Skip to main content

सद्भावना

सावधान! 'व्हर्चुअल फ्रेंड ' ची 'रियालिटी ' भोवली.

लेखक विनायक बेलापुरे यांनी मंगळवार, 05/04/2011 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
चाळीशीच्या इसमाकडून २० वर्षीय तरुणीचा विनयभंग इंटरनेटवर चैटिंग करत घट्ट मैत्रीत अडकलेल्या २० वर्षीय तरुणीला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. व्हर्चुअल फ्रेंडशी तरुण तरुणींनी किती मैत्री वाढवावी याबाबत सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मेडिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी ४१ वर्षीय व्यक्तीला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कोथरूड येथील तरुणीने डेक्कन पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सलील भालचंद्र नानल (वय ४१ वर्षे रा.

(यांना विसरुन कसे चालेल ? )

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 05/04/2011 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा आख्खा देश विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा करत होते तेव्हा भारताच्या विजयाच्या शिल्पकाराला आपण विसरत होतो असे मला वाटते. मिपा वर एवढे धागे येउन गेले पण एकानेही विजयाचे योग्य ते श्रेय या इसमाला दिले नाही याचा खेद वाटतो म्हणुन हा धागाप्रपंच. खरे म्हणजे या व्यक्तीशिवाय आपण विश्वचषक जिंकु शकत नाही हे सुरुवातीपासुनच सर्वांना माहिती होते. त्या अनुषंगाने मला सुरुवातीला काही ढकलपत्रे आणि काही भ्रमणध्वनी संदेश देखील आले. पण म्हणतात ना गरज सरो वैद्य मरो (अर्थात कोणाला वाटले म्हणुन हा वैद्य मरेल असे नाही). त्या अनुषंगाने लोक या इसमाला विसरले. कोण आहे हा?

सचिनला भारतरत्न द्यायला हवी

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 03/04/2011 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र (मूळ इंग्रजी निरोप खाली दिलेला आहे) मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कीं आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला आता आपल्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान "भारतरत्न" देऊन आपण गौरविले पाहिजे. त्याचे चकित करणारे विक्रम सर्वांनाच माहीत आहेत. पण त्याचे सहकारी खेळाडू त्याला किती मानतात आणि त्याच्यावर प्रेम करतात हे आपणही काल पाहिलेले आहेच.

क्रिकेट विश्वचषक - २०११ 'अभिनंदन'

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शनिवार, 02/04/2011 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
आय सी सी क्रिकेट विश्वचषक - २०११ जिंकल्याबद्द्ल भारतीय क्रिकेट संघाचे मनापासुन अभिनंदन! आपण एक इतिहास घडवलेला आहे! एक स्वप्न सत्यात उतरले! - (अतिशय आनंदी) इंट्या.:)

पारंपारिक प्रतिस्पर्धी

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 30/03/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही कधी साप आणि मुंगुसाला भांडताना बघितले आहे? दोघेही जीव खाउन लढतात. कारण ती अस्तित्वाची लढाई असते. आजवर कधी पाहण्याचा योग आला नसेल तर आज बघा. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० मिनिटांनंतर २ देशातले २२ खेळाडु साप आणि मुंगुसासारखे लढणार आहेत. हा केवळ त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे तर २ देशांच्या अस्मितेचा सुद्धा प्रश्न आहे. आजचा भारत - पाकिस्तान सामना हा तिसर्‍या महायुद्धापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचा आहे. याआधी विश्वचषकाच्या इतिहासात हे २ देश कधीही उपांत्य फेरीच्या सामन्यात समोरासमोर आले नाहीत. याआधी कधीही त्यांची लढाई अस्तित्वाची लढाई नव्हती.

नीलकांत यांचा आज वाढदिवस

लेखक इंटरनेटस्नेही यांनी मंगळवार, 22/03/2011 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, आज आपल्या मिसळपाव या बेव साईटचे मालक श्री. नीलकांत यांचा आज (२२ मार्च) वाढदिवस आहे! सुरुवातीस मिपाची तांत्रिक बाजु भक्कमपणे सांभाळणारे नीलकांत, अनेक महिन्यांपासुन मिसळपाव.कॉम चा एवढा प्रचंड डोलारा एकहाती समर्थपणे चालवत आहेत. काळाबरोबर अतिशय वेगाने बदलत्या तांत्रिक आणि अन्य आव्हानांच्या आजच्या घडीला नीलकांत यांच्या शिवाय मिपा ही कल्पना सुद्धा करवत नाही. नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

भोग

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 19/03/2011 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
या जन्माची पापं या जन्मातच फेडायला लागतात म्हणे. आयुष्याचे भोग प्रत्येकाने भोगायलाच पाहिजेत असाही एक प्रवाद आहे. पण मी आयुष्यात अशी कुठली पापं केली आहेत की माझे भोग संपता संपत नाहीत हे कळेना झालय. नाही मी काही 'तसला' विचार मांडत नाही आहे किंवा माझी गार्‍हाणी गाण्याचा पण माझा विचार नाही. पण माझी दु:खभरी दास्तां ऐकुन तुमच्या डोळ्यात पण पाणी येइल. अजुन काही नाही तुमच्या कडुन फक्त थोड्या सहानुभुतीची अपेक्षा आहे. मी सुरुवातीलाच मोकळेपणाने कबूल करु इच्छितो की माझ्या आयुष्यात हे जे काय घडले आहे न पेक्षा जे काही नेहेमीच घडते त्यात अंशतः चुक माझीच आहे. पण पुर्णपणे मी स्वत:ला दोष देउ इच्छित नाही.

"पुष्पक "

लेखक VINODBANKHELE यांनी सोमवार, 14/03/2011 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम, मिपाकर , न बोलता फटाके फोडण्या साठी मिपा संस्थळ प्रसिद्ध आणि म्हणून खूप लोकप्रिय आहे , अर्थात हे सांगण्याची काही गरज नाही म्हणा ,पण असेच एक माईल स्टोन स्थळ माझ्या आठवणीत आणि गुगल व्हिडिओ वर आहे त्याची आणि आपली भेट घडवावी म्हणून हे लेख पुष्प .

हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांना आदरांजली

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 27/02/2011 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
आज हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांचा ८० वा हौतात्म्यदिवस. हुतात्मा चंद्रशेखर आजाद हे हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल यांच्या नंतरचे हिंदुस्थन प्रजासत्ताक समाजवादी सेनेचे सरसेनापती. प्रखर देशभक्त, धाडसी योद्धा, कुशल संघटक या बरोबरच नेता कसा आसावा याचे हुतात्मा चंद्रशेखर आजाद हे उत्कृष्ठा उदाहरण आहेत. एकदा देशकार्यात स्वत:ला झोकुन दिल्यानंतर कुठल्याही भावनांना थारा नाही हे त्यांनी वेळोवेळी आपल्या सहकार्‍यांना समजावलं. एकदा सहज हुतात्मा भगतसिंह त्यांना म्हणाले होते की त्यांनी त्यांच्या घरचा ठावटिकाणा द्यावा म्हणजे जर दुर्दैवाने वेळ आलीच तर इतर सहकारी त्यांच्या घरच्यांची वास्तपुस्त घेऊ शकतील.