**तुझ्याशिवाय **
तुझ्याशिवाय ,
मन वेडे होऊनी झुलते,
उगीच का भरकटते!
स्वप्न-कळ्यांच्या उमलण्याची,
वाट पाहत बसते!!
सागरतीरी एकाकी,
का उदास होऊनी बसते!
खळखळणार्या लाटांच्या,
नादामध्ये विरते!!
स्वप्न असो वा सत्य,
मन तुजपाशीच रमते!
त्या ईश्वरचरणी रात्रंदिनी,
तुझी कामना करते!!
- निलम बुचडे.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2035
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमची कामना पूर्ण होवो.
ही ईश्वरचरणी प्रार्थना
तुझ्याशिवाय
तसा कोणी नाहीय. म्हणून 'त्या' च्याशिवाय... अशी कविता लिहीलय. :-)
सुंदर लिहिता!!!
सुंदर लिहिता!!!
मांत्रिक
धन्यवाद !!!!
शेम टु शेम
आयला मला पण अगदी असच व्हायच " कधी एकदा संध्याकाळ होईल आणि कधी एकदा मी चपटी मारेन" या विचाराने मी दिवसभर बेचैन असायचो.
बर्याचा दिवसांनी माझी चुक मला समजली. सुरुवातीला मला प्रचंड लाज वाटली. लोक काय म्हणतिल या विचारानेच मी अर्धमेला झालो होतो.
पण लाजुन उपयोग नव्हता, काहीतरी उपाय तर करायलाच हवा होता.
मग एकदिवस मी ठरवून टाकले आता बास झाला हा वेडे पणा.......
मनाशी पक्का निश्चय केला.........
आणि सकाळी उठल्या उठल्याच घ्यायला सुरुवात केली.
.............त्या नंतर असे भास होणे बंद झाले.
पैजारबुवा,
ः-)) ः-))
ः-)) ः-))
पैजारबुवा, ही कविता मी
पैजारबुवा, ही कविता मी कॉलेजात असताना केली होती हो.
आता भास नाही होत मला ः-))