मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ghol

तरीही....(विडंबन)

श्वेता२४ ·
प्रेरणा असलेली मूळ गझल इथे वाचून शकता... तरीही.... नाजूक उंड्याचा सावरते मी तोल, तरीही का होईना पोळी माझी गोल तरीही.... पिठी घातली घट्ट कराया पूरण थोडे.. अजून का ही पूरणामध्ये ओल तरीही.... काठाकाठाने लाटतसे, यत्न न सोडी... तव्यावरी जाता, मी मारी शीळ तरीही.... भेटत नाहीत सख्या मला या 'कीटी' शिवाय म्हणूनी खास हा त्यांच्यासाठी घोळ तरीही.... कोरीव भृकूटी मम सखीची पाहून ती पोळी का मज वाटे अधिकच झाली खोल तरीही.... ग्रास आग्रही भरवी सखीला तो गोडूला करी डोळे मोठे..अन आली भोवळ!!!! तरीही...!!

सणासुदीची सफाई

माहितगार ·
"नास्तिकांनी खायला कोंडा, उशाला धोंडाचं गाणं!" कितीही म्हटलं, तरी आपल्या देशाची पक्की जमीन धर्माच्या खाटेचीच सोय! पंथाच्या गादीची उब, सांस्कृतिक उशीसंगे अल्हाददायक झोप — आपलेसेपणा देणारी ही सोय बहुतेकांना हवीच असते, नाही का? सणांच्या आधी, माळ्यावरची समृद्ध अडगळ खाली उतरते, तेव्हा माळ्याचीही सफाई होते. तसंच काहीसं — मऊ मुलायम गादीसुद्धा, खूप दिवसांनी कडक होते. मग ती कारखान्यात जाऊन सासुफ-करून, पुन्हा मुलायम होते, स्वच्छ होते, दिवाळी अंकांनी वैचारीक कल्हई दिल्या सारखी. बेडही मधूनमधून हलवावा लागतो — कचरा, जळमटे बाजूला काढून पुन्हा नीट लावावा लागतो आपलच घर चकाचक दिसण्यासाठी . सणासुदीच्या निम

सुट्टी

माहितगार ·
सुट्टी चालत्या घड्ञाळासारखी असावी बाकीच्या जगाला चालू दिसताना आत ते नियमीत निवांत अनवाईण्ड होत असते. ते इतरांच्या वेळेवर नाही पळत, इतरांना स्वतःच्या वेळेवर पळवते. जेव्हा ते पुर्ण अनवाईण्ड होते तेव्हा त्याचा आराम चालू होतो पुन्हा कोणी रिवाईण्ड करे पर्यंत

अरेबिक समुद्र ते हिंदी महासागर: जागतिक भाषा प्रेम

माहितगार ·
नक्कीच, पर्शियन आणि उर्दू भाषेतील प्रेमाची भावना दर्शवणारी कविता खालीलप्रमाणे: **पर्शियन आणि अरेबिक प्रेम:** पर्शियन भाषा, जणू सुंदर युवती, अरेबिक तरुणावर तिचे मन मोहित. मोहक अदा, नजाकत खास, प्रेमाचा रंग, जणू गुलाबाचा सुवास. **उर्दू, पर्शियन आणि अरेबिकची सुंदर कन्या:** उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. शब्दांची जादू, भावनांचा खेळ, सौंदर्याची खाण, जणू मोत्यांचा मेळ. **उर्दू आणि हिंदी प्रेम:** अशा सुंदर उर्दूचं, हिंदी तरुणावर मन भाळले. प्रेमाची कहाणी, जणू गोडते खेळ. शब्दांची गुंफण, रंगांची उधळण, दोन भाषांचं, हे अनोखं मिलन. **भाषा आरती** जय पर्शियन माता, सुंद

