समिधा
लेखनविषय:
काव्यरस
उभ्या जन्मात मी बहुधा
तुझ्या यज्ञातली समिधा ||
कधी मी सावली झाले
तुला ग्रीष्मात जपणारी
तुझ्या बहरात मी झाले
कळी गंधात रमणारी
बहरले धुंद मी कितीदा
तुझ्या यज्ञातली समिधा ||
कधी अभिसारिका झाले,
प्रिया झाले, सखी झाले
रमा नारायणाची,
शंकराची पार्वती झाले
कधी कृष्णा तुझी राधा
तुझ्या यज्ञातली समिधा ||
तुला पाहून माझ्या अंतरी
प्राजक्त दरवळतो
कुठेही जा, तुझ्यासाठीच
माझा जीव घुटमळतो
प्रिया, तू सूर्य मी वसुधा
तुझ्या यज्ञातली समिधा ||
वाचने
3277
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
चित्रपट गीत म्हणूनही
In reply to चित्रपट गीत म्हणूनही by धनंजय
+१
समिधा हा
In reply to समिधा हा by ऋषिकेश
>>समिधा हा
आवडली...
आवडली...
मस्तच !!
सुरेख!!
छानच
फारच छान कविता!