मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शांतरस

दिवाळीचा आशावाद...

निमिष सोनार ·
लेखनविषय:
काव्यरस
आली पुन्हा प्रकाशमान दिवाळी जशी अस्सल सोन्याची झळाळी दूर होवू दे संकटांची छाया काळी नष्ट होवू दे समस्यांची दाट जाळी पसरु दे ज्ञानाचा प्रकाश आभाळी खुलू दे दु:खी मनांची कळी भरू दे आनंदाने प्रत्येकाची झोळी आली प्रकाशमान दिवाळी आली प्रकाशमान दिवाळी

भैरवी

क्रान्ति ·
लेखनविषय:
काव्यरस
एक एक पाश तोड, गुंतण्याची वेळ नाही परतीचा प्रवास हा, थांबण्याची वेळ नाही विसर ते हेवेदावे, घाल अपराध पोटी, कोण कसे चुकले हे सांगण्याची वेळ नाही तुझे नसलेले सारे गुन्हे इथे सिद्ध झाले, वेड्या मना, तुझी बाजू मांडण्याची वेळ नाही संकटांनी आयुष्याशी उभे दावे मांडलेले, रात्र ही वै-याची आहे, पेंगण्याची वेळ नाही पैलतीर दिसे आता, आवरून घे सुरांना, भैरवीवाचून काही रंगण्याची वेळ नाही

रान

क्रान्ति ·
लेखनविषय:
काव्यरस
ज्याच्या सावलीचा धरावा विश्वास विषवल्ली कवटाळे त्या वृक्षास जळला मोहर, झडली पालवी, दिसे रिता, पर्णहीन तो भकास विषवल्ली तरारली, फोफावली, वाढत चालली; वेढत चालली घनदाट गर्द हिरव्या रानाला, एकेका वृक्षाची गिळत सावली रान कुठे आता? उद्ध्वस्त स्मशान घोंघावतो वारा एकटा बेभान उघडे-बोडके निष्पर्ण सांगाडे फांदीफांदीवर भुतांचे थैमान क्षणात अवघे चित्र पालटेल वठल्या वृक्षाला धुमारा फुटेल मिटतील विध्वंसाच्या खाणाखुणा, पुन्हा रानात या गारवा दाटेल मन रान, विषवल्ली अहंभाव वेड्या, कर तिचा वेळीच पाडाव जाळ तिची बीजं, तोड तिच्या फांद्या, आणि जिंकून घे आयुष्याचा डाव

"मिलर ऑफ द डी"

युयुत्सु ·
लेखनविषय:
काव्यरस
Miller of The Dee या सुप्रसिद्ध इंग्लिश कवितेचे मी केलेले मराठी स्वैर रुपांतर. कुण्या नदीच्या तीरावरती एक पिठाची गिरणी वसे मालक त्या हो पिठगिरणीचा स्वछंदी आनंदी असे जात्याच्या तो सुरात मिसळी स्वानंदाचे गीत कसे ना हेवा मी करी कुणाचा, कुणी न माझा करीतसे कुशल प्रजेचे बघण्या राजा येई एकदा नदीतीरी श्रमपरिहारक सुरावटी त्या राजहृदयी मात्सर्य भरी "चुकसी मित्रा" राजा वदला "हेवा वाटे तव मजला, वैभव सारे भोगत असुनी कष्टी कसा मी?

समिधा

क्रान्ति ·
लेखनविषय:
काव्यरस
उभ्या जन्मात मी बहुधा तुझ्या यज्ञातली समिधा || कधी मी सावली झाले तुला ग्रीष्मात जपणारी तुझ्या बहरात मी झाले कळी गंधात रमणारी बहरले धुंद मी कितीदा तुझ्या यज्ञातली समिधा || कधी अभिसारिका झाले, प्रिया झाले, सखी झाले रमा नारायणाची, शंकराची पार्वती झाले कधी कृष्णा तुझी राधा तुझ्या यज्ञातली समिधा || तुला पाहून माझ्या अंतरी प्राजक्त दरवळतो कुठेही जा, तुझ्यासाठीच माझा जीव घुटमळतो प्रिया, तू सूर्य मी वसुधा तुझ्या यज्ञातली समिधा ||

(दगड)

ब्रिटिश ·
लेखनविषय:
काव्यरस
सनक : http://www.misalpav.com/node/9230 डोक चालवल तरी समजत नाय डोल फारुन बगल तरी दिसत नाय वारा दीसतो क ? तरी हाय ना मंग तसाच द्येव बी हाय हे ठोकून सांगनार्‍या म्हाराजांच्या, बुवांच्या आनी भगवी कापडवाल्याच्या मतावर विश्वास टाकुन मी समोरच्या दगडाला डोक टेकुन पाया परलो न माजी न माज्या फॅमीलीची जीम्मेदारी त्या दगडावर ढकलून झोपून झेलो.

मन इंद्रधनू

क्रान्ति ·
लेखनविषय:
काव्यरस
कधी दंवात भिजावे, कधी चांदणे वेचावे येता आभाळ भरून मन इंद्रधनू व्हावे ऊन-पावसाचा लपंडाव, श्रावणाची गाणी मेघांतून झरणारी वेड्या यक्षाची कहाणी निळ्यासावळ्या दूताने माझ्या दारी बरसावे तहानेली काळी धरा जसा यशोदेचा कान्हा धारा पावसाच्या जसा झरे देवकीचा पान्हा प्राशून त्या अमृताला तनमन तृप्त व्हावे दूर मंदिरात घुमे टाळ-मृदुंगाची वाणी सुरावटी त्या वाहते गावयमुनेचे पाणी सूर गुंफून शब्दांत हरीरूप रंगवावे

मन

पद्मश्री चित्रे ·
लेखनविषय:
काव्यरस
मन गवताचे पाते ,मन मेघ पावसाचे मन पहाटवार्‍याचे , दव होउन बोलते.. मन नाजूक सतार ,मन अबोल गंधार मन सांजावल्या रानी, कृष्ण बासरीचा स्वर... मन रात्र शांततेची ,मन नक्षी चांदण्यांची मन लाट सागराची, वाट आडवळणाची मन तेज भास्कराचे,मन वार्‍याच्या वेगाचे मन अलवार सूर नभी एकटे गुंजते मन श्वास या देहात, मन पाखरु रानात मन ज्योत राउळात कधी वीज आकाशात मन पावसाचे थेंब ,मन जणु प्रतिबिंब मन सुकल्या रानात, एक नाजुकसा कोंब..