मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळीचा आशावाद...

निमिष सोनार ·

अवलिया 11/10/2009 - 10:57
छान आशावादी कविता --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

लेखनविषय:
काव्यरस
आली पुन्हा प्रकाशमान दिवाळी जशी अस्सल सोन्याची झळाळी दूर होवू दे संकटांची छाया काळी नष्ट होवू दे समस्यांची दाट जाळी पसरु दे ज्ञानाचा प्रकाश आभाळी खुलू दे दु:खी मनांची कळी भरू दे आनंदाने प्रत्येकाची झोळी आली प्रकाशमान दिवाळी आली प्रकाशमान दिवाळी

भैरवी

क्रान्ति ·

अवलिया 06/10/2009 - 09:28
सुरेख ! रचना आवडली ! ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रमोद देव 06/10/2009 - 09:50
सगळेच शेर मस्त आहेत. पैलतीर दिसे आता, आवरून घे सुरांना, भैरवीवाचून काही रंगण्याची वेळ नाही हा शेर 'हासिले गजल' (की असंच काहीसं) म्हणतात तसा शेर आहे. ...ह्या गजलेला चाल लावलीच पाहिजे...... विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

In reply to by प्रमोद देव

मनिष 07/10/2009 - 09:58
सगळेच शेर मस्त आहेत. प्रमोद्काकांनी म्हटल्याप्रमाणे, हे तर शिखरच!
पैलतीर दिसे आता, आवरून घे सुरांना, भैरवीवाचून काही रंगण्याची वेळ नाही

कविता आवडली.. संकटांनी आयुष्याशी उभे दावे मांडलेले, रात्र ही वै-याची आहे, पेंगण्याची वेळ नाही हे तर मस्तच!!

युयुत्सु 06/10/2009 - 10:25
छान कविता युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

पार्टनर 06/10/2009 - 20:14
प्रत्येक शेर दुसर्‍यापेक्षा भन्नाट .. खास !! (अवांतर : शेवटचा महत्त्वाचा 'भैरवी' चा शेर, संगीतातलं फार काही ज्ञान नसल्याने नीटसा समजला नाही.)

In reply to by पार्टनर

सुबक ठेंगणी 07/10/2009 - 03:54
खूपच छान गझल. मलाही शेवटचाच शेर आवडला. पार्टनर, ही कविता म्हणजे मृत्यूचे वेध लागलेल्या माणसाचे मनोगत आहे. भैरवी हा राग मैफिलीचा समारोप करताना गातात...त्यामुळे जीवनाच्या मैफिलीच्या शेवटी आता भैरवीशिवाय काहीच रंगणार नाही असं इथे सुचवायचं आहे असं मला वाटतं. क्रांतीतै बरोबर नां?

प्राजु 07/10/2009 - 04:19
केवळ सुरेख!! शेवटचा शेर वाचून शहारा आला.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

एक एक पाश तोड, गुंतण्याची वेळ नाही परतीचा प्रवास हा, थांबण्याची वेळ नाही विसर ते हेवेदावे, घाल अपराध पोटी, कोण कसे चुकले हे सांगण्याची वेळ नाही तुझे नसलेले सारे गुन्हे इथे सिद्ध झाले, वेड्या मना, तुझी बाजू मांडण्याची वेळ नाही संकटांनी आयुष्याशी उभे दावे मांडलेले, रात्र ही वै-याची आहे, पेंगण्याची वेळ नाही पैलतीर दिसे आता, आवरून घे सुरांना, भैरवीवाचून काही रंगण्याची वेळ नाही

रान

क्रान्ति ·

"मन रान, विषवल्ली अहंभाव वेड्या, कर तिचा वेळीच पाडाव जाळ तिची बीजं, तोड तिच्या फांद्या, आणि जिंकून घे आयुष्याचा डाव " खरय, नेमकी वेळ साधणे महत्वाचे. ती हातातुन निसटली की मग केवळ पश्चाताप करणेच हातात राहते. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by अविनाश ओगले

