ज्याच्या सावलीचा धरावा विश्वास
विषवल्ली कवटाळे त्या वृक्षास
जळला मोहर, झडली पालवी,
दिसे रिता, पर्णहीन तो भकास
विषवल्ली तरारली, फोफावली,
वाढत चालली; वेढत चालली
घनदाट गर्द हिरव्या रानाला,
एकेका वृक्षाची गिळत सावली
रान कुठे आता? उद्ध्वस्त स्मशान
घोंघावतो वारा एकटा बेभान
उघडे-बोडके निष्पर्ण सांगाडे
फांदीफांदीवर भुतांचे थैमान
क्षणात अवघे चित्र पालटेल
वठल्या वृक्षाला धुमारा फुटेल
मिटतील विध्वंसाच्या खाणाखुणा,
पुन्हा रानात या गारवा दाटेल
मन रान, विषवल्ली अहंभाव
वेड्या, कर तिचा वेळीच पाडाव
जाळ तिची बीजं, तोड तिच्या फांद्या,
आणि जिंकून घे आयुष्याचा डाव
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2871
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान ! समर्पक !
विषवल्ली
चांगली कविता
धन्यवाद.
In reply to चांगली कविता by अविनाश ओगले
छान जमलीय कविता
+१
In reply to छान जमलीय कविता by अन्वय
+२
In reply to +१ by सुबक ठेंगणी
सुंदर कविता
ह्म्म
आवडली