मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शांतरस

(पिवळा बाज)

चेतन ·
लेखनविषय:
काव्यरस
जयवी ताईंची सुंदर कविता हिरवा साज वाचुन परत एकदा आज विडंबनाची कंड सुटली डिस्केमिअरः (२६/११/२००९) सारखच् असो... मधूनच घाऊक बरसतो कसा मालक टवाळी थांबवतो आणिबाणिचा प्रशासक पुपे कविता पाडती अन टिंग्या ही चतुर संपादकही खोडकर, उडवण्यास आतूर पेशवाईचे नगारे नित्य बुधवारी फाटे बडवुनी ही भुई, साप म्हणोनी धोपटे जिरवतो जुना कंड, हा घालुन विरजण टंकणारी ती माकडे टुल्ल शिवास पिउन ३_१४ संक्षिप्त ताईजी बसे दुर्बीण रोखून पाडे उतारा विडंबन शनिवार पाहून टीळा लावियला भाली, टार्‍या माळ घालून टंके प्रतिसाद सरळ म्हणे आलो

[मित्र]

अमृतांजन ·
लेखनविषय:
मुळ कवीची माफी मागून हे विडंबन सादर! आयडी नाही मिळाला तर लॉगिन होणारच कसे? प्रतिसाद नाही मिळाला तर वेळ जाणारच कसे? होईलच मिपा पूर्ण दंग्याशिवाय कसे? मग कंपू आपले अपूर्णच रंगाविना जसे संपादन- स्वोज्वळपणाचे हे सोंग त्यांना कळले नसेल नाही फुटणार ना रे बिंग आयपी ट्रॅकर लावला तर नसेल?.

<खड्ड्या तुझ्या मिठीत रे....... >

विजुभाऊ ·
लेखनविषय:
आमची प्रेरणा : सखये तुझ्या मिठीत..... तुज पाहिल्या क्षणी मी , विरलो जरा तिथेच रस्त्यात होतास एकटा, माणसांच्या या दाटीत रे! कोवळ्या उन्हांत जेंव्हा , होतास तू गढूळलेला ओलांडता कोलमडलो , चिखलाच्या मिठीत रे! अन्दाज सखोलीचा आला मला न केंव्हा सगळे तुझ्यात झाले , आडवे किती पटीत रे ! स्कूटर मोटार सायकल ; ऐसा भेदभाव कधी न झाला सारेच आडवे झाले ; खड्ड्या तुझ्या मिठीत रे गांगरलो असा मी , दणका तुझा देण्याला भिक्कार भीजलेला , कुठल्या चिखलवटीत रे? खणले तुला न कोणी ; शान तू या रस्त्याला तूज मुजवले कोणी नाही ; खलित्यांच्या रेटारेटीत रे हार मानिली सार्‍यानी ; तू तसाच राहिला खड्ड्या सारेच रे पडले ,

कोडी

क्रान्ति ·
लेखनविषय:
काव्यरस
प्रत्येक वादळाला केली बहाल होडी तेव्हाच जाणली मी जगण्यामधील गोडी साधे, सपाट रस्ते नव्हतेच या दिशेला आधार सावल्यांचा झाकोळल्या निशेला पायांत शृंखला अन् वाटाहि नागमोडी एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी वैशाख-काहिलीचीही वाट पाहिली मी अन् बोलले, "वसंता, तू घे उसंत थोडी!" मौनात राहण्याने नुकसान फार केले जाणून आपल्यांनी पाठीत वार केले माया अजून उरली का काळजात थोडी? या जन्मसिद्ध भोगांचे अर्थ काय होते? जावे जिथे, तिथे का गुंत्यात पाय होते? मी सोडवीत गेले, तू घातलीस कोडी!

पैलतिरी..

