कत्तलखाना !!
!जनावरांचे कळप चालत असतात कत्तलखान्याकडे
हाडांचे जणू सापळे सरकत असतात ह्या कत्तलखान्याकडे
लवथवते विक्राळपण ह्यांच्या डोळ्यातून पाझरत असते
तरी सरकत असतात गुरांचे कळप मुकाटपणे
नजरेत नसते कसली ओढ घरादाराची
तरी ओढली जातात अनामिक ओढीने ह्या जनावरांचे कळप
डोळे कोठे लागलेले असतात शून्यात कोठेतरी
त्याना येत असतो पाठीवर बसलेल्या काठीचा आवाज
नि बेचैन होऊन सरकत असतात झुंडीने अनामिक दिशेला
एखादे जनावर मुतते फदाफदा नि हगते जीव घाबरा झाल्यासारखा
एखादा कावळा बसतो त्यांच्या शिंगावर शहाजोगपणे
मजेने स्वताची हाउस घेत असतो पुरवून
जनावरांना नाही वाटत सुख, नाही फुलत रोमांच त्यांच्या कातडीवर
कसे होऊन जातात बधीर अनामिक भेसूर सावलीने
गरीब शेतकरी वांझोट्या शेतीची बघत असतो पडझड
दुष्काळाने झालेला असतो सुन्न बधीर केविलवाणा
चारा नसतो लेकराना खायला घालायला
त्यांच्या गळ्यातील घुग्रू वाजत असतात मृत्यूघंटेसारखे
पोटाच्या खळगीसाठी विकतो आपल्या लेकरांना
नि बघत बसतो शून्यपणे डोळे अंधारात
जनावरे सरकत असतात मोकळ्या गळ्यानी
छुमछन आवाज नसतो ऐकायला येत त्यांच्या कानांना
नसतो ताल चालण्यात गळत गोजिरवाणा
ते नग्नपणे चालत असतात पाठीवर नसतो मायेचा हात
ते झिडपिडत चालत असतात अनामिक गंधाने ती घाबरून जातात
हताशपणे पावले ढकलीत असतात अटल मृतुच्या भयाण वाटेकडे ....!!!
लेखनविषय:
याद्या
2326
प्रतिक्रिया
9
काव्यरस
मिसळपाव
२-३ दा वाचली कविता .. विदारक
+१
arey khoop great
विदारक चित्रण!
बाप रे!!
सुन्न झाले वाचुन
तुमच्या कवितेचा विषय खूप
कंठ दाटुन आला , गहिवरुन आले ,
कंठ दाटुन आला , गहिवरुन आले ,