकस होऊन फुसके निघाले. त्याचा वचपा त्यांनी थोडा जास्त फराळ करुन मानवी फटाक्यांद्वारे काढला. ह्यामुळे वायुप्रदुशणास मदत झाली नसेल तर नवल . अरे नोव्हेंबरात काय पाऊस पडायचा असतो का? प्रत्येक ऋतुला चार-चार महिने वाटुन दिलेले असताना असं एकाने दुसर्‍याच्या क्षेत्रात घुसखोरी करुन वातावरणिक अवांतरगिरी करणं मला खरोखर न रुचणारं वाटलं.

सदा तुमने ऐब देखा हुनर तो न देखा।

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 05/12/2010 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
वो तो है अलबेला । हजारों में अकेला ।।
सदा तुमने ऐब देखा हुनर तो न देखा।
हिऱ्याला पत्थर समजून दुर्लक्ष केले। ... बांसरीला लाकडाची पुंगळी समजून विर्भत्सले। ... ज्योतीला न पहाता वातीला पाहून हिणवले। ... गायकाच्या सुरेल तानेला - वा वाह तर म्हणाल,... नृत्याच्या लचकदार आदाकारीला ठेका तरी धराल,...

नमस्कार समस्त मिपाकर!!!

लेखक अनिरुद्ध उर्फ अन्या यांनी मंगळवार, 30/11/2010 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार समस्त मिपाकर!!! मी अनिरुद्ध उर्फ अन्या... गेले १ वर्ष मिसळपाव चा सदस्य आहे पण फक्त वाचनापुरताच!!! ह्या मिसळपाव मुळेच वाचनाची आवड अजुन वाढली. लिखाण जमेल असे वाटत नाहि, त्या मुळे सध्या तरी एवढेच!!! सर्व मिपाकराना नविन लिखाणासाठी शुभेच्छ्या!!! लिखाणातील चुका माफ कराव्यात!!! ~अनिरुद्ध उर्फ अन्या!!!

शब्दान शब्द

लेखक यकु यांनी मंगळवार, 30/11/2010 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
कसल्याशा संशोधनासाठी आमचा एक मित्र उत्तर ध्रुवावर मुक्काम ठोकून असतो. तिथून तो मराठी अंतर्जालावर आणि त्यातील नगांवर नजर ठेऊन असतो. अंतर्जालातील काही नगांवर आजकाल त्याची विशेष नजर आहे; कारण त्याला उत्तर ध्रुवावरून आल्यानंतर मराठीत एक वेगळेच, आगळेच म्हणतात ना तसे मसं सुरू करायचे आहे. सगळंच खुल्लम खुल्ला व्हावं असं त्याचं म्हणणं आहे. जिथे कुणीही आयसोलेटेड, कंपूनिष्ठ असणार नाही. अर्थातच त्यासाठी याच नगांची गरज आहे. मिपावरील खेळीमेळीच्या वातावरणावर त्याचे विशेष प्रेम आहे. म्हणून त्याने खाली दिलेल्या नगांचे बायोडाटे (विदागार) तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.

आमचा पाव - एक गाव

लेखक यकु यांनी सोमवार, 29/11/2010 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
पावात यायचं म्हणजे हा एक ताप असतो. म्हणजे इथं आलं की लवकर परत जावं वाटत नाही. तास उलटतात, दुपार होते. डबा खाऊन होतो, चारचा चहासुध्दा होतो आणि हळूहळू दिवस कलून दिवेही झगमगू लागतात. तरी पावातले सोहळे काही संपत नाहीत. अगदी रातच्या साडेतीन वाजताही एखादा पावकरी दूरवर पसरलेल्या नदीत अगदी संथपणे होडीत बसून माशांचे जाळे उसवत असावा तसा दिसून येतो. काही लोक थांबावं की जावं? थोडावेळ थांबूच, नको, नको गेलेलंच बरं म्हणून डुबी मारतात, आणि आणखी पाचदहा मिनीटात श्वास कोंडला की पुन्हा एकदा डोकं वर काढतात!

विडा

लेखक शुचि यांनी मंगळवार, 23/11/2010 04:56 या दिवशी प्रकाशित केले.
जालावर फिरता फिरता अनेक सद्गुरुस्तोत्रे वाचनात येतात. काही कळतात बरीचशी कळत नाहीत. काही संस्कृत स्तोत्रांची गोडी भाषांतरात हरवते. पण बरेचदा योग जुळून येतो आणि एखादं अप्रतिम, अनवट स्तोत्र समोर येतं जे की जे मन उजळून टाकतं, एक दिव्य आनंदानुभव देऊन जातं. असं स्तोत्र वाचून वाटतं - अरे हेच वाचण्यासाठी आपण मराठी मातीत जन्माला आलो. हेच ते सर्वोच्च, सर्वांगसुंदर स्तोत्र. आता याहून अधिक पाहणे उरले नाही. हा अनुभव मला "विसरू कसा मी गुरुपादुकाला" वाचताना आला. हाच देजा वू अनुभव "गुरु।गुणालया।परापराधिनाथ सुंदरा।" हे स्तोत्र वाचताना आला.

चिरंजीव चिंटू-२

लेखक डावखुरा यांनी रविवार, 21/11/2010 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
दि : २१.नोव्हें.२०१०; आज आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रमालिकेतुन प्रसिद्ध होउन लहानांपासुन मोठ्यांपर्यंत ईतर कोणत्याही बातमी कडे कटाक्ष टाकण्यापुर्वी चिंटू कडे जायला भाग पाडतो...ह्यातच ह्या मालिकेचे यश सामावलेय.. सतत दोन दशके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा चिंटू २० व्यात पदार्पण करणार. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांचा मानसपुत्र असलेला

चिरंजीव चिंटू

लेखक डावखुरा यांनी गुरुवार, 18/11/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम

आदरार्थी मैत्र...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 09/11/2010 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
ती सदासर्वदा चैतन्यमयी नजरेनं वावरणारी, नेहमी हसतमुख राहणारी, निर्मळशा झऱ्‍यासारख्या मुक्त स्वभावाची एक युवती. नेहमीच खळाळता संवाद साधीत हास्यमळा फुलवण्याची तिची हातोटी जगावेगळी. तिचा मार्केटींगच्या क्षेत्रात वावर असल्यामुळे नव्हे तर प्रत्येकाला तिच्या बद्दल वाटणारा स्नेह, आपुलकी अन् विश्वास यांमुळेच तिचे दोन मोबाईल अविश्रांत रुणझुणत असतात. तिच्या बोलक्या स्वभावामुळे ती प्रत्येकाला आपलंसं करीत जाते. तिचं फ्रेन्ड सर्कलही मोठं विस्तारत जाणारं. त्यात कमी अधिक वयाच्या अनेक व्यक्ती. तिच्या बरोबरीच्या जितक्या मैत्रिणी तितकेच मित्रही.

मुंबैच्या किनारी ओबामा नाचला.. :)

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 08/11/2010 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
'मी हाय कोली..' या सुंदर कोलीगीतावर अखेर ओबामामामाही नाचला.. मिशेलमामी मात्र मला फार आवडल्या.. त्याही मनमोकळ्या नाचल्या.. :) इथे पाहा.. जळ्ळा आमचा परशा कोली.. दोन टाईम फक्त दारू खायची ज्याला फक्त माहिती.. त्याचीच ओबामामामा इथे आल्यापासून सारखी हुशारी सुरू होती की " ओबामामामाला आमच्या कोली गीतांवर नाचवतो की नाय ते बग..! " :) परशाचीही हकिकत लिहून तैय्यार होते आहे..