'मिसळपाव' चा गदारोळ

माहितगार ·
नक्कीच, दिलेल्या तीन लिंकमधील माहितीच्या आधारे एक कविता तयार करण्याचा प्रयत्न मी करत आहे. **कविता:** **शीर्षक: 'मिसळपाव' चा गदारोळ** चार भिडू डावे, उजवेही चार, कुंपणाच्या वर, दोन भिडू फार. भिडू भिडतात, त्वेषे परस्परा, मौज ही इतरा, फुकटची जरा. राजकारणाच्या व्यतिरिक्त काही, घडतची नाही, देशात ह्याही. ऐसा आविर्भाव, भिडू बाळगती, आता झाले अती, हौस फिटे किती. अवांछित मजकूर, डोळे फिरवतो, दुर्लक्ष करणे, उपाय ठरतो. मिसळपाव चा रस्ता, वळणावळणाचा, वाद-विवाद, विषय नानाच. बातमी ताजी, चर्चा नवी, मतमतांतरे, इथे दाटली जगी. 'मिसळपाव' चा थाट, न्यारा असा, प्रत्येकाचा आवाज, इथे घुमतो दाही दिशा. पण, हे भिडू,

कोण?

सरीवर सरी ·
मोकळ्या अवकाशाचे अंगण हाक कोणाची? मधाळ चांदण उरात धडधड अनवट वाटा धाडतो कोण?निमीष लाटा मेघांनी बांधले स्वप्नांचे झुले कोण?उधळतो ढगांची फुले धारा ..वारा..स्वैर पसारा देह कोणाचा?संचित पहारा ज्योत दिव्याची अधीर नाही ओह?पाकोळीची तिज तिलांजली मेंदीचा गंध वेचला भाव विभोरी उमलली संध्या मिटण्या भु-वरी?

आङळे वाङळें साहित्य संमेलन

माहितगार ·
आङळे वाङळें साहित्य संमेलन आङळे वाङळेंना म्हणाली मराठी साहित्य संमेलनाला नाही गेलात कसे ते? वाङळें आङळेंना म्हणाला तुमच्या आङळीकेचे साहित्याने अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला जागा आता उरलीच कुठे ?

धत् तेरे की...

प्राची अश्विनी ·
तसं म्हटलं तर त्यांची ती होती खरीखुरी डेट पण तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट.. सुट्टीचा दिवस होता, Backdrop ला पाऊस होता. Romantic होतं weather, एकांताची हलकी चादर. ती म्हणाली, खरंच येऊ? तो म्हणाला, yes plz, I'll wait.... पण... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट.. खरंतर त्याच्याचसाठी नेसली ती नव्वीन साडी ह्रदयात तिच्या धडधडणारी सुप्परफास्ट होती गाडी. तरी बरं तोंडावरती लावला होता मोठ्ठा मास्क नाही तर hiding feelings is not a simple task! चेहरा कोरडा करून म्हणे, "Soooo sorry for the late" पण....

(ठिपसे)

खेडूत ·
डिस्क्लेमर: १. ठिपसे असे एक आडनाव असते. २. इथे केवळ मीटरमध्ये बसवायला आणि यमक जुळवण्यासाठी घेतले आहे. ३. त्यामुळे त्यावरून कृपया गैरसमजूत नको. ४. मूळ कविता आवडली आहेच, त्यामुळे कवींनी माफ करावे. प्रेरणा.. पालिकेतले कळकट ठिपसे काळ्या मळक्या फाईलींच्या ढीगात घुसूनि हरवण्याच्या थोडे आधी तिथून निघूया, पण ठिपश्यांच्या साहेबाला, खात्यापित्या ज्यूनियरांना सहकार्याचा कंठ फुटेतो जरा बसूया मग बोलूया, अन् ठिपश्यांची मंजुरीही पाकीट पाहून विकांताच्या थोडी आधी जलदगतीने नीट मिळू दे मग थांबूया

( जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना )

रातराणी ·
( प्राचीताई माफ करशील ना ग? ) जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना, आणि तुला नाक्यावरच्या वडापावची खूप खूप आठवण येईल ना आणि तेव्हा जेव्हा मी बटाटेवड्याची रेसिपी पहात असेन तू म्हणशील, "अवघड आहे! या जन्मी मिळतील का?" मी तुझ्याकडे एक लुक देईन अन् मग बटाट्यांना कोंबेन कुकरमधे. "अगं, शिट्टी!" मी मग चिडून शिट्टी लावेन. "जमलं!", तू म्हणशील. मग मात्र मला रहावणार नाही. मी तुझा फरसाणाच्या डब्यातला हात काढून घेईन, कुकरजवळ नेईन. तू घाबरशील..म्हणशील, हात भाजतील मी म्हणेन भाजू देत. शिट्ट्या होतीलच कुकरला.