Skip to main content

मन इंद्रधनू

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 01/09/2009 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
कधी दंवात भिजावे, कधी चांदणे वेचावे येता आभाळ भरून मन इंद्रधनू व्हावे ऊन-पावसाचा लपंडाव, श्रावणाची गाणी मेघांतून झरणारी वेड्या यक्षाची कहाणी निळ्यासावळ्या दूताने माझ्या दारी बरसावे तहानेली काळी धरा जसा यशोदेचा कान्हा धारा पावसाच्या जसा झरे देवकीचा पान्हा प्राशून त्या अमृताला तनमन तृप्त व्हावे दूर मंदिरात घुमे टाळ-मृदुंगाची वाणी सुरावटी त्या वाहते गावयमुनेचे पाणी सूर गुंफून शब्दांत हरीरूप रंगवावे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4598
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

दूर मंदिरात घुमे टाळ-मृदुंगाची वाणी सुरावटी त्या वाहते गावयमुनेचे पाणी सूर गुंफून शब्दांत हरीरूप रंगवावे सुरेख!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

सुरेख कविता...! तुमच्या सर्व कविता छान असतात क्रांतीताई.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कविता आवडली ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by मदनबाण

अगदी अगदी....सुरेख.... :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

वा... क्रांतीतै, लै झ्याक ! लै आवाडली ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

कविता फार आवडली. विशेषत : मेघांतून झरणारी वेड्या यक्षाची कहाणी . . .हि कल्पना / शब्दरचना अप्रतिम.

कधी दंवात भिजावे, कधी चांदणे वेचावे येता आभाळ भरून मन इंद्रधनू व्हावे अतिशय सुंदर.... दिपाली :)

कधी दंवात भिजावे, कधी चांदणे वेचावे येता आभाळ भरून मन इंद्रधनू व्हावे
खूप छान.....मस्त झालीय कविता...

अप्रतिम कविता!! खुप आवडली. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

सुंदर कविता / गीत! ध्रुवपद विशेष! देवकाका, एक झक्कास चाल येऊ देत!! ;) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )

दूर मंदिरात घुमे टाळ-मृदुंगाची वाणी सुरावटी त्या वाहते गावयमुनेचे पाणी सूर गुंफून शब्दांत हरीरूप रंगवावे सुंदर...!