संपादनेथॉन: मराठी दिनानिमित्त विकिपीडियाचा उपक्रम
नमस्कार मंडळी,
औचित्य आहे दरवर्षी २७ फेब्रुवारीला जगभर पाळल्या जाणार्या मराठी भाषा दिवसाचं. त्या निमित्त येत्या २७ फेब्रुवारीस मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात संपादनेथॉन - आयोजित केली आहे. या दिवशी अधिकाधिक संपादने करून आपला सक्रीय सहभाग नोंदवण्यासाठी विकिपीडियाकडून सर्व मराठी भाषिकांना यात सामील होण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे.
विकिपीडियाच्या १०व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणं सर्व भारतीय भाषांमध्ये मराठीतील लेखांचा तिसरा क्रमांक आहे.
मिसळपाव
" alt="" />
कणिक मळा.