स्पर्श
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about स्पर्श
- 5 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
हां पावसाळी गारवा
तुझा सहवास हवा हवा
उन्हाच्या त्या काहिलीला
स्पर्श हळवा नवा नवा
जल भरल्या मेघानाही
हळूच स्पर्शे गारवा
तप्त झाल्या निळाईला
स्पर्श हळवा नवा नवा
आतुरलेल्या धरेलाही
स्पर्श जीवनाचा हवा
मोहरुन उठली ती ही
जाणून स्पर्श हळवा नवा
