मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पिंपळपान

कहर ·
लेखनविषय:
काव्यरस
आधी क्षमेच्या कारणांची खाण शोधू मग फुलांनी केलेला अपमान शोधू दाखवा पदवी अगोदर वाल्मीकीची अन्यथा रामायणात अज्ञान शोधू सोसेना गलका सभोवती शांततेचा दूर याहून एक स्थळ सुनसान शोधू बोलण्या आधीच सुरू होती लढाया ऐकूनी घेतील असले कान शोधू प्रेमामध्ये जीवही टाकू ओवाळुन भंगल्यावर नफा कि नुकसान शोधू आदेश हा कारागृहे खुली करण्याचा पळूच ना शकेल तो बंदिवान शोधू शब्दांच्या कचऱ्यातही मोती एखादा थेट मनाला भिडणारे लिखाण शोधू जिवंत दुनिया जळते एकमेकांवर मृतदेहांना जाळायाला स्मशान शोधू शिव्या शाप जरी रोजचेच ठरलेले नशिबातील एखादे समाधान शोधू खंत नको कालची वा तमा उद्याची खुल्या बाहूंनी जगू..

कोवळे काही ऋतू...

सत्यजित... ·

खिलजि Mon, 04/02/2018 - 14:14
आपण मला जो अभिप्राय दिलात त्याबद्दल मी समजू शकतो कि मी शब्दांत/शब्दरचनेत गरीब आहे .. पण सत्यजितरावांसारख्या कसलेल्या कवीला हा अभिप्राय म्हणजे हद्द झाली ... नक्की आपले धोरण काय आहे ? कि भानामती शिकण्याच्या नादात कुठेतरी भोंदूबाबाकडे आपली मती गहाण ठेवून आला आहात ? काय अश्लील आहे पहिल्या कडव्यात ? ऋतू येतात आणि जातात आणि ठरलेल्या ऋतू मध्येच मोहोरसुद्धा येतात . अश्लील या शब्दाची व्याख्या तरी काय आहे नेमकी ? इथे संस्थळावर नको पण व्यनि केला तरी चालेल ,, या गरिबाला ... सिद्धेश्वर विलास पाटणकर

In reply to by खिलजि

पण सत्यजितरावांसारख्या कसलेल्या कवीला हा अभिप्राय म्हणजे हद्द झाली ... नक्की आपले धोरण काय आहे ?
ख्या ख्या ख्या . आम्ही प्रतिसाद अभिप्राय हा कवितेला देत असतो , कवीला नाही , उद्या सत्यजित म्हणाले की सदर कविता कुसुमाग्रजांची आहे तरीही आमचा प्रतिसाद हाच राहिल. धोरण हेच आहे कि - देतो तीक्ष्ण उत्तरे | पुढे व्हावया बरें || श्रीमंत मार्कस ऑरेलियसराव पेशवे साहेब ... >>> आम्ही खुद्द सीझर असताना तुम्ही आमची सेवक असलेल्या पेशव्यांची तुलना करता .... ह्म्म्म , आता तुमच्यावर विशेष लक्ष द्यायला हवे !

खिलजि Tue, 04/03/2018 - 17:06
नक्की नाव काय आहे आपलं ? सीझर कि शिरमंत मार्कस ऑरेलियसराव ... रोममध्ये अजून असे नमुने आहेत का ? नाही ,,, म्हणजे आम्ही ,, बाई आधीच बघितलीय ,, काय असते ते ? तुमच्यासारखे अजून काही आहेत का ? परत एकदा कुठेतरी मोठा दगड बघून व्यवस्थित डोकं आपटून घ्या आणि मग लिहा .. आधी स्वतःच नाव नीट पक्के करा , ते आम्हाला कळवा मग आपण पुढले बोलू ... काय आहे तुम्ही लिहिता मार्कस ऑरेलियस आणि आज सांगता कि मी सीझर आहे उद्या बोलाल मी गिजर आहे परवा बोलाल मी गाजर आहे तेरवा बोलाल मी रोहित गुजर आहे अस्सं करत करत स्वतःच्या नावाचंच तेरावं घालाल ... त्याच काय आहे या आभासी जगात ,, अभिप्राय द्यावेत पण ते योग्य नावानिशी ... सारखं सारखं बदलू नये .. तेव्हा आधी नाव ठरवा, ते नीट कळवा मगच आपण पुढलं बोलू .. काय ....... सिद्धेश्वर विलास पाटणकर

