घर गळतंय माझं.....
घर गळतंय माझं
तस ते नेहमीच गळत
पण पाऊस आला कि
उडतात छतावरच्या
दोन चार काड्या
अन पाऊस येतो
आत येतो जोराचा
घर गळतंय माझं
थेंबाच शहर झालाय
पाण्याने तुंबलंय
वाट पाहतेय निचरा होण्याची
छताला भोक आहेच
पण जमिनीला करतेय
निचरेल ...
काव्यरस
मिसळपाव