प्राजु ·
लेखनविषय:
काव्यरस
पुन्हा पुन्हा तू नको विचारू! प्रीत आपुली जन्मांतरी सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी.. इतुके ओझे अपेक्षांची खांद्यावरती असे भारी किंचित हसूनी जगतानाही कळ उठते हृदयांतरी थोडी होईल गती कमी पण नसेल काही जबाबदारी सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी.. किती संपले किती राहिले, हिशोब सारा यथातथा मनांस वरले मनानेच मग काय कथा अन काय व्यथा? शितल छाया मनांस भावेल, रखरखणार्‍या उन्हापरी सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी.. नको विचारू कधी, कुठे तू!

मुक्तिदाता

श्रावण मोडक ·
लेखनविषय:
काव्यरस
अ-भाव, किर्र, काळा, शून्य, कभिन्न, अंधार! मनांच्या कल्लोळात, इंद्रियांच्या अविष्कारातही उच्चाराच्या अपेक्षेत, उद्गाराच्या प्रतीक्षेतही पाणावलेल्या डोळ्यांत, उकललेल्या पापण्यांतही विरलेल्या विस्मृतीत, दाटलेल्या आठवणींतही सुन्न एकटेपणात, समुहांच्या दाट गर्दीतही, निःशब्द रात्री, अबोल दिवसाही भारलेल्या जन्मकैदेत, आभास अन् अस्तित्त्वाचा अनासक्त मुक्तिदाता काळाकभिन्न अंधार!

बलुतं

कौतुक शिरोडकर ·
लेखनविषय:
काव्यरस
तसा अनेकांनी प्रयत्न केला माझ्या हिंस्त्र मनाला आवर घालण्याचा, नसलेल्या हाडाचा फायदा उचलणार्‍या जिभेला वळण लावण्याचा, षडरिपूंनी पोखरलेल्या देहाला चांगुलपणाचा छंद लावण्याचा, पण वेदनांची बलुतं वाटण्याचा उद्योग जन्मसिद्ध अधिकारासारखाच... या प्रवृत्तीचे मूळ शोधण्यासाठी ग्रंथसंपदा चाळण्याची गरज नाही.... जन्मदात्रीला असह्य वेदना देऊनच जन्माला आलोय मी... तुमच्यासारखाच... म्हणून तर .... वेदनांची बलुतं वाटण्याचा उद्योग जन्मसिद्ध अधिकारासारखाच... जसा माझा तसाच तुमचाही..........

आभाळ

नेहमी आनंदी ·
लेखनविषय:
काव्यरस
घरकूल छोटस, ना महालाचा हव्यास, दोन पिलांच हास्य, आणि तू मात्र खास, प्रेम भरपूर आणि रागाचा नुसता भास, ना आकांक्षा चंद्र सूर्याची, तुझ्या सावलीचा ध्यास, उंच आकाशी फिरून पुन्हा धरतीवरच घ्यावा श्वास,, हे एवढ आभाळ तुझ्या माझ्या स्वप्नांना पुरेस आहे . प्रसन्ना जीके.२३/४/२००८

जुनी पत्रं

नेहमी आनंदी ·
लेखनविषय:
काव्यरस
आज उघडुन बसले होते सगळी जुनी पत्रे तुझी, माझी, काही जपलेली, न पाठवलेली, काही फाडलेली.... कधी डोळे भरुन येत होते कधी रागाने लाल होत होते.. कधी मी उदास होत होते कधी हरवून जात होते... एक पत्र तुझं मला पाठवलेलं एक असच खुप जुन्या मैत्रिणीचं पहिल्यांदा माहेरी गेल्य नंतर एकटं वाटत असताना तू लिहिलेलं तसचं तुझ्या सोबत आल्यानंतर सखी ने पा्ठवलेले खास बंध.... असच एक पत्र हाती आलं खुप खोल दडवून ठेवलेलं.. माझ्या बाबांच...... लग्नानंतर आलेल पहिलं पत्र... खुपसं काळजी करणारं तेवढचं धीर देणारं.. खुप न सांगता खुप काही सांगणारं.... जपुन ठेवलय मी आज ही आज तेच पत्रं म्हणजे माझे बाबा झालेय मला सोडून गेलेले पण