Skip to main content

अधुरी प्रेम कहाणी

अधुरी प्रेम कहाणी

Published on गुरुवार, 25/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
अधुरी प्रेम कहाणी का पुन्हा पुन्हा मी शोधते त्या भुत काळातल्या वाटा. का दु:ख्ख करुन घेते. जेंव्हा पायी रुततो काटा बसता अशा कातर वेळी कानी कोण गुणगुणे गाणी? झोंबताना ह्या कोवळ्या तनुस कोण करते भलतीच मागणी? ज्याने ह्रुदयास पीडा दिली तोच कसा ह्रदयी बसला? कोवळ्या मम तनुस छेडुन यौवन कसे जागवून गेला. कसा मी विसरु त्याला तो रोम रोमात भिनला सारखा तो आठवतो का? जो जखमा देवुन गेला तुझी लागलेली हि आस हा भास कि आभास आहे तु आता माझा नाहि हे मज का उमगत नाहि? केंव्हा सरेल ति माझी काळरात्र घनघोर अंधारी? कधि उजाडणार मम जिवनी ति पहाट सोनेरी? काय सांगु काय बोलु मन माझे था~यावर नाहि दाटुन येते निर नयनि लिहिताना अधुरी प्रेम कहाणी अविनाश...
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 2058
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

अधुरी प्रेम कहाणी का पुन्हा पुन्हा मी शोधते त्या भुत काळातल्या वाटा. का दु:ख्ख करुन घेते. जेंव्हा पायी रुततो काटा मित्रा हे मात्र छान . आवडले .मनापासूनन लिहिलेस रे !!