In reply to by खिलजि

उगी उगी ! रडुन काही उपेग नाही बाळा ! कोणी काय नाव घ्यायचं अन काय अभिप्राय द्यायचे ते ज्याचं त्याचं बघुन घेईल ! तु चांगल्या कविता पाडण्यावर फोकस कर पाहु , आपण त्यावर बोलु ! उगी उगी =))))

कोवळे काही ऋतू अंगावरुन गेले... मोहराने रान सारे बावरुन गेले! लालिमा चढला कसा शब्दांस आज माझ्या? गीत माझे कोणत्या ओठावरुन गेले!

(बार हो)

प्रसाद गोडबोले ·

अभ्या.. गुरुवार, 03/22/2018 - 16:00
जब्बरदस्तच. . बादवे हा व्हाटसप कंपू ट्रेड मार्क का आहे म्हणे? कसले ट्रेडिंग करता आपण?

नाखु गुरुवार, 03/22/2018 - 20:09
सांप्रदायिक काव्य दिसते आहे शिलकीतला बाकीचा साक्षीदार नाखु

प्रेरणा : यारहो ... दादाश्रींची विनम्र माफी मागुन ..... अर्ज़ किया है .... ह्या उन्हाचा जोर आहे वाढलेला यारहो शोधुया नजदीक साधा एक बियर बार हो ड्रॉट ज्या त्या ब्रॅन्ड्ची तिथलीच बॉटल चांगली पण अता चालेल काही फक्त असु दे गार हो मागवा चकली चना अन हाफ चीकन तंदुरी कावळ्यांना भूक आहे लागलेली फार हो ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले दावले "जमवून" मग "ठरवून" वारंवार हो एकदा केसांस वेडे मोकळे सोडून बघ नेत्रसुख असती गडे हे झाकले उभार* हो कोण तो चु$@ भिकारी पेग अर्धा सांडतो वाटते होईल ह्याचा आज युनुस वकार हो माँक कुठला? कोण मल्ल्या?

जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा!

सत्यजित... ·

सानझरी Wed, 02/07/2018 - 02:46
सुंदर लिहीलीए गझल..
तुझी लाट झालो तसे वाटले की विरावे अता कुण्या वादळाने नको दाखवाया किनारे पुन्हा!
क्या बात!

Jayant Naik गुरुवार, 02/08/2018 - 18:37
फार सुंदर . गझलेचा मूड फार मस्त सांभाळला आहे.

जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा कळू लागले जीवनाचे फिरंगी,इशारे पुन्हा! कुण्या डोंगरी एक पणती सुखाने,जळू लागली तमाच्या तमेचे तिला येत गेले,पुकारे पुन्हा! कळ्या वेचल्या काल माझ्या करांनी,गुन्हा जाहला फुलू लागले श्वास-श्वासांत माझ्या,निखारे पुन्हा!

(तरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला!

सत्यजित... ·

ss_sameer Wed, 01/24/2018 - 18:27
खास जमलंय वापरलेल्या ओळींवर पुन्हा लिहिणे अवघड अभिनंदन. कोणी म्हणेल चांगला प्रयत्न होता माझ्यामते हा प्रयत्न नाहीच हा तर सरसकट निकाल हाती ठेवलाय छानच

(मौसम तरही का छाया है, तो गुस्ताखी माफ! पण तरहीच्या ओळीसाठी विशाल व क्रांतीताईंचे आभार,तसेच अगंतूकपणे तरही लिहिल्याबद्दल क्षमस्व!) सूर्य मावळता कधीही व्हायचे नव्हते मला या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला! पावले वळली कितीदा त्याच त्या वळणावरी ज्या जुन्या शहरात पुन्न्हा जायचे नव्हते मला! आजही डोळ्यांत माझ्या धुंद ही आली कशी? मी पुन्हा प्यालो..खरेतर, प्यायचे नव्हते मला! वेळ नाही,काळ नाही,ना ऋतूंना लाजही थेंब-थेंबाला विचारा,न्हायचे नव्हते मला! भावनांना भाव नव्हता मैफलींमध्ध्ये तुझ्या गात आलो गीत मी,जे गायचे नव्हते मला! —सत्यजित

तुझ्या नाजूक ओठांनी...

