मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शांतरस

अगा लेखकांनो

सन्जोप राव ·
लेखनविषय:
काव्यरस
हे तुमचं लिखाणबिखाण गोष्टीबिष्टी, लेखबिख, कविताबिविता हे सगळं ठीक आहे चांगलंच आहे उदाहरणार्थ चंद्र, नद्या, पक्षी, फुले, निसर्ग पहिला पाऊस, आईची माया, माणुसकी फुटपाथवरची म्हातारी, प्रेयसीची आठवण, फाटका झगा जन्म, मृत्यू, प्रेम, स्वार्थ, मैथुनही गडकर्‍यांपासून कोलटकरांपर्यंत दासू वैद्य, वर्जेश इश्वरलाल सोळंकी मध्ये विंदाबिंदा, बाकीबाब, पाडगावकर आणि कुसुमाग्रज सगळे झाडून कवी झाले बघा गाडगीळ, गोखले, माडगूळकरांपासून गवस पेठ्यांपर्यंतच्या कथा घ्या आपट्यांपासून महाजनांपर्यंत कादंबर्‍या घ्या दोस्तोवस्की घ्या, टॉलस्टॉय घ्या, स्ट्रिंडबर्ग घ्या लोकांना माहिती असलेले तर घ्याच, पण माहिती नसलेले आधी घ्या वैच

तुझी जीन्स पॅन्ट

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
तुझी जीन्स पॅन्ट तुझी जीन्स पॅन्ट चाललीय खाली खाली काय शोभेना तूझ्या असल्या चाली ||धृ|| शॉर्ट शर्ट जाई वरती वरती मधेच अंग दिसतया मागं कंबर लचकवूनी का उगा आसं चालतीया गॉगल घालूनी बघतेस कुठे जरा भडकच पावडर गाली काय शोभेना तूझ्या असल्या चाली ||१|| सॅन्डल पायात घालूनी नार नखरेदार चाले नजरा लोकांच्या झुलवी कानात झुबके बाळी हाले काळीज धडधड उडे जेव्हा स्किन टाईट जीन्स तू घाली काय शोभेना तूझ्या असल्या चाली ||२|| अशी ग कशी फॅशन तूझी अंग त्यातून दिसतया कोण कोणाची तू समजना रूमालानं तोंड झाकतीया कापडं घालायची रीत नाही बरी दुनिया जरी इतकी पुढे गेली काय शोभेना तूझ्या असल्या चाली

पिकल्या आंब्याला

पाषाणभेद ·
काव्यरस
पिकल्या आंब्याला सिच्यूऐशन: हिरवीन आंबे विकणारी आहे. आंबे विकतांना ती गिर्‍हाईकांशी काव्यातून संवाद साधते... गद्य: आंबे घ्या आंबे, गोड गोड रसाळ आंबे आंबे घ्या हो आंबे!

नदीकाठी सासूरवाशीण

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
नदीकाठी सासूरवाशीण
अल्याड आहे सासर माझं, पल्याड माहेरा पाहते मधी वाहे चंद्रभागा, त्यात धुनं मी गं धुते || पानी वाहे दुधगंगा, जसं अमृताच्या चवीचं त्याची गोडी काय सांगू, त्याची गोडी अविट || नदीकाठची शाळू वाळू, बारीक बारीक मदी आसतील गोटे, बी संगे खारीक || माहेर मोठं दांडगं, नाही कसली वनवा सासर बाई आसलं द्वाड, त्याला कसली पर्वा || सोडले मोकळे पाय नदीच्या ग पान्यात, ऐन्यात रूप दिसे, रूपे सोनेजडीत || जा ग माय जा ग माय, अशीच ग तू वाहत भरव तुझ्या लेकरांना, चारा देई दुष्काळात || कितीकदा येते

प्रार्थना

स्पंदना ·
लेखनविषय:
काव्यरस
साद मागची; साद नसे रे, हा तर सारा भुलावा. क्षणभर भुलवी; धरा सोडवी, भवसागर कैसा तरावा? चुकार मनाच्या बसे कोनाडी; हळुवार शिळ जशी विरावी, हवेत जरी ती नसे कुठेही, ठोका हृदयाचा चूकवी. असतील जर पाश कुठे रे जखडाया मना; तना सोबती, ऐवज सारा गहाण घालीन सात जन्म वरती. सोडव मजला मनापासुनी नको वेदना; नको भिरभिरणे, थांबव माझे बंजारेपण, घाल पदरी स्थिर जगणे. अपर्णा

तुझ्या रूपातले राग

क्रान्ति ·
लेखनविषय:
काव्यरस
काही तालात, सुरात, काही लयीत चुकले तुझ्या रूपातले राग मनापासून शिकले रात्री जागवल्या मालकौंस, बागेसरी गात आर्त विराण्या गाइल्या जोगियाच्या प्रहरात भल्या पहाटेला भैरवाच्या चरणी झुकले काळजात कोमेजले मुक्या कळ्यांचे नि:श्वास तरि ग्रीष्मकहराचा नाही केला रे दुस्वास सारंगाच्या सुरांत या वेड्या जिवाला जपले मल्हाराच्या लडिवाळ, मृदू सरी श्रावणात, आळविले केदाराचे सूर संध्यावंदनात तुला भूपात गाताना मीच मला हरवले अखेरच्या मैफलीत विठू लाज माझी राख ऐक प्राणांतून घुमणारी भैरवीची हाक दयाघना, भेट आता; आळवून मी थकले

विश्वास

बाबुराव ·
लेखनविषय:
काव्यरस
गोड शब्द, गोड वचनं आणि निरागस चेह-यावर कधीच विश्वास टाकू नकोस असं तु म्हणायचीस. मुखवट्यांच्या चेह-यात तुझाच एक चेहरा खरा वाटायचा, पण कालांतरानं कळलं तोही फसवाच. आता तुझे स्पर्श बोलतात आणि पाणवतात डोळे. तेव्हा मात्र धैर्य होत नाही तुझ्यावर,तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवायला.

गणपती बाप्पा मोरया

पाषाणभेद ·
काव्यरस
गणपती बाप्पा मोरया मंडळी आपला नेहमीचाच हिरो आन हिरवीन आहे. या हिरोच्या गल्लीत सार्वजनीक गणपती बसतो आहे. हिरो (चांगल्या स्वभावाचा) भाई आहे अन टपोरी पोरे घेवून फिरतो.

शब्दखेळ

स्पंदना ·
लेखनविषय:
शुभ् प्रभात!! मंडळी काल अंमळ वजनदार नाश्त्यान दिवसाची सुरवात झाली. त्यावर उतारा म्हणून जातीन स्वैपाक घरात राबून मी; ही साधी झुणक्याची वडी, आणि ज्वारीची भाकरी आजच्या न्याहरी साठी तयार केलीय. (कवितेची थोडीशी हिस्ट्री सांगण जरुरी आहे. म्हंटल पावसावर कविता करावी. बाहेर छान सरी वर सरी कोसळत होत्या. थोडे तुषार अंगावर घेत, घेत 'लाइव्ह' कविता लिहावी असा विचार करून; जरा दारांत बसले. झालं. असं मोकळ वातावरण बघून आमचा कवितेचा मूळ शब्द "सर " मोकाट सुटला!! उनाडक्या करत खेळत सुटला. कोणीही ऐकेना . एका वाक्या नंतर ओळीत उभे राहीना!!