भैरवी
एक एक पाश तोड, गुंतण्याची वेळ नाही
परतीचा प्रवास हा, थांबण्याची वेळ नाही
विसर ते हेवेदावे, घाल अपराध पोटी,
कोण कसे चुकले हे सांगण्याची वेळ नाही
तुझे नसलेले सारे गुन्हे इथे सिद्ध झाले,
वेड्या मना, तुझी बाजू मांडण्याची वेळ नाही
संकटांनी आयुष्याशी उभे दावे मांडलेले,
रात्र ही वै-याची आहे, पेंगण्याची वेळ नाही
पैलतीर दिसे आता, आवरून घे सुरांना,
भैरवीवाचून काही रंगण्याची वेळ नाही
वाचने
5063
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
वाचनीय
सुरेख !
In reply to सुरेख ! by अवलिया
+१
झकास!
In reply to झकास! by प्रमोद देव
क्लास्स..........
मस्त!
छान
वा
मस्तच ...
अतिशय सुंदर!
सुरेख !
सुंदर .. !
In reply to सुंदर .. ! by पार्टनर
क्रांतीतै!
In reply to क्रांतीतै! by सुबक ठेंगणी
हो.
In reply to क्रांतीतै! by सुबक ठेंगणी
किती हुषार
सुंदर
केवळ
वा क्रांतीताई सुरेख रचना!
चांगली रचना.
छान आहे.
मस्त...
फर्मास !!