सत्यजित... ·

नाखु गुरुवार, 01/11/2018 - 21:12
अभिनंदन सद्गय गदारोळात( मंडई, स्वारगेट, तुळशीबाग, गावठी अड्डा यांची समुच्चय अनुभुती) पिडीतांना दिलेली झुळूक

सत्यजित... गुरुवार, 01/25/2018 - 19:55
प्रतिसादाबद्दल प्रचेतस व टंकणातील चूक दुरुस्त केल्याबद्दल सा.सं.चे मनःपूर्वक आभार!

अवेळी मोहरावे तू.. ऋतूंना साद घालावी तुझ्या नाजूक ओठांनी कळ्यांची चुंबने घ्यावी! फुले वेचून मी सारी तुझ्या हातात देताना तुझ्या अलवार स्पर्शांनी मला आलिंगने द्यावी!

जपमाळ

शैलेन्द्र ·

In reply to by चांदणे संदीप

@प्रचंड आवडली!! वाखूसा! >>> +++++++++++++++++++++++++++११११११११११११११११११११११११११११११११११११११११ आणी जोरदार टाळ्या!

पुंबा Fri, 11/17/2017 - 22:11
खुपच सुंदर. नितळ, भावविभोर करणारी कविता. साल्या असल्या कवितांसाठी काव्यविभाग रहावासा वाटतो. नाय तर रोजचा रतिब आहेच.

शब्दबम्बाळ Sat, 11/18/2017 - 10:28
हेही असेच होते, तेही तसेच होते आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते!? पहिल्यांदा मला विडंबन आहे असे वाटले पण स्वतंत्र गझल आहे... सुरेश भटांच्या "उशीर" मधून प्रेरणा घेऊन लिहिली आहे का?

In reply to by शब्दबम्बाळ

शैलेन्द्र Sat, 11/18/2017 - 13:31
प्रेरणा असं नाहही, कारण पूर्ण वेगळा कंटेंट आहे, पण पहिलं कडवं मनात घोळत होतं त्यावर त्याचा प्रभाव असावा

५० फक्त Sat, 11/18/2017 - 16:02
मस्त कविता, एक प्रयोग म्हणुन प्रत्येक कडव्याच्या शेवटच्या ओळीच्या शेवटी प्रश्नचिन्ह लावुन वाचली, वेगळाच अर्थ लागतो आहे.

हेही बरेच आहे, तेही बरेच होते, आपापल्या परीने, सारे खरेच होते मोजून पाप माझे जपमाळ ओवलेली, मोक्षास गाठण्याला, तितके पुरेचं होते, आयुष्य तारकांचे मोजीत रात्र होती मोहक असे मनाला भूलवीत बरेच होते खाणीत नांदण्याचा कोळश्यास शाप आहे नसते ठिसूळ तुकडे तर तेही हिरेच होते सरणास भेटताना गेली नजर मागे चेहरे ओळखीचे हसरे सारेच होते -शैलेंद्र

मनातल्या मनात मी...

सत्यजित... ·

एस Mon, 11/06/2017 - 23:27
गुलाब-पाकळ्यांतुनी तुझी गझल घुमायची
उरात लाख मोगरे सुरात घमघमायचे!
वाह! अगदी 'तुझ्याच अंगणी स्वरांचा...' ची आठवण आली. खूपच छान!

मनातल्या मनात मी तुलाच गुणगुणायचे अशीच मी,कधीतरी.. तुझ्यासवे जगायचे! तुटून तारका क्षणात आसमंत लांघते उगाच रात्र-रात्र मी नभात चमचमायचे! गुलाब-पाकळ्यांतुनी तुझी गझल घुमायची उरात लाख मोगरे सुरात घमघमायचे!

सख्या, कसे? कुठून रोज, आणतोस चांदणे?

