शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई...
फोडून बांध मनीचा - झालो जसा प्रवाही !
अश्रु बनुन गेला - मग शब्द अर्थवाही
तोडून तसबीरिला - ती एकसंध राही
ऐना कसा कळेना - जपतो तिला मला ही
मागुन ही सुखाला - आले न हाती काही
दुःख हेंच मजला - देते अजून ग्वाही
सांगुन ही कुणाला - कळले न गुज मनीचे
कुसुमास कागदी त्या - कुठला सुवास येई?
कळवून ही तुला - मी कळलो कधीच नाही
तोच उम्बरा अन - तीच ठेच पाई
छापून ही स्वतः ला - मी ऊमट्लोच नाही
शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई
जाळुन ही मला - मी उरलो दिशांत दही
वारा धुरास माझ्या - चघळुन रोज पाही
टाळुन ही मला तू - मी टळलोच नाही
जरी चन्द्र मी आता - मी सूर्य उद्याचा ही
माझी कविता ...मयुरेश साने...दि १६-औग-10
फार सुंदर आहे कविता..
छान! आवडली!
आवडली कविता!
छापून ही स्वतः ला - मी
लिहित राहा...... छान आहे....
जाळुन ही मला - मी उरलो दिशांत
छान ... खुप आवडली
रचना अतिशय भिडणारी
अतिशय सुन्दर रचना!
सुंदर...
अतिशय सुंदर रचना.. आवड्ली....
खूप छान !! मात्रामधे थोडेफार
अतिशय सुन्दर रचना! साने भाऊ
.
सुंदर.. ग्रेट .. भावस्पर्शी