क्रान्ति 26/09/2009 - 08:25
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! संपादन केलं आहे. :) क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

ज्याच्या सावलीचा धरावा विश्वास विषवल्ली कवटाळे त्या वृक्षास जळला मोहर, झडली पालवी, दिसे रिता, पर्णहीन तो भकास विषवल्ली तरारली, फोफावली, वाढत चालली; वेढत चालली घनदाट गर्द हिरव्या रानाला, एकेका वृक्षाची गिळत सावली रान कुठे आता? उद्ध्वस्त स्मशान घोंघावतो वारा एकटा बेभान उघडे-बोडके निष्पर्ण सांगाडे फांदीफांदीवर भुतांचे थैमान क्षणात अवघे चित्र पालटेल वठल्या वृक्षाला धुमारा फुटेल मिटतील विध्वंसाच्या खाणाखुणा, पुन्हा रानात या गारवा दाटेल मन रान, विषवल्ली अहंभाव वेड्या, कर तिचा वेळीच पाडाव जाळ तिची बीजं, तोड तिच्या फांद्या, आणि जिंकून घे आयुष्याचा डाव

भोंडला

क्रान्ति ·

सोनम 21/09/2009 - 09:24
कविता खुपच छान आहे......... :) :) मला ही लहानपणीचा भोंडला आठवला...... :( :( आमच्या शाळेत आम्ही भोंडला करत असायचा........आता उरल्या त्या फक्त आठवणी... :( :(

श्रावण मोडक 21/09/2009 - 09:39
सोळा वर्षं भोंडल्याची गेली कधीची सरून आता कोरडेच हस्त, गाणी गेले विसरून फेर संपता संपेना; देह, प्नाण भोवंडला अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला अगदी बालपणची आठवण. पहिलीत वगैरे असेन. खिरापत हे आकर्षण आणि त्यापोटीची ती वाट पाहण्याची स्थिती. या कडव्यात म्हटलं तसं आता गेली ती वर्षं सरून... अवांतर - प्नाण? प्राण?

नंदू 21/09/2009 - 17:30
सोळा वर्षं भोंडल्याची गेली कधीची सरून आता कोरडेच हस्त, गाणी गेले विसरून फेर संपता संपेना; देह, प्नाण भोवंडला अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला छानच. कविता आवडली. "भोवंडला" छान शब्दकळा. नंदू

प्राजु 21/09/2009 - 20:05
फार फार सुरेख!!! बाळपणीचा भोंडला हरपला थोरपणी कुठं शोधू ते अंगण ? कुठं वेचू आठवणी ? विखुरल्या खिरापती, डबा कधीचा सांडला! अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला मन उदास झालं गं हे वाचून. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अजिंक्य 22/09/2009 - 12:35
छान कविता. बाळपणीचा भोंडला हरपला थोरपणी कुठं शोधू ते अंगण ? कुठं वेचू आठवणी ? विखुरल्या खिरापती, डबा कधीचा सांडला! अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला आवडलं. बाकी वरील सर्व प्रतिक्रियांशी सहमत. (कविता मनाला उदास करून गेली. अतिशय प्रभावी.) पुलेशु. अजिंक्य.

१ लिम्बु झेलु बाइ २ लिम्बे झेलु ;;) फेर संपता संपेना; देह, प्नाण भोवंडला अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला :S चुचु

मनीषा 22/09/2009 - 15:49
सये बाई संसार मी भुलाबाईचा मांडला अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला भोंडला छानच मांडला आहे ... ( कधी अचानक, कधी सहज येणारी सुख - दु:ख ही या भोंडल्याची खिरापत ना?)

नवरात्राचे दिवस म्हणजे हादग्याचे, भोंडल्याचे, भुलाबाईचे दिवस.

