Skip to main content

हेरंबा...

लेखक कौतुक शिरोडकर यांनी सोमवार, 31/08/2009 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
हेरंबा... आरंभा... वंदन विघ्नेशा शिवसुता मज तुझी कृपाभिलाषा अष्टौप्रहरी चित्ती तव नामघोषा नतमस्तक श्रीचरणी भक्त सर्वेशा जय देव जय देव जय बुद्धीदाता ओवाळू आरती विश्वाच्या नाथा || जय देव|| साजिरी गोजिरी मोहक मुर्ती चराचराची चैतन्यस्फुर्ती गजमुख ज्ञानेश्वरा तू इच्छापुर्ती अंतरी उधाण मांगल्यभरती जय देव जय देव जय बुद्धीदाता ओवाळू आरती विश्वाच्या नाथा || जय देव|| विराजे मंचकी आदी अंतिमा चतुर्भुज सुशोभित प्रतिमा तेजाने ओजाने दग्ध काळिमा दिव्यप्रभांकीत मुखचंद्रमा जय देव जय देव जय बुद्धीदाता ओवाळू आरती विश्वाच्या नाथा || जय देव|| वक्रतुंडाहाती मोदक ज्ञानाचा परशू करी नाश अवघ्या विघ्नांचा हर्ता अंकुश धारी षडरिपूंचा शुभाय आशिष देई सौख्याचा जय देव जय देव जय बुद्धीदाता ओवाळू आरती विश्वाच्या नाथा || जय देव||
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1648
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

एक दोन ठिकाणी मात्रा कमी जास्त झाल्यासारखे वाटतंय. पण एकूण रचना मस्त झालेय. चाल लावावी काय? :? विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)