सत्यजित... ·

नेहमीच वाचतो तुमच्या गझला. "स्वप्नपरीच्या वाटेवरती,तारांगण अंथरले होते..." ही तर अगदी पाठ झालीय आता. तुमचे शब्द एक लय घेऊन येतात, ते फार आवडतं मला.

सत्यजित... Mon, 10/09/2017 - 23:12
कवितानागेश,अनन्तयात्रीजी,रुपी,चामुंडराय,आगाऊ म्हाद्या,अभ्या,तृप्ति...आपणासारख्या रसिकांकडून भरभरुन मिळालेली दाद अत्यंत अल्हाद-दायक,प्रोत्साहनीय आहे! आपणा सर्वांचे मनापासून खूप-खूप धन्यवाद!

सत्यजित... Mon, 10/09/2017 - 23:33
'कविता' विभागातील रचना,त्यातही माझी रचना,रसिकांकरीता 'शिफारस' सदरांतर्गत नोंदविल्याबद्दल,तत्संबंधी कार्यरत टीम तसेच मिपा संपादक,सा.सं.मंडळाचे खूप-खूप आभार!'मिपा'वर लिहिणाऱ्या अनेक उत्तम कवींसाठी ही बाब नक्कीच प्रोत्साहनीय असेल,तसेच रसिक-वाचकांसाठी ही एक उत्तम काव्यपर्वणी ठरावी! नव-नवीन उपक्रम तथा सकारात्मक बदल राबविण्याबाबत,'मिपा'च्या तत्पर भूमिकेचे,त्यासाठी वेळात वेळ काढून सतत कार्यशील टीम्सचे कौतुक,तसेच आभार,जाहिर मांडणे,केवळ ईष्टच नव्हे, तर अगत्याचे वाटते! पुनःश्च एकवार, सर्वांचे हार्दिक आभार!

आनंदयात्री Wed, 10/11/2017 - 07:22
कविता छान आहे, पहिली दोन कडवी तरल आहेत. या कवितेचे दृक्श्राव्य सादरीकरण उदाहरणार्थ सचिन खेडेकरने केले तर ऐकायला अतिशय आवडेल.

सत्यजित... Wed, 11/01/2017 - 01:09
मिसळलेला काव्यप्रेमी,सुनील सर,अविनाशजी,स्वप्नाजी,पंडितजी...सर्वांचे मनापासून धन्यवाद!

हळूच सोडतोस केस..माळतोस चांदणे... सख्या, कसे? कुठून रोज, आणतोस चांदणे? अधीर ओठ साधतात मौनही कसे तुझे? किती अरे, उरात खोल पेरतोस चांदणे! बनून स्वप्न चोरतोस झोप रोजचीच तू... विचारताच, चोर कोण? सांगतोस..चांदणे! उनाड चंद्रमा बनून हिंडतोस रात्रभर पहाट-वेळचे, टिपूर मागतोस चांदणे! नभात लक्ष तारका उधाणतात कैकदा मिठीत केवढे कसून घुसळतोस चांदणे! मधाळ चांद, वितळतो..रसाळ रात वाहते... असे कुण्या सुरांत रे! पुकारतोस चांदणे! —सत्यजित

मी माझे तारांगण सादर करतो

drsunilahirrao ·

जयंत कुलकर्णी Wed, 09/27/2017 - 08:14
आवडली. घेउन अर्ज दयेचा या मशिदीत जरी मी आलो, तुझी शपथ, प्रार्थना करण्यास नाही आलो चोरून प्रार्थनेची मी नेली इथली सतरंजी, झिजली माझ्या पापांनी, बदलावी म्हणुनी आलो. - ओमर खय्याम

कोण कुठे कोणाचा आदर करतो पाठीवरती वार बिरादर करतो प्याद्याला आदेश रणाचा देतो नि तिथुनी घुमजाव बहादर करतो गाभाऱ्याला सोडत नाही क्षणभर देवाचे रक्षण जमगादर करतो तुला न बाधो शिशिर येथला म्हणुनी मी अवघ्या देहाची चादर करतो आळ नको घेऊ, झाडाझडती घे (मी माझे तारांगण सादर करतो) देव दयाळू आहे कळल्यापासुन रोज नवे कन्फेशन फादर करतो डॉ. सुनील अहिरराव