"मिलर ऑफ द डी"

युयुत्सु ·

सहज 19/09/2009 - 19:49
कविता छानच आहे पण आजकाल शक्य आहे तसे? जास्त काही न करता प्राईम रियल इस्टेट असेल व असुन कोणी हेवा न करेल किंवा शांत झोप लागेल?

In reply to by सहज

गुंडोपंत 20/09/2009 - 08:34
हम्म! हल्ली गुंड कांदे गजाआड झाल्यामुळे नाशकात तरी बरे आहे. बाकी बिल्डर कुठे डोळा ठेवून असतील सांगता येत नाही! आता आली नाशिकला नवी रेझर्वेशन काढायची नोटीस - आहे मलिदा खायची पर्वणी - ज्यांना काही मिळत नाहीये ते पाटिल चाललेत कोर्टात! पैसा कमावायचा असेल तर नाशकात बिल्डर आणि नगरसेवक व्हा! आपला गुंडोपंत

मूळ कवितेत The miller smiled and doffed his cap I earned my bread quoth he.. I love my wife,I love my friend,I love my childrean three.. अश्याही ओळी आहेत. युयुत्सुंनी wife चा उल्लेख शिताफीने टाळला आहे.(उगाच सप्तपदीचे झंझट नको.) :D ह.घ्या.

sujay 19/09/2009 - 20:22
सुंदर स्वैरअनुवाद !! असेच लिखाण येऊ द्या अजून. सुजय मला २ महिन्यानंतरही खव आणी खफ मध्ये लिहायची सोय उपलब्ध नाही. मी काय करावे?

श्रावण मोडक 19/09/2009 - 20:50
चांगला स्वैरानुवाद. गाळलेल्या ओळींचा अपवाद. त्याही घ्यायला काही हरकत नाही. जुन्या धाटणीची कविता साकारली या अनुवादात. छान. स्वगत: हे असे चांगले करता येते तर हा गृहस्थ एरवी त्या विषयांमध्ये का अडकलेला असतो कळत नाही!!!

अवलिया 19/09/2009 - 23:07
उत्तम. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्राजु 20/09/2009 - 04:19
चांगला जमला आहे अनुवाद. कवितेला एक लयही आहे. वाचताना छान वाटली. अजूनही येउद्यात असे अनुवाद. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by नंदन

सुबक ठेंगणी 20/09/2009 - 10:26
असंच म्हणते. चांगला गेय अनुवाद. तितकेच चांगले "मराठीकरण"

पीठमंडित तव टोपी पुढती रत्नजडित मम मुकुट कुठे"
वा क्या बात है| गावाकडच्या गिरणीत गांधी टोपी घालणारा वसंत नंतर पीठाची टोपी झटकुन गप्पा मारत असे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

धनंजय 22/09/2009 - 23:06
भाषांतर. एक अवांतर विचार मनात आला - युरोपात धान्य दळायला गावातल्या दळण-वाल्याकडे नेत असत, तसा कोणी व्यावसायिक मध्ययुगीन भारतात मात्र नाही. धान्याचे दळण-कांडण घरच्या घरीच होई. (बाकी लोहार-कुंभार-कोष्टी वगैरे मध्ययुगीन भारतात होते - म्हणजे प्रत्येक गोष्ट घरीच केली पाहिजे असा काही नियम नव्हता...)

Miller of The Dee या सुप्रसिद्ध इंग्लिश कवितेचे मी केलेले मराठी स्वैर रुपांतर. कुण्या नदीच्या तीरावरती एक पिठाची गिरणी वसे मालक त्या हो पिठगिरणीचा स्वछंदी आनंदी असे जात्याच्या तो सुरात मिसळी स्वानंदाचे गीत कसे ना हेवा मी करी कुणाचा, कुणी न माझा करीतसे कुशल प्रजेचे बघण्या राजा येई एकदा नदीतीरी श्रमपरिहारक सुरावटी त्या राजहृदयी मात्सर्य भरी "चुकसी मित्रा" राजा वदला "हेवा वाटे तव मजला, वैभव सारे भोगत असुनी कष्टी कसा मी?

