मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी तुझा

माहीराज · · जे न देखे रवी...
काव्यरस
या नभातील तारका तू मी तुझा गं चांदवा सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।। रंग हे तारांगणीचे रंगले नयनी तुझ्या छंद माझे गंध होऊन दंगले स्वप्नी तुझ्या तू असे आकार माझा मी गुलाबी ही हवा सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।। अंतरीचे ते चिरंतर स्वप्न तु जे पाहीले तेच माझ्या या मनाच्या अंतरीही रंगले तुच सारी राञ माझी मी नशीला काजवा सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।।   

वाचने 3036 वाचनखूण प्रतिक्रिया 12

चांदणे संदीप 19/11/2015 - 11:02
या नभातील तारका तू मी तुझा गं चांदवा सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।। तू असे आकार माझा मी गुलाबी ही हवा सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।। तुच सारी राञ माझी मी नशीला काजवा सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।।
जबरदस्त! खूपच आवडल्या ह्या ओळी! कुठे होतात मालक इतके दिवस? ___/\___ Sandy

पैसा 22/11/2015 - 16:20
छान! मात्र हल्ली खूपजण "त्र" हा "ञ" असा का लिहितात काही कळत नाही.

In reply to by माहीराज

पैसा 23/11/2015 - 16:35
मोबाईलवर जे स्वरचक्र कीबोर्ड वापरतात, त्यानी "त्र" टाईप केला तरी "ञ" असंच उमटतं. मी तो कीबोर्ड वापरला नाही त्यामुळे सांगू शकत नाही.