Skip to main content

मौनाचं वादळ

मौनाचं वादळ

लेखक जयवी
Published on गुरुवार, 02/12/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
काहीतरी खुपतंय, सलतंय आत कुठंतरी खोलवर दुखतंय आज उगाच गहिवर, आवंढा घशात कोंडलेला श्वास, सैरभैर मनात मन कसं पिसं झालंय आज कुठतरी खोलवर दुखतंय आज पापण्यांची होते झालर ओली रडवेली होते देहाची बोली कबुली कशाची द्यावी आज कुठतरी खोलवर दुखतंय आज सयींचं व्याकुळ, आठव मोहळ उरात कल्लोळ, मौनाचं वादळ कोरडा श्रावण, भिजवे आज कुठतरी खोलवर दुखतंय आज जयश्री अंबासकर
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 2958
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

उगाच गहिवर, आवंढा घशात कोंडलेला श्वास, सैरभैर मनात मन कसं पिसं झालंय आज कुठतरी खोलवर दुखतंय आज छान कविता आवडली मनापासून !!

छान ! पापण्यांची होते झालर ओली रडवेली होते देहाची बोली कबुली कशाची द्यावी आज कुठतरी खोलवर दुखतंय आज

काय बाय सांगु..कस्स ग सांगु मलाच माझी वाटे लाज.. काही तरी होउन गेलय आज..... या गीताची आठवण झाली....

कल्पक, परिणामकारक. मात्र : **"पापण्यांची होते झालर ओली" सारख्या समर्थ रूपकानंतर "रडवेली होते देहाची बोली" सारखी बेजान खोगीरभरती करायला नको होती. यापेक्षा परिणामकारक ओळ जमू शकली असती, अशी कवयित्रीबद्दल खात्री आहे.**

लहान मुलांच्या कवितांना मिळालेला साज. वेदांतल्या ऋचांना देखील तीन स्वर लाअगतात. त्यापेक्षा कॉम्प्लेक्स हवी कविता. नाही का ?

In reply to by मिसळभोक्ता

'रेलगाडी, रेलगाडी, झुकझुक झुकझुक, झुकझुक झुकझुक, पीछेवाले ठेसन बोले "रुकरुक रुकरुक! रुकरुक रुकरुक!"' या 'कविते'त नेमके काय वाईट आहे? (शोधायचाच झाला, तर गहन अर्थही सापडेल त्यात! 'आयुष्य पुढे चालतच राहते, आणि कोणीही कितीही म्हटले, तरी फिरून मागे वळता येत नाही', वगैरे वगैरे.)
त्यापेक्षा कॉम्प्लेक्स हवी कविता. नाही का ?
फारा वर्षांपूर्वी दूरदर्शनवर एक जाहिरात येत असे. एक साधी, एकहाती काढायला सोपी (आणि एकहातीच काढलेली) अशी एका व्यक्तीची रेखाकृती. आणि मग पंचलाईन. "या माणसाची थोरवी त्याच्या साधेपणात होती." असो.

"उगाच गहिवर, आवंढा घशात कोंडलेला श्वास, सैरभैर मनात मन कसं पिसं झालंय आज" खुप छान..

धन्यवाद मित्रांनो :) मला स्वतःला कॉम्प्लेक्स कविता नाही आवडत. कविता साधी, समजायला सोपी असायला हवी असं माझं मत आहे.

कविता आवडली. आणि काही संबंध नाही तरी नवीन कार्यक्रमाचे नांव आठवले 'खुपते तिथे गुप्ते'

कविता मनापासुन आवडली. आणि हो..कविता साध्या सोप्या शब्दातच असावी म्हणजे रसग्रहण सोपे जाते. नाहीतर शब्दांचे अवडंबर माजविणे काय कठीण आहे? याउलट आपले म्हणणे साध्या सोप्या शब्दात व्यक्त करणे आणि ते पद्य स्वरुपात मांडणे यातच कसोटी आहे..