समिधा

क्रान्ति ·

धनंजय 07/09/2009 - 23:53
चित्रपट गीत म्हणूनही मस्त. ही कविता वाचताना शेजारच्याच "समृद्ध करणारे असे काही" सदरातले "येणार नाथ आता" हे गाणे ऐकतो आहे. अशाच एखाद्या चित्रपटातल्या शांत-उदात्त नायिकेच्या दिनक्रमाचे चित्रण होताना वरिल कविता स्वरबद्ध होऊन गायली जात आहे, असे चित्र डोळ्यांपुढे आले.

In reply to by धनंजय

असेच काहीसे वाटले. कुठेही जा, तुझ्यासाठीच माझा जीव घुटमळतो निरपेक्ष प्रेमाची परमावधी. अवांतर: ही कविता वाचताना 'दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले' वगैरे आठवले. बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश 08/09/2009 - 10:17
समिधा हा शब्दच मला फार आवडतो.त्यागापेक्षा वेगळे असे आत्मसर्पण त्या शब्दात भरले आहे. आणि त्या शब्दाचा चपखल वापर करून कविता अधिकच खुलली आहे असे वाटते ऋषिकेश ------------------ सकाळचे १० वाजून १४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "माझी न राहिले मी...."

In reply to by ऋषिकेश

यशोधरा 08/09/2009 - 15:47
>>समिधा हा शब्दच मला फार आवडतो. त्यागापेक्षा वेगळे असे आत्मसर्पण त्या शब्दात भरले आहे. असेच म्हणते. सुरेख कविता.

अनिल हटेला 08/09/2009 - 15:37
नेहेमीप्रमाणे सुरेख कविता!!! आवडली.... :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

प्राजु 08/09/2009 - 20:04
सुरेख!! निखळ समर्पणाची भावना आहे. खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अन्वय 08/09/2009 - 20:24
क्रांती, छानच झालीय कविता तुमची "करून झाले' ही गझलही खूप भावली

उभ्या जन्मात मी बहुधा तुझ्या यज्ञातली समिधा || कधी मी सावली झाले तुला ग्रीष्मात जपणारी तुझ्या बहरात मी झाले कळी गंधात रमणारी बहरले धुंद मी कितीदा तुझ्या यज्ञातली समिधा || कधी अभिसारिका झाले, प्रिया झाले, सखी झाले रमा नारायणाची, शंकराची पार्वती झाले कधी कृष्णा तुझी राधा तुझ्या यज्ञातली समिधा || तुला पाहून माझ्या अंतरी प्राजक्त दरवळतो कुठेही जा, तुझ्यासाठीच माझा जीव घुटमळतो प्रिया, तू सूर्य मी वसुधा तुझ्या यज्ञातली समिधा ||

(दगड)

ब्रिटिश ·

अवलिया 04/09/2009 - 16:23
लै भारी रं बाला... =)) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

धमाल मुलगा 04/09/2009 - 16:27
लय खास :) दोन कविता..दोन्ही टोकाच्या मतांवर कोरडे ओढणार्‍या!!! मस्त झाली जुगलबंदी!! दादूस, लय दिवसांनी चेतला की रं तू :)

In reply to by धमाल मुलगा

अवलिया 04/09/2009 - 16:29
लय दिवसांनी चेतला की रं तू दादुस असाच चेतनार असल तर रोज एक देवाची कविता, लेख टाकेन म्हणतो... काय दादुस? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

ब्रिटिश 04/09/2009 - 16:49
>>>लय दिवसांनी चेतला की रं तू चीताललो नाय रं आसच औकातीत रावून काय बाय खरडलय बग मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

In reply to by श्रावण मोडक

ब्रिटिश 04/09/2009 - 17:36
जल्ल मना ' सदगृहस्थ' म्हन्ताव ? यकदा भेटाव पायजेल तुमाला भलतच : स्वाईन फ्लु च्या सातीमदे देशी पीनारा यक बी पेशंट नवता. वासानच वायरस मरतो म्हनं ! आख्खी मानस जवल याला घाबरतान त वायरच काय झेउन बसलावं. मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

In reply to by श्रावण मोडक

ब्रिटिश 04/09/2009 - 17:36
जल्ल मना ' सदगृहस्थ' म्हन्ताव ? यकदा भेटाव पायजेल तुमाला भलतच : स्वाईन फ्लु च्या सातीमदे देशी पीनारा यक बी पेशंट नवता. वासानच वायरस मरतो म्हनं ! आख्खी मानस जवल याला घाबरतान त वायरसच काय झेउन बसलावं. मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

सुनील 05/09/2009 - 06:18
जर या लेखनाला औकात म्हणत असतील तर इतर अनेकांनी लेखन संन्यासच घ्यावा! सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश 04/09/2009 - 16:31
वा! लय भारी ना! ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ४ वाजून ३० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "देव देव्हार्‍यात नाहि...."

लै भारी दादुस.... आवडली ही पण कविता... म्हनुन आम्ही म्हनतो दुसर्याचे ऐकुन ना दगडाला देव माना ना दगडाला देव. निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

मदनबाण 04/09/2009 - 16:47
रं बाला लयं भारी कविता करुन राह्यला रं तू... :) मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

चतुरंग 05/09/2009 - 19:08
एकदम पहिल्या धारेचं इडंबन की रं बाला! ;) आरं दादूस तू बी इडंबन मधे वेंट्री मारली का? आमचा धंदा का बशिवतो रं बाला? मांडवली करुन टाकू, बोल काय झेनार? :? (समझौता)चतुरंग

सनक : http://www.misalpav.com/node/9230 डोक चालवल तरी समजत नाय डोल फारुन बगल तरी दिसत नाय वारा दीसतो क ? तरी हाय ना मंग तसाच द्येव बी हाय हे ठोकून सांगनार्‍या म्हाराजांच्या, बुवांच्या आनी भगवी कापडवाल्याच्या मतावर विश्वास टाकुन मी समोरच्या दगडाला डोक टेकुन पाया परलो न माजी न माज्या फॅमीलीची जीम्मेदारी त्या दगडावर ढकलून झोपून झेलो.

मन इंद्रधनू

क्रान्ति ·

प्राजु 01/09/2009 - 22:55
दूर मंदिरात घुमे टाळ-मृदुंगाची वाणी सुरावटी त्या वाहते गावयमुनेचे पाणी सूर गुंफून शब्दांत हरीरूप रंगवावे सुरेख!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

दिपक 02/09/2009 - 10:07
सुरेख कविता...! तुमच्या सर्व कविता छान असतात क्रांतीताई.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अवलिया 01/09/2009 - 23:50
कविता आवडली ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by दशानन

मदनबाण 02/09/2009 - 12:40
हेच म्हणतो... :) मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

In reply to by मदनबाण

अनिल हटेला 04/09/2009 - 16:23
अगदी अगदी....सुरेख.... :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

प्रभो 02/09/2009 - 13:05
कधी दंवात भिजावे, कधी चांदणे वेचावे येता आभाळ भरून मन इंद्रधनू व्हावे
खूप छान.....मस्त झालीय कविता...

मराठमोळा 04/09/2009 - 19:32
अप्रतिम कविता!! खुप आवडली. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

राघव 05/09/2009 - 00:09
सुंदर कविता / गीत! ध्रुवपद विशेष! देवकाका, एक झक्कास चाल येऊ देत!! ;) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )

कधी दंवात भिजावे, कधी चांदणे वेचावे येता आभाळ भरून मन इंद्रधनू व्हावे ऊन-पावसाचा लपंडाव, श्रावणाची गाणी मेघांतून झरणारी वेड्या यक्षाची कहाणी निळ्यासावळ्या दूताने माझ्या दारी बरसावे तहानेली काळी धरा जसा यशोदेचा कान्हा धारा पावसाच्या जसा झरे देवकीचा पान्हा प्राशून त्या अमृताला तनमन तृप्त व्हावे दूर मंदिरात घुमे टाळ-मृदुंगाची वाणी सुरावटी त्या वाहते गावयमुनेचे पाणी सूर गुंफून शब्दांत हरीरूप रंगवावे

हेरंबा...

कौतुक शिरोडकर ·

प्रमोद देव 31/08/2009 - 11:27
एक दोन ठिकाणी मात्रा कमी जास्त झाल्यासारखे वाटतंय. पण एकूण रचना मस्त झालेय. चाल लावावी काय? :? विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

हेरंबा... आरंभा...

मन

पद्मश्री चित्रे ·

दशानन 29/08/2009 - 17:49
मन पावसाचे थेंब ,मन जणु प्रतिबिंब मन सुकल्या रानात, एक नाजुकसा कोंब.. सुंदर ओळी ! आवडली कविता !

राघव 29/08/2009 - 18:02
फार साध्या शब्दांत अतिशय सुंदर लिहिलेत.. ब्येश्टेश्ट!!! :) "मन पावसाचे थेंब ,मन जणु प्रतिबिंब".. खूप छान. येऊ द्यात अजून. अभिनंदन! राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु ) कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी.. सदियों रहा है दुश्मन दौर-ए-जमाँ हमारा!

अवलिया 29/08/2009 - 18:28
सुरेख...मस्त. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मीनल 29/08/2009 - 18:42
प्राजु ची कविता आठवली. साधारण अशीच आहे. दोन्ही उत्तम आहेत. प्राजु, कृपया टाक येथे .पुन्हा वाचू देत सर्वांना या कवितेच्या बरोबर. मीनल.

मन श्वास या देहात, मन पाखरु रानात मन ज्योत राउळात कधी वीज आकाशात मस्त जमलंय... आपला हृषी !!

क्रान्ति 29/08/2009 - 19:37
खूप सुरेख लिहिलंस ग फुलवा! मन नाजूक सतार ,मन अबोल गंधार मन सांजावल्या रानी, कृष्ण बासरीचा स्वर... सगळीच कविता खूप आवडली. वरच्या दोन ओळी अत्याधिक आवडल्या. [कृष्णभक्त] क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

प्रमोद देव 30/08/2009 - 11:20
कविता ’मनात’ ठसली. विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

मन 30/08/2009 - 15:14
यावरुनच काही ओळी (बहुदा सुधीर मोघेंच्या (कवी ग्रेस ह्यांच्या दुसर्‍या एका कवितेवरुन बनवलेल्या))सहज आठवल्या... मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा स्वप्नातील पदर धुक्याचा, हातात कसा लागावा मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेलं मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेलं मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल दुबळया गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा चेहरा-मोहरा याचा, कुणी कधी पाहिला नाही मन अस्तित्वाचा सिंधू, भासाविण दुसरा नाही या ओळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा आणि हे ध्नि मुद्रित गीत म्हणुनही उपलब्ध आहे. बहुतेक श्रीधर फडक्यांनी चाल लावलिये सुरेख अशी. आपलाच, मनोबा

मन गवताचे पाते ,मन मेघ पावसाचे मन पहाटवार्‍याचे , दव होउन बोलते.. मन नाजूक सतार ,मन अबोल गंधार मन सांजावल्या रानी, कृष्ण बासरीचा स्वर... मन रात्र शांततेची ,मन नक्षी चांदण्यांची मन लाट सागराची, वाट आडवळणाची मन तेज भास्कराचे,मन वार्‍याच्या वेगाचे मन अलवार सूर नभी एकटे गुंजते मन श्वास या देहात, मन पाखरु रानात मन ज्योत राउळात कधी वीज आकाशात मन पावसाचे थेंब ,मन जणु प्रतिबिंब मन सुकल्या रानात, एक नाजुकसा कोंब..